शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याकडे सर्वसामान्य नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. म्युच्युअल फंडात दीर्घोद्देशी गुंतवणूक करून पैशाला लाभणाऱ्या चक्रवाढीच्या (कंपाऊंडिंग) बळाची किमया प्रत्येकाने अनुभवली पाहिजे, असे मत ‘डीएसपी म्युच्युअल फंडा’चे समभागसंलग्न गुंतवणुकीचे प्रमुख विनीत सांबरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले. सांबरे डीएसपी म्युच्युअल फंडाच्या तीन योजनांमधील २५,००० कोटी रुपयांचे व्यवस्थापन करतात. त्यांच्याशी साधलेला हा खास संवाद…

१) महागाई नियंत्रणासाठी केल्या गेलेल्या रेपो दरवाढीमुळे बँकांचे ठेवींवरील व्याज दरदेखील ८ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहेत, तर दुसरीकडे भांडवली बाजारातील परतावा गेल्या वर्षात ५ टक्के राहिला आहे, तर विसंगतीबाबत काय सांगाल?

Priyanka Gandhi Kolhapur, Priyanka Gandhi criticizes Narendra Modi, Priyanka Gandhi,
सत्ता, पैशाचा गैरवापर करत मोदींकडून महाराष्ट्रात सरकार – प्रियांका गांधी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
David Shaw has used concept of quant when managing assets of his investors
बाजारातली माणसं : हेज फंड बाजारातली एक रहस्यकथा – डेव्हीड शॉ
Maharashtra, Delhi Politics, Small State,
लिलीपुटीकरण…
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : अर्थव्यवस्थेत वाढ, मग रुपयाची घसरण का?
Rights and Duties of the Opposition in democracy
चतु:सूत्र : लोकशाहीत विरोधी पक्षाची गरज
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
  • इतिहासात डोकावले तर बाजारात चढ-उतार सुरूच असतात हे लक्षात येईल. रशिया-युक्रेन युद्ध किंवा अमेरिकेतील कर्जपेच असो अथवा मध्यवर्ती बँकांकडून व्याज दरवाढीसारख्या घटनांचे, भांडवली बाजारात अल्पावधीसाठी बऱ्या-वाईट प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविकच आहे. मात्र बाजाराने आतापर्यंत अशा अनेक प्रतिकूल घटना पचवल्या आणि उत्तम कंपन्यांनी दमदार कामगिरी करत आतापर्यंत चांगला परतावा दिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसह कंपन्यांनीदेखील जोखीम समजून घेऊन योजना आखल्या तर दोहोंना नक्कीच जोखीम कमी करून चांगला परतावा आणि प्रगती साधता येईल. सध्या जागतिक पातळीवर मंदीचे सावट मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र त्या तुलनेने भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम मर्यादित आहे. भारतीय कंपन्यांचा आर्थिक पायादेखील मजबूत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी बाजारातील अस्थिरतेचा फायदा घेऊन प्रत्येक पडझडीला संधी समजून दीर्घकालीन गुंतवणुकीचा दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून गुंतवणूक करणे उपयुक्त ठरेल. नेमक्या कोणत्या उद्देशाने मी गुंतवणूक करतो आहे? किती कालावधीसाठी मी गुंतवणूक करणार आहे? त्यासाठी किती जोखीम घेण्याची माझी तयारी आहे? हे प्रश्न स्वतःला विचारले पाहिजेत. या प्रश्नांची उत्तरे मिळाली की, ॲसेट अलोकेशन लक्ष दिले पाहिजे. अर्थात गुंतवणूकयोग्य पैसा सुयोग्य पर्यायांमध्ये विभागून गुंतवला पाहिजे. त्यानुसारच मग स्मॉल कॅप फंड किंवा मिड कॅप फंडात किती गुंतवणूक करायची हे निश्चित करता येते. या तंत्रानुसार समजा, स्मॉल कॅप फंडात २० टक्के निधी गुंतवण्याचे निश्चित केले असेल आणि बाजार पडझडीत तो निधी कमी झाला म्हणजे १७-१८ टक्क्यांपर्यंत खाली आला तर गुंतवणूकदारांनी तो वाढवून पुन्हा २० टक्क्यांपर्यंत नेला पाहिजे. जेव्हा बाजार पुन्हा वरच्या दिशेने धावेल तेव्हा या तंत्राचा नक्कीच खूप फायदा होईल. यासाठी आर्थिक शिस्त महत्त्वाची आहे.

सध्या आपण व्यवस्थापित करत असलेले फंड किती? त्यांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता किती?

