सुधाकर कुलकर्णी

कोणत्याही कारणाने होणारा अकाली मृत्यू याची भीती प्रत्येकालाच असते, अशा अकाली जाण्याने कुटुंबियांना मानसिक, भावनिक तसेच आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. यातील मानसिक व भावनिक समस्या संपत नसल्या तरी काळाच्या ओघात त्यांची तीव्रता कमी होत असते. मात्र आर्थिक समस्या सोडविणे कुटुंबीयांसाठी एक आव्हान असते. असे असले तरी जर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत योग्य असी आयुर्विमा पॉलिसी घेतली असेल तर कुटुंबीयांची आर्थिक समस्या मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकते आणि हाच आयुर्विमा पॉलिसी घेण्यामागचा मूळ उद्देश असतो.

Direct tax rises 16 prcent to Rs 16.9 lakh crore in FY25
वैयक्तिक प्राप्तिकरातील वाढ अर्थव्यवस्थेसाठी वरदान; प्रत्यक्ष कर संकलन १२ जानेवारीपर्यंत १६.९० लाख कोटींवर
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
aishwarya narkar gives tips for couple to save money
“घर घ्यायचं ठरलं तेव्हा, वर्षाला २ लाख…”, संसारात पैशांची बचत कशी करावी? ऐश्वर्या नारकरांनी सांगितला अनुभव
Child marriage exposed in Alandi
पिंपरी : बालविवाहाचा प्रकार आळंदीत उघड
eps 95 pension scheme loksatta
ईपीएस-९५ वाढीव पेन्शन धोक्यात, खासगी कंपन्यांचे असहकार्य
lokmanas
लोकमानस: उपभोग, गुंतवणूक, निर्यातीत वाढ आवश्यक
nashik Dialysis center service
नाशिक महानगरपालिकेच्या दोन रुग्णालयात आता डायलिसीस केंद्र
people born on this date are so rich and wealthy
‘या’ तारखेला जन्मलेले लोक असतात अत्यंत धनवान अन् श्रीमंत, आयुष्यात कमावतात गडगंज संपत्ती

आयुर्विमा पॉलिसीतून खालील प्रमाणे दोन प्रकारे क्लेम मिळू शकतात.

  • डेथ क्लेम
  • मॅच्युरिटी क्लेम

यातील डेथ क्लेममुळे पॉलिसीधारकाच्या मृत्यू नंतर ( मृत्यू पॉलीसी कलावधीत झाल्यास ) वारसास ज्या प्रकारची लाईफ इंश्युरन्स पॉलिसी असेल त्या प्रकारे क्लेम मिळतो. तर जर पॉलिसी कालावधी नंतर पॉलिसीधारक हयात असेल तर पॉलिसीधारकास ज्या प्रकारची लाईफ इन्शुरन्स पॉलिसी असेल त्या प्रकारे क्लेम मिळतो. आयुर्विमा पॉलिसीचे प्रामुख्याने तीन प्रकार असून त्यानुसार डेथ आणि मॅच्युरिटी क्लेम मिळत असतो कसे ते आता पाहू.

१)टर्म इन्शुरन्स पॉलिसी- या पॉलिसीधारकाच्या वारसास डेथ क्लेम मिळतो मात्र पॉलिसीधारकास मॅच्युरिटी क्लेम मिळत नाही. खरे तर हीच पॉलिसी घेणे जास्त योग्य असते मात्र अज्ञानाने किंवा चुकीची माहिती मिळाल्याने ही पॉलिसी घेतली न गेल्याचे मोठ्या प्रमाणावर दिसून येते. या पॉलिसीतून कमीत कमी वार्षिक प्रीमियममध्ये जास्तीत जास्त कव्हर (विमा संरक्षण मिळत असते उदा: ३० वर्षे वयाच्या व्यक्तीस सुमारे रु.१०००० वार्षिक प्रीमियम मध्ये रु.एक कोटीचे कव्हर ३० वर्षे कालावधीसाठी मिळू शकते या पॉलिसीमुळे पॉलिसी धारकास मुदतीनंतर जरी काहींही रक्कम मिळणार नसली (मॅच्युरिटी क्लेम ) तरी पॉलिसी कालावधीत मृत्यू झाल्यास वारसास रु. एक कोटीचा डेथ क्लेम मिळत असल्याने कुटुंबीयांच्या आर्थिक समस्या मोठ्या प्रमाणावर सुटू शकतात व आपण आपल्या उत्पन्नानुसार हवे तेवढे कव्हर घेऊ शकता ( साधारणपणे आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या २० पट इतके कव्हर मिळू शकते)

आणखी वाचा-Money Mantra : गुंतवणुकीसाठी फंड निवडताय ? दहा वर्षाचा सीएजीआर बघा !

