सुधाकर कुलकर्णी- सर्टिफायीड फायनान्सियल प्लॅनर, पुणे

आपला अकाली मृत्यु झाला तर आपल्या कुटुंबियांची आपल्या पश्च्यात शक्य होईल तेव्हढी आर्थिक तरतूद करून ठेवणे यासाठी आपण प्रयत्नशील असतो कारण अशा अकाली जाण्याने कुटुंबियांना मानसिक, भावनिक तसेच आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. यातील मानसिक व भावनिक समस्यांची तीव्रता काळाच्या ओघात कमी होत असते. मात्र अकाली मृत्यूमुळे निर्माण होणारी आर्थिक समस्या ही कुटुंबियांसाठी मोठी चिंतेची बाब असते. असे असले तरी मृत व्यक्तीने आपल्या हयातीत योग्य अशी आयुर्विमा पॉलिसी घेतली असेल तर कुटुंबियांची आर्थिक समस्या मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकते आणि हाच आयुर्विमा पॉलिसी घेण्यामागचा मूळ उद्देश असतो.

New Home Investment, Tax Exemption,
करावे कर समाधान : नवीन घरातील गुंतवणूक आणि कर सवलत
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Why did the stock market fall before Diwali
Money Mantra : दिवाळीच्या आधी मार्केट का घसरलं?
international market investment
मार्ग सुबत्तेचा : आंतरराष्ट्रीय गुंतवणूक करताना….
Health Insurance, CIS in Health Insurance, Health news,
Money Mantra : हेल्थ इन्शुरन्समध्ये CIS काय असतं? ते का महत्त्वाचं आहे?
jayant Patil, wealth, assembly election 2024
जयंत पाटील यांच्या संपत्तीत ३३ लाखांची वाढ
Loneliness-Free Seoul
एकाकी मृत्यू म्हणजे काय? त्यांची संख्या का वाढतेय? ते रोखण्यासाठी कोट्यवधींची गुंतवणूक कशासाठी?
unified pension scheme
Money Mantra: युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे काय? याचा फायदा कोणाला मिळणार आहे?

आयुर्विमा पॉलीसीतून खालील प्रमाणे दोन प्रकारे क्लेम मिळू शकतात

१) डेथ क्लेम
२) मॅच्युरिटी क्लेम

यातील डेथ क्लेममुळे पॉलिसीधारकाच्या मृत्यू नंतर ( मृत्यू पॉलिसी कालावधीत झाल्यास ) वारसास ज्या प्रकारची लाईफ इन्श्युरन्स पॉलिसी असेल त्या प्रकारे क्लेम मिळतो. जर पॉलिसी कालावधीनंतर पॉलिसीधारक हयात असेल तर पॉलिसीधारकास ज्या प्रकारची लाईफ इन्श्युरन्स पॉलिसी असेल त्या प्रकारचा मॅच्युरिटी क्लेम मिळतो.

आयुर्विमा पॉलिसीचे प्रामुख्याने तीन प्रकार असून त्यानुसार डेथ आणि मॅच्युरिटी क्लेम मिळत असतो कसे ते आता पाहू.

१) टर्म इन्श्युरन्स पॉलिसी: या पॉलिसीधारकाच्या वारसास डेथ क्लेम मिळतो, मात्र पॉलिसीधारकास मॅच्युरिटी क्लेम मिळत नाही. खरे तर हीच पॉलिसी घेणे जास्त योग्य असते, मात्र अज्ञानाने किंवा चुकीची माहिती मिळाल्याने ही पॉलिसी घेतली न गेल्याचे मोठ्याप्रमाणावर दिसून येते. या पॉलिसीतून कमीत कमी वार्षिक प्रीमियममध्ये जास्तीत जास्त कव्हर (विमा संरक्षण मिळत असते. उदा: ३० वर्षे वयाच्या व्यक्तीस सुमारे रु.१० हजार ते १२ हजाराच्या वार्षिक प्रीमियम मध्ये एक कोटी रुपयांचे कव्हर ३० वर्षे कालावधीसाठी मिळू शकते. या पॉलिसीमुळे पॉलिसीधारकास मुदतीनंतर जरी काहीही रक्कम मिळणार नसली (मॅच्युरिटी क्लेम ) तरी पॉलिसी कालावधीत मृत्यू झाल्यास वारसास रु. एक कोटीचा डेथ क्लेम मिळत असल्याने कुटुंबियांच्या आर्थिक समस्या मोठ्याप्रमाणावर सुटू शकतात. शिवाय, आपण आपल्या उत्पन्नानुसार हवे तेवढे कव्हर घेऊ शकता (साधारणपणे आपल्या वार्षिक उत्पन्नच्या २० पट इतके कव्हर मिळू शकते).

हेही वाचा… Money Mantra: जन धन योजना कशासाठी?

यात पोलिसी कालावधी (टर्म) संपल्यावर पॉलिसीधारकास काहीही रक्कम मिळत नसल्याने आपण भरलेल्या प्रीमियमची रक्कम वाया जाते या समजाने अशी पॉलिसी घेण्यास लोक फारसे उत्सुक नसतात व विमा एजंटसुद्धा या पॉलिसीची शिफारस करत नाहीत. परंतु, आता लोकांमध्ये आयुर्विमा पॉलिसी घेण्याबाबत बऱ्यापैकी जागरूकता आली आहे, त्यामुळे टर्म इन्श्युरन्स पॉलिसी घेण्याचे प्रमाण विशेषत: सुशिक्षित तरुणात वाढत असल्याचे दिसून येते. किमान भरलेला प्रीमियम तरी पॉलिसीचा कालावधी (टर्म) संपल्यावर परत मिळावा, तो वाया जाऊ नये असे वाटत असेल तर रिटर्न ऑफ प्रीमियम पॉलिसी घेता येते मात्र अशा रिटर्न ऑफ प्रीमियम पॉलिसीचा प्रीमियम जवळपास दुप्पट असतो, त्यातून प्रीमियमची रक्कम मिळत असली तरी या गुंतवणुकीवर कुठलाही परतावा मिळत नाही.

उदा: आपण रु.२० हजाराची रिटर्न ऑफ प्रीमियम ३० वर्षे टर्म असणारी पॉलिसी घेतली आणि पॉलिसीधारक ३० वर्षानंतर हयात असेल तर त्याला क्लेम पोटी रु. ६,००,००० एवढी रक्कम मिळेल. याउलट प्युअर टर्म पॉलिसी घेतल्यास वार्षिक रु.१० हजार इतका प्रीमियम भरावा लागेल व उर्वरित रु. १० हजार प्रत्येक वर्षी पुढील ३० वर्षे अनुक्रमे बँकेत, हायब्रीड म्युचुअल फंड व इक्विटी म्युचुअल फंडात गुंतविल्यास रु.९.५ लाख, सुमारे रु.१६.५ लाख व रु.२५ लाख ( ७%. १०% व१२% रिटर्न गृहीत धरून) मिळतील व मिळणारे विमा कव्हर दोन्ही पॉलिसिंसारखेच असेल.

२) इन्डोव्हमेंट पॉलिसी: या पॉलिसीधारकाचा जर पॉलिसी कालावधीत मृत्यू झाला तर वारसाला पॉलिसी कव्हर अधिक तोपर्यंत जमा झालेला बोनस इतकी रक्कम डेथ क्लेम पोटी मिळू शकते. उदा: एखाद्याने वयाच्या ३० व्या वर्षी रु. ५ लाख कव्हर असणारी पॉलिसी ३० वर्षे मुदतीसाठी घेतली असेल आणि या पॉलिसीचा वार्षिक प्रीमियम सुमारे रु.२५,००० इतका असेल आणि त्याचप्रमाणे अशा पॉलिसीधारकाचा कुठल्याही कारणाने वयाच्या ४०व्या वर्षी मृत्यू झाला तर वारसाला सुमारे रु.५ लाख अधिक साधारणपणे एका लाखाला प्रती वर्षी रु.५००० बोनस या हिशोबाने यात रु.२.५ लाख असा एकूण रु.७.५ लाख इतका डेथ क्लेम मिळू शकेल.

