Understand charges linked to your Credit card EMI : जर क्रेडिट कार्डची थकबाकी दिलेल्या तारखेपर्यंत पूर्ण भरली नाही, तर मोठे व्याज भरावे लागते हे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या जवळपास प्रत्येकालाच माहीत असेल. कधी कधी हे व्याज वार्षिक ४२ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते. तसेच काही वेळा तुम्हाला उशिरा पेमेंट पेनल्टी म्हणून मोठी रक्कम भरावी लागू शकते. परंतु जर तुम्ही क्रेडिट कार्डाने मोठी खरेदी केली असेल आणि देय तारखेपर्यंत संपूर्ण रक्कम परत करणे कठीण वाटत असेल, तर एक उपाय म्हणजे संपूर्ण पेमेंट ईएमआयमध्ये रूपांतरित करून टाका. अशा ईएमआयवर आकारले जाणारे व्याज संपूर्ण रक्कम न भरल्यास भरावे लागणार्या व्याजापेक्षा कमी असते. पण तुम्हाला माहीत आहे का? की क्रेडिट कार्ड ईएमआयमध्ये नमूद केलेल्या व्याजाव्यतिरिक्त १८ टक्के अतिरिक्त पैसे देखील भरावे लागतात. फायनान्शिअल एक्सप्रेसने यासंदर्भात माहिती दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा