भारतीय आयुर्विमा महामंडळा (LIC) ची जीवन लाभ पॉलिसी आजकाल ग्राहकांना खूप आवडू लागली आहे. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन एलआयसी नेहमीच चांगल्या पॉलिसी बाजारात आणत असली तरी आजकाल “जीवन लाभ” ही ग्राहकांची खास पसंती बनली आहे. ही विमा संरक्षणासह चांगली बचत योजना देखील आहे, ज्यामुळे ग्राहकांमध्ये तिचं प्रचंड आकर्षण आहे. या पॉलिसी अंतर्गत जर तुम्ही दरमहा ७५७२ रुपये जमा केले तर तुम्हाला मुदतपूर्तीच्या वेळी ५४ लाख रुपये मिळतील. चला तर पॉलिसीविषयी जाणून घेऊ यात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जीवन लाभ पॉलिसी

जर तुम्ही १८ ते ५९ वयोगटातील व्यक्ती असाल तर तुम्ही हा जीवन विमा पर्याय निवडू शकता. उदाहरणार्थ, २५ वर्षांच्या कालावधीसाठी जीवन लाभ पॉलिसी घेणार्‍या २५ वर्षीय व्यक्तीला दरमहा ७४०० रुपये किंवा दररोज २५२ रुपये जमा करावे लागतील, जे एका वर्षासाठी ९०,८६७ रुपये असतील आणि परिपक्वतेच्या वेळी तुम्ही विम्याची रक्कम मिळवू शकता. यामध्ये तुम्हाला रिव्हर्शनरी बोनस आणि अतिरिक्त बोनस देखील मिळतो.

हेही वाचाः ”हिंडेनबर्गने अदाणी समूहाचेच नव्हे, तर शेअर बाजाराचेही नुकसान केले”, गौतम अदाणी म्हणाले, ”समूहाची बदनामी…”

तसेच कंपनी बोनस दर बदलत असते. याचा परिणाम तुम्हाला मॅच्युरिटीवर मिळणाऱ्या बोनसवरही होतो. तुम्ही तुमच्या मुलांसाठी ही पॉलिसी खरेदी करू शकता. ८ ते ५९ वयोगटातील लोक जीवन लाभ पॉलिसीत गुंतवणूक करू शकतात. पॉलिसी १०, १३, १६ वर्षांच्या कालावधीसाठी घेतली जाऊ शकते.

हेही वाचाः Sahara India Refund Portal : आता सहारात अडकलेले पैसे त्वरित मिळणार, नेमकी प्रक्रिया काय?

नॉमिनीलाही बोनससह मृत्यूचा लाभ

LIC जीवन लाभ पॉलिसी अंतर्गत गुंतवणूकदार त्यांच्या आवडीनुसार प्रीमियमची रक्कम ठरवू शकतात. जर पॉलिसीधारक मॅच्युरिटीपर्यंत जिवंत राहिला तर त्याला मॅच्युरिटी तसेच विमा रक्कम, बोनस आणि इतर अनेक फायदे मिळतात. जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर नॉमिनीलाही बोनससह मृत्यूचा लाभ मिळतो.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lic best policy 54 lakhs profit on maturity on investment of 7572 jivan labh vrd