२) इंडोव्हमेंट पॉलिसी : या पॉलिसीधारकाचा जर पॉलिसी कालावधीत मृत्यू झाला तर वारसाला पॉलिसी कव्हर अधिक तो पर्यंत जमा झालेला बोनस इतकी रक्कम डेथ क्लेम पोटी मिळू शकते उदा जर एखाद्याने वयाच्या ३० व्या वर्षी रु. १० लाख कव्हर असणारी पॉलिसी ३० वर्षे मुदतीची घेतली असेल. या पॉलिसीचा वार्षिक प्रीमियम सुमारे रु.५०००० इतका असेल आणि जर अशा व्यक्तीचा कुठल्याही कारणाने वयाच्या ४०व्या वर्षी मृत्यू झाला तर वारसाला सुमारे रु.१० लाख अधिक साधारणपणे एका लाखाला प्रती वर्षी रु.५००० बोनस या हिशोबाने यात रु.५ लाख असा एकूण रु.१५ लाख इतका डेथ क्लेम मिळू शकेल. (बोनस रक्कम कमी अधिक असू शकते ) आणि जरी अशी व्यक्ती ३० वर्षांचा पॉलिसी कालावधी संपताना हयात असेल तर त्या व्यक्तीस सुमारे रु.४० लाखाचा मॅच्युरिटी क्लेम मिळेल. यात जर मनी बॅक पॉलिसी घेतली असेल तर डेथ क्लेम व मॅच्युरिटी क्लेमची रक्कम कमी असेल. याव्यतिरिक्त ) इंडोव्हमेंट पॉलिसीत मनी बॅक व व्होल लाईफ असे आणखी दोन प्रकार आहेत त्यांचे क्लेम काही वेगळ्या पद्धतीने सेटल होतात.

३) युनीट लिंक्ड इन्शुरन्स पॉलिसी (युलीप ) : या पॉलिसीतून वार्षिक प्रीमियमच्या कमीतकमी १० पट तर जास्तीतजास्त ४० पट इतके कव्हर मिळू शकते. यात प्रीमियम मधील रकमेतून मॉरटॅलीटी चार्जेस, फंड मॅनेजमेंट चार्जेस , अलोटमेंट चार्जेस व पॉलिसी अॅडमीन चार्जेस वजा जाता उर्वरित रक्कम आपण ज्या प्रमणात जोखीम घेऊ इच्छिता त्याप्रमाणे गुंतविली जाते. समजा एखाद्याने वयाच्या ३० वर्षी प्रतिवर्षी रु.५०००० प्रीमियम असणारी ३० वर्षे मुदत असणारी पॉलिसी घेण्याचे ठरविले तर त्याला कमीतकमी रु.५ लाख व जास्तीतजास्त रु. २० लाख एवढे कव्हर मिळू शकेल. समजा त्याने रु. १० लाख इतके कव्हर असणारी पॉलिसी घेतली असेल आणि त्याचा वयाच्या ४० वर्षी मृत्यू झाला तर वारसास गुंतवणुकीनुसार असणारी फंड व्हॅल्यू किंवा कव्हर (जे या पॉलिसीचे रु.१० लाख आहे) यातील जास्त असणारी रक्कमेचा डेथ क्लेम मिळेल. यातील फंड व्हॅल्यू गुंतवणुकीचा निवडलेला पर्याय व त्यावेळची युनिटची असणारी एनएव्ही (नेटअसेट व्हाल्यू ) यावर अवलंबून असेल. जर पॉलिसीधारक पॉलिसीची मुदत संपताना हयात असेल तर त्यालाही त्यावेळची पॉलिसीची फंड व्हॅल्यू किंवा कव्हर यातील जास्त असणारी रक्कम मॅच्युरिटी क्लेम पोटी मिळेल. त्या वेळची फंड व्हॅल्यू त्यावेळच्या एनएव्ही वर अवलंबून असेल. युलीपमध्ये जास्त कव्हर असणाऱ्या पॉलिसीची फंड व्हॅल्यू कमी असणर आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. तथापि युलीप पॉलिसीतून मिळणारा रिटर्न हा इंडोव्हमेंट पॉलिसीतून मिळणाऱ्या रिटर्नपेक्षा जास्त असल्याचे बहुतांश वेळा दिसून येते.

आणखी वाचा-Money Mantra : अनुमानित कराच्या तरतुदी काय असतात?

थोडक्यात टर्म पॉलिसीत डेथ क्लेम किती मिळू शकेल तर इंडोव्हमेंट पॉलिसीत मॅच्युरिटी क्लेम किती मिळू शकेल याची आपल्याला माहिती असते. तर युलीप हे मार्केट लिंक्ड असल्याने नेमकी किती रक्कम क्लेम पोटी मिळेल हे सांगता येत नाही मात्र किमान पॉलिसी कव्हर इतकी रक्कम मिळतेच.

असे असले तरी वरील तीन पर्यायांपैकी टर्म पॉलिसी घेणे नक्कीच योग्य असते. पुढील लेखात आपण वरील तिन्ही पॉलिसींचा क्लेम कसा दाखल करावा व त्या बाबतचे नियम तसेच आपण दाखल केलेला क्लेम कोणत्या कारणाने नाकारला जाऊ शकतो याची माहिती घेऊ.

Story img Loader