आपल्या भारतीत कुटुंब पद्धत असल्याने प्रत्येक जण आपापल्या कुटुंबावर प्रेम करतो आणि त्यांची काळजी घेतो. आपल्या कुटुंबातील प्रत्येकाच्या सुरक्षेची भीती आपल्या सर्वांनाच सतावत असते. तुमची ही भीतीच विमा कंपन्यांसाठी व्यवसाय बनते. कुटुंब सुरक्षित ठेवण्यासाठी विमा घेणे आणि कुटुंबाची प्रत्येक मागणी पूर्ण करण्यासाठी कर्ज घेणे ही आजकाल प्रत्येक माणसाची सवय झाली आहे. परंतु जर तुमच्याकडे लाइफ इन्शुरन्स पॉलिसी असेल तर तुम्ही त्या पॉलिसीवर सहज आणि कमी व्याजावर कर्ज कसे घेऊ शकता.

कर्जाची रक्कम सरेंडर मूल्यावर अवलंबून असते

तुम्ही बँका किंवा बिगर बँकिंग वित्तीय संस्थांमार्फत (NBFC) पॉलिसीवर कर्ज घेऊ शकता. पॉलिसीचा प्रकार आणि त्याचे सरेंडर मूल्य कर्जाच्या रकमेवर अवलंबून असते. साधारणपणे कर्जाची रक्कम पॉलिसीच्या सरेंडर मूल्याच्या ८० ते ९० टक्के असू शकते. तुमच्याकडे मनी बॅक किंवा एंडोमेंट पॉलिसी असेल तेव्हा इतके पैसे उपलब्ध होतील.

superbugs 4 million death till 2050
सावधान, अँटिबायोटिक्स घेताय? २०५० पर्यंत होऊ शकतो चार कोटी लोकांचा मृत्यू; कारण काय?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
iphone 16 Pro models assembling and manufacturing in india
अन्वयार्थ : उत्पादनातील ‘आयफोनिक’ संधी
Advanced Artificial Intelligence Techniques for Flood Forecasting
कुतूहल : पुराच्या अंदाजासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
loksatta editorial on union minister nitin gadkari says no more subsidies on electric vehicles
अग्रलेख : विजेला धक्का
Reduce GST on mixed fuel vehicles Union Minister Nitin Gadkari appeals to state finance ministers
मिश्र इंधन वाहनांवरील जीएसटी कमी करा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची राज्यांच्या अर्थमंत्र्यांना आवाहन
How to manage debt, debt, loan,
 कर्ज व्यवस्थापन कसे कराल?
VIP Security in India
VIP Security in India : झेड प्लस, झेड, वाय प्लस, वाय आणि एक्स दर्जाच्या सुरक्षेत काय फरक असतो? जाणून घ्या!

सरेंडर मूल्य म्हणजे काय?

तुमची आयुर्विमा पॉलिसी परिपक्व होण्याआधीच तुम्ही तुमची पॉलिसी सरेंडर केली, तर तुम्ही त्या पॉलिसी अंतर्गत भरलेल्या प्रीमियममधून काही शुल्क वजा केल्यावर तुम्हाला काही पैसे परत मिळतात आणि या रकमेला सरेंडर केले जाते, त्याला सरेंडर मूल्य म्हणतात.

व्याजदर किती असते?

तुम्हाला ज्या व्याजदराने कर्ज मिळेल ते तुमच्या प्रीमियमची रक्कम आणि भरलेल्या प्रीमियमच्या संख्येवर अवलंबून असेल. जीवन विम्यावरील कर्जाचा व्याजदर १०-१२% च्या दरम्यान असतो.

कर्ज परत न केल्यास पॉलिसी रद्द होऊ शकते

पॉलिसीधारकाला पॉलिसीवर घेतलेल्या कर्जावरील व्याजाव्यतिरिक्त प्रीमियम देखील भरावा लागेल. कर्जाची परतफेड किंवा प्रीमियम भरण्यात चूक झाल्यास तुमची विमा पॉलिसी संपुष्टात येईल. विमा कंपनीला पॉलिसीच्या सरेंडर व्हॅल्यूमधून मुद्दल आणि थकबाकी व्याजाची रक्कम वसूल करण्याचा अधिकार आहे.

असे घेता येणार कर्ज

जीवन विमा पॉलिसीवर कर्ज घेण्यासाठी तुम्हाला एक अर्ज भरावा लागेल, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या जीवन विमा पॉलिसीची सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे सादर करावी लागतील. कर्जाच्या रकमेसाठी कर्जदाराला फॉर्मसह बँकेचा कॅन्सल चेक देखील द्यावा लागेल.