मागील आठवड्यातील ‘भय इथले संपत नाही’ (अर्थवृत्तान्त, १७ फेब्रुवारी) लेखातील वाक्य होते – ‘निफ्टी निर्देशांक २२,८०० चा स्तर राखण्यास अपयशी ठरल्यास, ‘भय इथले संपत नाही’ अशी स्थिती निर्माण होईल, त्यातून निफ्टी निर्देशांक २२,२०० ते २१,८०० पर्यंत घरंगळत जाऊ शकतो…’ दुर्दैवाने सरलेल्या सप्ताहातील, शुक्रवारी निफ्टी निर्देशांकाने २२,१०६ चा नीचांक नोंदवत, साप्ताहिक बंद २२,२०० स्तराखालीच दिला. निफ्टीने आपल्या कृतीतून, बाबांनो भय इथले संपले नसल्याचे गत लेखातील भाकीत प्रत्यक्षात आणले.
येणाऱ्या दिवसात निफ्टी निर्देशांकाने २१,८०० चा स्तर राखणे नितांत गरजेचे आहे. असे झाल्यास निफ्टी निर्देशांकावर क्षीण स्वरूपाची सुधारणा अपेक्षित असून तिचे प्रथम वरचे लक्ष्य हे २२,५०० व द्वितीय वरचे लक्ष्य २२,८०० ते २३,१०० असे असेल.
या मंदीच्या तडाख्यात कंपन्यांचे प्रवर्तक भांडवली बाजारातून आपल्या स्वतःच्या कंपन्यांचे समभाग खरेदी करत आहेत. ही सरलेल्या सप्ताहातील बातमी होती. प्रवर्तकांची ही कृती त्यांना आपल्या कंपनीच्या उज्ज्वल भवितव्याबद्दल खात्री असल्याचे द्योतक आहे. असे समभाग हे आपले आजचे ‘बातमीतील समभाग’ असणार आहेत.
१) दीपक नायट्रेट लिमिटेड
२८ फेब्रुवारीचा बंद भाव- १,८५१.३० रु.
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- १,८०० रु.
वरील बातमीच्या सकारात्मक परिणामात, समभागाकडून १,८०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,००० रुपये, द्वितीय लक्ष्य २,२०० रुपये असे असेल. अन्यथा मंदीच्या रेट्यात, सकारात्मक बातमीच निष्फळ ठरून समभाग १,८०० रुपयांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,७०० रुपयांपर्यंत घसरेल.
२) एनसीसी लिमिटेड
२८ फेब्रुवारीचा बंद भाव- १७५ रु.
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- १७० रु.
वरील बातमीच्या सकारात्मक परिणामांत, समभागाकडून १७० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २०० रुपये, द्वितीय लक्ष्य २२० रुपये असे असेल. अन्यथा मंदीच्या रेट्यात, सकारात्मक बातमीच निष्फळ ठरून समभाग १७० रुपयांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर तोडत १५० रुपयांपर्यंत घसरेल.
३) पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड
२८ फेब्रुवारीचा बंद भाव- २८१.३० रु.
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- २७० रु.
वरील बातमीच्या सकारात्मक परिणामात, समभागाकडून २७० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३०० रुपये, द्वितीय लक्ष्य ३२५ रुपये असे असेल. अन्यथा मंदीच्या रेट्यात, सकारात्मक बातमीच निष्फळ ठरून समभाग २७० रुपयांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर तोडत २५० रुपयांपर्यंत घसरेल.
लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.
ashishthakur1966@gmail.com
अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि ‘इच्छित लक्ष्य’ या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.