  • सध्या मी डीएसपी स्मॉल कॅप फंड, डीएसपी मिडकॅप आणि डीएसपी फोकस फंडांचे व्यवस्थापन करतो. या तीन फंडांच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता सुमारे ३ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे २५,००० कोटी रुपयांच्या आसपास आहे. अल्पकाळात शेअर बाजार किती वाढेल अथवा पडेल याचा अंदाज बांधणे प्रत्येक वेळी शक्य नसते. त्यामुळे जेव्हा बाजार खूप पडेल तेव्हा गुंतवता येईल या हेतूने फंडातील काही रोख राखून ठेवता येत नसते. सध्या हे प्रमाण ५ ते ६ टक्के ठेवले आहे. गुंतवणूकदार आमच्याकडे शेअर बाजारात पैसे गुंतवण्यासाठी देत असतात. त्यामुळे रोख जास्त न बाळगता तो निधी बाजारातच गुंतलेला असतो.

सध्या आपल्या फंडाची गुंतवणूक कोणत्या उद्योग क्षेत्रामध्ये सर्वाधिक आहे?

  • सर्वप्रथम कंपनीचे फंडामेंटल आणि पुढील पाच वर्षांची वाटचाल कशी राहील यानुसार ‘बॉटम अप’ पद्धतीचा वापर करून आम्ही कंपनीची निवड करतो. त्या त्या काळात अधिक आशादायी वाटत असणाऱ्या सेक्टरमधील अधिक कंपन्यांची निवड केली जाते. सध्या आमच्या फंडातील सर्वाधिक गुंतवणूक आरोग्य निगा, बँकिंग, वित्त या क्षेत्रांत आहे. गेल्या तीन वर्षांत वाहननिर्मिती क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला होता. मात्र आगामी वर्ष आशादायी वाटत आहेत. त्यामुळे त्यात थोडी गुंतवणूक आहे. याव्यतिरिक्त मटेरियल सेक्टर म्हणजेच कृषीसंबंधित व्यवसाय, गृहनिर्माण क्षेत्राची कामगिरी सध्या चांगली आहे, त्यामुळे बांधकाम क्षेत्राशी निगडित कंपन्यांचा समावेश आहे. ज्या कंपन्यांचा आरओसीई म्हणजेच रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड चांगला आहे, त्या कंपन्यांची निवड आम्ही आमच्या फंडातील गुंतवणुकीसाठी करतो.

म्युच्युअल फंडाचा पोर्टफोलिओ कसा बांधला पाहिजे?

  • बऱ्याचदा गुंतवणुकीचा निर्णय हा फंडाने आधी दिलेला परतावा बघून घेतला जातो. मात्र बाजारातील कल कायम बदलत असतो. त्यानुसार प्रत्येक क्षेत्राच्या कामगिरीचे चक्रदेखील बदलत असते. शिवाय प्रत्येक फंड मॅनेजरच्या कामगिरीचेदेखील चक्र असते. याचा अर्थ फंड मॅनेजरची स्वतःची जी एक गुंतवणूक शैली असते ती सदासर्वकाळ फंडासाठी योग्य असेलच असे नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी पोर्टफोलिओ बांधणी करताना फंड मॅनेजरची विचारसरणीदेखील (इन्व्हेस्टमेंट फिलॉसॉफी) देखील जाणून घ्यायला हवी. आम्ही आमच्या प्रत्येक फंड मॅनेजरचे फ्रेमवर्क डॉक्युमेंट तयार केले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी दिलेला निधी आम्ही कुठे गुंतवतो आहोत? त्यासाठी कसा विचार करतो आहोत? का त्या कंपनीची निवड केली? अशा गोष्टींचा त्यात समावेश असतो. यातून पारदर्शकतादेखील येते. शिवाय फंड मॅनेजर आणि गुंतवणूकदार म्हणून आपले गुंतवणूक उद्दिष्ट एकच आहे हे लक्षात आल्यावर गुंतवणूकदार निश्चिंत होऊन दीर्घकाळ गुंतवणूक करू शकतो. गुंतवणूकदारांनी अनेकानेक फंडांमध्ये ‘एसआयपी’ सुरू केल्या म्हणजे जास्त गुंतवणूक किंवा परतावा मिळेल असे नसते. कारण वेगवेगळ्या फंडांच्या योजना या एकाच ठिकाणी निधी गुंतवत असतात. गुंतवणूकदारांनी फंडाच्या कामगिरीचा अभ्यास करून निवड केली पाहिजे. संख्येने जास्त फंडांत गुंतवणूक करण्यापेक्षा उत्पन्नस्रोत वाढला, की त्याच फंडातील गुंतवणूक वाढवत नेणे जास्त व्यावहारिक आणि फायदेशीर आहे.

देशांतर्गत पातळीवर जीडीपी वाढ किंवा जागतिक पातळीवरील घटनांचा भांडवली बाजारावर परिणाम होत असतो. हा परिणाम काही वेळा सकारात्मक, तर काही वेळा नकारात्मक असतो, अशा वेळी गुंतवणूकदारांनी काय करावे?

