कौस्तुभ जोशी

· फंड घराणे – कोटक ब्लूचिप इक्विटी फंड

overseas debt become expensive due to the depreciating rupee
रुपयाच्या अवमूल्यनामुळे परदेशातून कर्ज उभारणी महाग
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Sensex gains , stock market rise , Sensex ,
मार्केट-वेध : शेअर बाजारात सेन्सेक्सची २२५ अंशांची कमाई; मात्र सत्रारंभीच्या मुसंडीला, दिवसअखेर पुन्हा गळती!
How to invest in mutual fund SIPs the right way
म्युच्युअल फंडामध्ये योग्य पद्धतीने गुंतवणूक कशी करावी? जाणून घ्या, SIP कशी सुरू करावी?
Fund Jigyaza Wealth Creation Through SIP
फंड जिज्ञासा – ‘एसआयपी’च्या माध्यमातून संपत्ती निर्मिती
Third consecutive losing session for Sensex Nifty
‘आयटी’ वगळता सारेच घसरणीला! सेन्सेक्स-निफ्टीसाठी सलग तिसरे नुकसानीचे सत्र
Microfinance institutions loan arrears rise to 4 3 percent print eco news
बचतगटांच्या परतफेडीत कसूर; मायक्रोफायनान्स संस्थांची कर्ज थकबाकी वाढून ४.३ टक्क्यांवर
Torres Jewelry House scam investment a new pattern of fraud foreign company
टोरेस ज्वेलरी हाऊस घोटाळा… परदेशी कंपनीकडून फसवणुकीचा नवा पॅटर्न! सव्वा लाख गुंतवणूकदारांवर पस्तावण्याची वेळ का आली?

· फंडाचा प्रकार – इक्विटी फंड

· फंड कधी लॉन्च झाला ? – ०४/०२/२००३.

· एन. ए. व्ही. (३ जानेवारी २०२४ रोजी) ग्रोथ पर्याय – ४६६ रुपये प्रति युनिट

· फंड मालमत्ता (३१ डिसेंबर २०२३ रोजी ) – ७३३३ कोटी रुपये.

· फंड मॅनेजर्स – हर्ष उपाध्याय.

फंडाची स्थिरता (३१ डिसेंबर २०२३ )

· पोर्टफोलिओ टर्नओव्हर १४. ३७ %

· स्टॅंडर्ड डिव्हिएशन १२.४६ %

· बीटा रेशो ०.८९ %

पोर्टफोलिओ टर्नओव्हर म्हणजे एखाद्या फंड मॅनेजरने फंड योजनेमध्ये शेअरची सतत खरेदी विक्री खरेदी सुरू ठेवणे. जेवढे जास्त खरेदी विक्री व्यवहार घडतील तेवढाच फंडाचा खर्च वाढतो. पोर्टफोलिओ टर्नओव्हर जास्त असणे फारसे चांगले मानले जात नाही.

स्टॅंडर्ड डिव्हिएशन म्हणजेच एखाद्या फंडाचा परतावा गेल्या तीन वर्षात किती स्थिर राहिला आहे त्याचे निर्दशक आहे. म्हणजेच दोन फंडाची तुलना करता ज्या फंडाचा हा आकडा कमी आहे तो फंड साधारणतः पुढील काळात दुसऱ्या फंडापेक्षा तसेच परतावे देण्याची शक्यता आहे उदाहरण घेऊया फंड X आणि फंड Y यांनी १२% परतावा मागच्या पाच वर्षात दिला आहे. जर स्टॅंडर्ड डिव्हिएशन चा फंड X चा आकडा Y पेक्षा कमी असेल तर फंड X पुढील काळात तसाच सर्वसाधारण परतावा देऊ शकतो तर, फंड Y मधून मिळणारा परतावा बदलू शकतो.

हेही वाचा… Money Mantra : डेट म्युच्युअल फंड काय असतो?

बीटा म्हणजेच गेल्या तीन वर्षात फंडाने दिलेल्या परताव्यावरून भविष्यात तो फंड किती वर किंवा खाली जाईल याचा अंदाज लावणे, जेवढी बीटा व्हॅल्यू कमी असेल तेवढाच फंड भरवशाचा.

शार्प रेश्यो म्हणजे अधिक रिटर्न्स मिळवण्यासाठी फंडाने किती जोखीम घेतली आहे, अधिकाधिक रिटर्न मिळवण्यासाठी फंड मॅनेजरने घेतलेली जोखीम अधिक असेल तर त्याचे प्रतिबिंब यामध्ये उमटते.

तुमच्यासाठी हा फंड महत्त्वाचा का ?

कोटक ब्लूचिप फंड सहा प्रमुख मुद्द्यांच्या आधारे आपली गुंतवणुकीची पद्धत ठरवतो.

