मागील लेखामध्ये आपल्याला फ्युचर्स व ऑप्शन्स हा विषय वित्तीय बाजाराच्या दुय्यम बाजार ह्या प्रकारातील एक भाग आहे हे आपणास समजले असेल. शेअर बाजारातील व्यवहार जोखमीचे आहेत हे सर्वश्रुत आहे पण योग्य प्रशिक्षण घेतले असता या मार्केटमध्ये प्रचंड पैसाही आहे हे समजून घेतले पाहिजे.
कोणताही व्यवसाय करताना आपला मुख्य व एकमेव उद्देश पैसे कमावणे हा असतो. आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोणतीही वस्तू अगदी कांदे बटाटे ते सोनेचांदी आपण ज्या किमतीमध्ये विकत घेतो व भाववाढ झाली असता खरेदी किमतीपेक्षा जास्त भावामध्ये विकतो व नफा मिळवतो ,तसेच ज्या किमतीमध्ये विकतो त्यापेक्षा भाव कमी झाले की विकत घेतो व नफा कमावतो. (शेअर बाजारात फ्युचर्स व ऑप्शन्स ह्या प्रकारामध्ये आपण अगोदर विकून नंतर खरेदी करू शकतो.)

आणखी वाचा: Money Mantra: फ्यूचर्स आणि ऑप्शन्स म्हणजे नेमकं काय?

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
inflation rate declined
किरकोळ महागाई दराची उसंत, नोव्हेंबरमध्ये ५.४८ टक्क्यांवर घसरण
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
loksatta money motra article Growth and Value strategy
तुमची रणनीती काय? ‘ग्रोथ की व्हॅल्यू’
Mangal Vakri 2025
मंगळ देणार पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींना मिळणार प्रत्येक कामात यश
Executive Trustee of Bharatiya Unit Trust and apex body of mutual funds A P Kurian
बाजारातली माणसं : फंड उद्योगाचा पायाचा दगड, ए. पी. कुरियन

आज आपण फ्युचर्स व ऑप्शन्स व कॅश मार्केटमधील फरक व त्यानंतर फ्युचर्स व ऑप्शन्स या मार्केटमधले धोके समजावून घेऊ. गुंतवणूकदार किंवा ट्रेडर्स यांना समजण्यासाठी आवश्यक असणारे फरक

Money Mantra: गुंतवणूकदार किंवा ट्रेडर्स याना समजण्यासाठी आवश्यक असणारे फरक
गुंतवणूकदार किंवा ट्रेडर्स याना समजण्यासाठी आवश्यक असणारे फरक

शेअर बाजारात मुख्यतो सहभागी सामान्य गुंतवणूक करणारे किंवा ट्रेडिंग करणारे तसेच खूप मोठे गुंतवणूक करणारे किंवा ट्रेडिंग करणारे असतात ज्यामध्ये बाहेरच्या देशातील, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्वेस्टर्स (FII) देशांतर्गत इन्स्टिट्यूशनल इन्वेस्टर्स (DII) तसेच झुनझुनवाला, दमाणी असे मोठे लोक असतात ह्यांना HNI (high networth investors ) म्हणतात, तसेच संस्थात्मक गुंतवणूक करणारे, म्युच्युअल फंड्स इत्यादी असतात.. या दोन्ही प्रकारच्या लोकांना पैसे हवे आहेत पण सामान्य लोक व संस्थात्मक गुणवंतुकदार, म्युच्युअल फंड्स ,FII,DII,HNI इत्यादीमध्ये खालील मुख्य फरक असल्याने या दोन्ही प्रकारच्या लोकांची तुलना करता येत नाही व सामान्य लोकांकडून पैसे मोठे बलाढ्य लोकांकडे जात असतात.
१. FII,DII,HNI यांच्याकडे प्रचंड पैसे आहेत
२. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शेअर्स आहेत
३. त्यांना लागणारी अत्यल्प दलाली
४. त्यांच्याकडे नुकसान सहन करण्याची क्षमता असल्याने व पैसे , शेअर्स असल्याने बाजाराला वळवू शकण्याची क्षमता
५. त्यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान आहे
६ . त्यांच्याकडे हेजिंग करण्याची क्षमता आहे
७ .त्यामुळे तोट्यामधले व्यवहार बंद न करता विविध डावपेच वापरून जसे put खरेदी

करणे ,कॉल विकणे व विविध ऑप्शन्सचे डावपेच वापरत शेवटी व्यवहार नफ्यामध्ये रूपांतरित करतात. सर्व साधारण रिटेलर्स यांना अल्प कॅपिटल ,नुकसान सहन करण्याची क्षमता नसल्याने तोट्यात व्यवहार बंद करावे लागतात. पण योग्य प्रशिक्षण घेतले असता, सामान्य गुंवतवणूकदार या मोठ्या लोकांकडून जाणवत असलेल्या दिशेनुसार व्यवहार केल्यास सामान्य लोक सुद्धा खूप पैसे कमाऊ शकतात.
मुळात आपला निर्णय जर चुकत असेल तर आपले कॅपिटल कसे सुरक्षित राहील , बाजाराची दिशा ओळखताना झालेली चूक आपले आर्थिक नुकसान करणार नाही यासाठी कोणते डावपेच आखावे इत्यादी गोष्टींचा विचार करावा.
ऑप्शन्सचा खरा व मुख्य उद्देशच हा आहे की आपले कॅपिटल, त्याची किंमत कमी होऊ नये व त्यात सतत वाढ होत राहावी. संस्थात्मक गुंतवणूकदार, म्युच्युअल फंड्स FII,DII,HNI इत्यादीमध्ये व सामान्य गुंतवणूक करणारे किंवा ट्रेडिंग करणारे यांच्यामध्ये हा एक मोठा फरक आहे. यापुढे आपण आपली गुंतवणूक काहीही झाली तरी कमी होता कामा नये यासाठी या अभ्यास श्रृंखलेचा व प्रत्येक अभ्यास वर्गाचा काळजीपूर्वक वाचन करूया.

Story img Loader