हेही वाचा… Money Mantra : वैयक्तिक कर्जाचे फायदे आणि तोटे काय? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

(बोनस रक्कम कमी अधिक असू शकते) आणि जरी अशी व्यक्ती ३० वर्षांचा पॉलिसी कालावधी संपताना हयात असेल तर त्या व्यक्तीस सुमारे रु.२० लाखाचा मॅच्युरिटी क्लेम मिळेल. यात जर मनी बॅक पॉलिसी घेतली असेल तर डेथ क्लेम व मॅच्युरिटी क्लेमची रक्कम कमी असेल. याव्यतिरिक्त इन्डोव्हमेंट पॉलिसीत मनी बॅक व होल लाईफ असे आणखी दोन प्रकार आहेत त्यांचे क्लेम काही वेगळ्या पद्धतीने सेटल होतात.

३) युनिट लिंक्ड इन्श्युरन्स पॉलिसी (युलीप): या पॉलिसीतून वार्षिक प्रीमियमच्या कमीतकमी १० पट तर जास्तीतजास्त ४० पट इतके कव्हर मिळू शकते. यात प्रीमियम मधील रकमेतून मॉर् टॅलीटी चार्जेस, फंड मॅनेजमेंट चार्जेस , अलोटमेंट चार्जेस व पॉलिसी अ‍ॅडमीन चार्जेस वजा जाता उर्वरित रक्कम आपण ज्या प्रमाणात जोखीम घेऊ इच्छिता त्याप्रमाणे गुंतविली जाते.

समजा एखाद्याने वयाच्या ३० व्या वर्षी प्रतिवर्षी रु. एक लाख प्रीमियम असणारी ३० वर्षे मुदत असणारी पॉलिसी घेण्याचे ठरविले तर त्याला कमीतकमी रु.१० लाख व जास्तीतजास्त रु. ४ ० लाख एवढे कव्हर मिळू शकेल. समजा त्याने रु. १० लाख इतके कव्हर असणारी पॉलिसी घेतली असेल आणि त्याचा वयाच्या ४० वर्षी मृत्यू झाला तर वारसास गुंतवणुकीनुसार असणारी फंड व्हॅल्यू किंवा कव्हर(जे या पॉलिसीचे रु.१० लाख आहे) यातील जास्त असणाऱ्या रक्कमेचा डेथ क्लेम मिळेल. यातील फंड व्हॅल्यू गुंतवणुकीचा निवडलेला पर्याय व त्यावेळची युनिटची असणारी एनएव्ही (नेटअसेट व्हॅल्यू ) यावर अवलंबून असेल. जर पॉलिसीधारक पॉलिसीची मुदत संपताना हयात असेल तर त्यालाही त्यावेळची पॉलिसीची फंड व्हॅल्यू किंवा कव्हर यातील जास्त असणारी रक्कम मॅच्युरिटी क्लेम पोटी मिळेल. त्या वेळची फंड व्हॅल्यू त्यावेळच्या एनएव्ही वर अवलंबून असेल.

हेही वाचा… Money Mantra: भारतात सोन्यावर कर कसा आकारला जातो?

युलीपमध्ये जास्त कव्हर असणाऱ्या पॉलिसीची फंड व्हॅल्यू कमी असणार आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. तथापि, युलीप पॉलिसीतून मिळणारा रिटर्न हा इन्डोव्हमेंट पॉलिसीतून मिळणाऱ्या रिटर्नपेक्षा जास्त असल्याचे बहुतांश वेळा दिसून येते. थोडक्यात टर्म पॉलिसीत डेथ क्लेम किती मिळू शकेल तर इन्डोव्हमेंट पॉलिसीत मॅच्युरिटी क्लेम किती मिळू शकेल याची आपल्याला माहिती असते. तर युलीप हे मार्केट लिंक्ड असल्याने नेमकी किती रक्कम क्लेम पोटी मिळेल हे सांगता येत नाही. मात्र किमान पॉलिसीकव्हर इतकी रक्कम मिळतेच. थोडक्यात, वरील तीन पर्यायांपैकी प्युअर टर्म इन्श्युरन्स पॉलिसी घेणेच हितावह असते.