  1. फक्त लार्ज कॅप कंपन्यांचा विचार न करता बाजारातील प्रत्येक क्षेत्रातील निवडक कंपन्या आपल्या पोर्टफोलिओ असाव्यात.
  2. ज्या कंपन्यांवर अधिक कर्जाचा बोजा नाही अशा कंपन्या आपल्या पोर्टफोलिओचा भाग असाव्यात.
  3. बाजारातील चढउतारांचा ज्यांनी यशस्वीरित्या सामना केला आहे अशा कंपन्या पोर्टफोलिओ मध्ये असाव्यात.
  4. अचानकपणे व्यवसायामध्ये एखादे संकट आल्यास कंपनीची तग धरून राहण्याची क्षमता चांगली असावी.
  5. कायदेशीर बाबींमध्ये कंपनीचे नाव चांगले असावे.
  6. कंपनीचे मनुष्यबळ व्यवस्थापन चांगले असावे.

रिस्को मिटरचा विचार करायचा झाल्यास ‘Very High’ म्हणजेच सर्वाधिक जोखीम असलेल्या श्रेणीमध्ये हा फंड मोडतो.

हेही वाचा… Money Mantra : प्रश्न तुमचे उत्तरं तज्ज्ञांची

३ जानेवारी २०२४ रोजी फंडाचा परतावा (CAGR पद्धतीने)

· एक वर्ष – २०.८९ %

· दोन वर्षे – १०.७८ %

· तीन वर्षे – १६.५३ %

· पाच वर्षे – १६.५१ %

· दहा वर्षे – १५.१६ %

· फंड सुरु झाल्यापासून – १२.८७ %

फंडाने गुंतवणूक कुठे केली आहे ?

पोर्टफोलिओ बनवण्यासाठी अंदाजे ५० कंपन्यांची निवड केली जाते. यातील ६० ते ७० टक्के कंपन्या निफ्टी५० मधून निवडल्या जातात व उर्वरित कंपन्या निफ्टी ज्युनिअर आणि मिडकॅप क्षेत्रातील निवडल्या जातात. कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी यापेक्षा नेमक्या कोणत्या क्षेत्रात करू नये याचा निर्णय महत्त्वाचा असतो असे फंड मॅनेजरचे धोरण राहिले आहे. पोर्टफोलिओमध्ये उगाचच बदल न करता घेतलेले शेयर्स दीर्घकाळपर्यंत ठेवावेत असे नियोजन फंड मॅनेजर्स कडून केले जाते. बऱ्याचदा उत्तम व्हॅल्यू असलेल्या निवडक कंपन्यांमध्ये तेजी दिसून येते यामुळे मिडकॅप कंपन्या पोर्टफोलिओ मध्ये ठेवण्यावर फंड मॅनेजर भर देत असल्याचे दिसते.

आज ज्या कंपन्या निफ्टी १०० म्हणजेच मिडकॅप आहेत त्या भविष्यात निफ्टी५० मध्ये जाव्यात अशी क्षमता असलेल्या कंपन्या निवडल्या जातात. गेल्या दहा वर्षात अशा एकोणीस कंपन्या या फंडाच्या पोर्टफोलिओ मध्ये होत्या यावरूनच फंडाचे यश दिसून येते.

हेही वाचा… Money Mantra : राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अनिवासी भारतीय नागरिकांनाही कशी ठरते फायदेशीर?

कोणत्या क्षेत्रात किती टक्के गुंतवणूक केली आहे ?

३० नोव्हेंबर रोजी उपलब्ध असलेल्या माहितीनुसार पोर्टफोलिओ मध्ये एकूण ५९ कंपन्यांचा समावेश होता. यापैकी एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, लार्सन, ॲक्सिस बँक, मारुती सुझुकी, आयटीसी, टाटा कन्सल्टन्सी, महिंद्रा अँड महिंद्रा या आघाडीच्या दहा कंपन्या होत्या.

प्रायव्हेट बँकिंग सेक्टर मध्ये १९%, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर ११%, पेट्रोलियम आणि रिफायनरी ६.५ %, वाहन उद्योग ६.५ %, एफएमसीजी ५.५ %, फार्मा कंपन्या ५ % या प्रमुख क्षेत्रात गुंतवणूक केली आहे.

‘एस.आय.पी.’तील दीर्घकालीन परतावे

तुम्ही या फंडात दरमहा एक हजार रुपयांची गुंतवणूक केली असती तर

· एक वर्षापासून एसआयपी केली असती तर ३०.७८ %

· दोन वर्षे १९.९६ %

· तीन वर्षे १६.११ %

· पाच वर्षे १८.१३ %

· सलग दहा वर्ष १४.३१ %

असा स्थिर परतावा मिळालेला दिसतो.

नुकत्याच एका निर्णयाद्वारे फंड घराण्यांनी जाहिरात करताना दहा वर्षाच्या सरासरी रिटर्नचा (CAGR) समावेश त्यात करावा अशी मार्गदर्शक सूचना करण्यात आली. त्यानुसार निवडक फंडांचे विश्लेषण या लेखमालिकेतून केले जात आहे. फंड योजनेत गुंतवणूक करावी असा सल्ला देणे हा या लेखमालिकेचा उद्देश नाही. या फंडात गुंतवणूक करताना सर्व जोखीम विषयक माहिती वाचून आपल्या जबाबदारीवरच गुंतवणूक करावी.

Story img Loader