या आधीच्या तीन लेखात आपण इक्विटी फंड, हायब्रीड फणे व डेट फंड बाबतही माहिती घेतेली आज आपण आर्बिट्राज फंड म्हणजे काय या बाबतची माहिती घेऊया. शेअर बाजारात वेळोवेळी चढ उतार होत असतात. यालाच मार्केट रिस्क असे म्हणतात. पण याचाच फायदा घेऊन नफा कमविता येतो यासाठी यासाठी आर्बिट्राज ही स्ट्रॅटेजी वापरली जाते .काय असते ही स्ट्रॅटेजी हे आता पण पाहूया.
या प्रकारामध्ये एकाच असेटची एकाच वेळी खरेदी व विक्री दोन वेगळ्या मार्केट सेगमेंट मध्ये केली जाते जेणे करून दोन्ही मार्केट मधील सबंधित असेटच्या किमतीच्या फरकातून नफा कमविता येतो. शेअर बाजारातील चढ उतारांचा फायदा घेण्यासाठी आर्बिट्राज ही स्ट्रॅटेजी वापरली जाते. ही स्ट्रॅटेजी म्युचुअल फंडाच्या ज्या स्कीममध्ये वारली जाते अशा फंडास आर्बिट्राज फंड असे म्हणतात.
हेही वाचा… Money Mantra: फंड विश्लेषण- कोटक ब्लूचिप इक्विटी फंड
यामध्ये एका सेगमेंट कमी किमतीत शेअर्स विकत घेतले जातात आणि दुसऱ्या सेगमेंटमध्ये जास्त किमतीला विकले जातात.उदाहरणार्थ कॅश मार्केट(सेगमेंट) व डेरीव्हेटीव्ह मार्केट(सेगमेंट).(फ्युचर मार्केट) हे आपण खालील उदाहरणा वरून समजून घेऊ.
समजा एखाद्या कंपनीच्या शेअरची किंमत कॅश मार्केट मध्ये रु. २२५ आणि फ्युचर्स/डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये रु.२३२ आहे. अशा वेळी आर्बिट्राज फंड मॅनेजर १०००शेअर्स (१०००X२२५ =रु. २२५०००) किंमत कॅश मार्केट मध्ये विकत घेतो तर त्याच वेळी फ्युचर मार्केट मध्ये (१०००* २३२=२३२०००) ला विकून टाकतो. अशाप्रकारे फंड मॅनेजरला प्रति शेअर रु.७ रुपये नफा होतो. म्हणजे एकूण रु.७००० इतका नफा होतो. फ्युचर्स कॉन्ट्रॅक्टची मुदत संपण्याच्या तारखेच्या आधी किंवा कोणत्याही वेळी शेअर कॅश मार्केट आणि फ्युचर मार्केट मध्ये समान किंमतीवर राहील. फ्युचर कॉन्ट्रॅक्टची सेटलमेंट मुदत संपण्याच्या तारखेपूर्वी केंव्हाही करता येते.समजा फ्युचर कॉन्ट्रॅक्टची मुदत संपताना कॅश मार्केटमध्ये शेअरची किंमत रु.२२० असी आहे व फ्युचरची किंमत रु.२२४ असेल तर कॅश मार्केटमध्ये प्रती शेअर रु.५ या नुसार रु.५००० इतका तोटा होईल परंतु फ्युचर मार्केट मध्ये प्रती शेअर रु.८ नुसार रु.८००० इतका फायदा होईल व या व्यवहारात एकूण रु.३००० इतका फायदा होईल.(रु.८०००-रु.५०००). शेअरच्या फ्युचरची किंमत ही त्या शेअरच्या (ज्याला अंडरलाईन शेअर असे म्हणतात)किमती नुसार कमी अधिक होत असते.
हेही वाचा… Money Mantra : डेट म्युच्युअल फंड काय असतो?
अशा प्रकारे दोन मार्केट मधील किमतीच्या फरकाचा फायदा घेऊन नफा कमविला जातो. आर्बिट्राज फंडवर कर आकारणी इक्विटी फंडाच्या कर आकारणी प्रमाणेच म्हणजे अल्पकालीन भांडवली नफ्यावर १५% शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स तर दीर्घकालीन नफ्यावर रु.एक लाखा वरील रकमेवर १०% लॉंगटर्म कॅपीटल गेन टॅक्स लागू होतो. यातून मिळणारा रिटर्न साधारणपणे ७.५ ते ८.५ % इतका मिळू शकतो मात्र होणारी कर आकारणी इक्विटी म्युचुअल फंडाप्रमाणे होत असल्याने डेट फंडातील गुंतवणुकीपेक्षा यातील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. ज्यांना बाजारात फारशी जोखीम घ्यायचे नाहीये अशांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.