  • बाजार अल्पावधीत वरच्या दिशेने झेपावणार आहे अथवा खाली पडणार आहे हे आम्ही या क्षेत्रातील तज्ज्ञ असूनदेखील निश्चित सांगू शकत नाही. बाजारात आसपासच्या प्रत्येक घटनेचे पडसाद उमटत असतात आणि नाण्याला जशा दोन बाजू असतात त्याप्रमाणेच नकारात्मक आणि सकारात्मक अशा त्याला दोन्ही बाजू असतात. सध्या आपण म्हणतोय की, जागतिक पातळीवर मंदीची छाया आहे; पण त्यामुळे मागणी कमी झाल्याने वस्तू आणि सेवांच्या किमतीदेखील कमी झाल्या आहेत. त्यामुळे गेल्या वर्षात वाढत्या खर्चामुळे कंपन्यांच्या नफ्यात घसरण झाली होती. आता वस्तूंच्या कमी झालेल्या किमतीमुळे नफा वाढेल. म्हणजे मंदीचा असादेखील परिणाम आपल्याला बघायला मिळेल. मध्यवर्ती बँकांनी दरवाढीचे चक्र थांबवले असून आता आपण ते पुन्हा कमी होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. म्हणजेच आपण एका वाईट परिस्थितीतून बाहेर पडलो आहोत. भारताचा विचार केल्यास, सरकारकडून भांडवली खर्च केला जातोय. गुंतवणूक वाढत आहे आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे खासगी गुंतवणुकीत त्या प्रमाणात वाढ दिसत नाही. ती जेव्हा वाढेल तेव्हा मात्र अर्थव्यवस्थेचा आतापेक्षा अधिक वेग वाढेल. त्यामुळे नजीकच्या काळात काही घटनांचा बाजारावर प्रतिकूल परिणाम होणार असला तरी दीर्घकाळाचा विचार करता तो सकारात्मक राहील आणि दोन अंकी परतावादेखील मिळवून देईन अशी आशा आहे.

कोणत्या क्षेत्रावर गुंतवणूकदारांनी लक्ष केंद्रित करायला हवे?

  • सध्या आरोग्य निगा क्षेत्र खूप आशादायी दिसत आहे. दोन वर्षांत खर्च वाढल्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांच्या कमाईवर परिणाम दिसून आला. सध्या हे क्षेत्र १२ ते १३ टक्के दराने वाढते आहे. या क्षेत्रातील कंपन्यांचे मूल्यांकनदेखील वाजवी पातळीवर आहे. केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत किंवा मेक इन इंडियासारख्या योजनांमुळे पायाभूत सुविधा क्षेत्रातील कंपन्या (इन्फ्रास्ट्रक्चर), अभियांत्रिकी, संरक्षण क्षेत्रावर लक्ष ठेवायला हवे आणि या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या काही फंडांमध्ये म्हणजेच सेक्टोरल फंडात गुंतवणूक करायला हवी. अर्थात हे करताना त्या क्षेत्रातील जोखमीचा नक्की विचार व्हायला हवा.

म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ बांधताना कसा बांधला पाहिजे? नेमकी पैशांची गरज असताना आणि त्याच वेळी बाजार खाली असेल तर काय करायला हवे?

  • डायव्हर्सिफाइड ॲसेट अलोकेशन महत्त्वाचे आहे. शेअर बाजार आणि सोने या दोहोंच्या किमती एकाच वेळी खाली असतील असे नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करताना वेगवेगळ्या गुंतवणूक साधनांमध्ये गुंतवणूक करून जोखीम कमी केली पाहिजे. विविध कालावधींत ज्या प्रतिकूल घटना घडतात, त्यांचा सगळ्याच गुंतवणूक साधनांवर एकसारखा परिणाम करत नाहीत. जेव्हा कधी पैशांची निकड असेल तेव्हा अधिक परतावा असलेल्या गुंतवणूक साधनांमधून निधी काढता येईल.

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राबद्दल काय सांगाल?

  • या क्षेत्राचा भारतात खूप मोठा ट्रेंड राहिला आहे. देशाकडे संपूर्ण जगाला सॉफ्टवेअर सेवा पुरविण्याची क्षमता वेळोवेळी आपल्या कंपन्यांनी सिद्ध केली आहे. त्यामुळे कायमच माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राबद्दल मी सकारात्मक राहिलो आहे. कुशल तंत्रज्ञ आणि अल्प मोबदला (लो काॅस्ट) अशा अनेक गुणवैशिष्ट्यांमुळे हे क्षेत्र वाढत आहे. शिवाय जगातील उत्तमोत्तम तंत्रज्ञान विकसित आणि आत्मसात करण्याची कंपन्यांची क्षमता आहे. जागतिक पातळीवरील मंदीच्या सावटामुळे सध्या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. येत्या दोन तिमाहीपर्यंत त्याचा कंपन्यांच्या कमाईवर परिणाम दिसून येईल. बाजारात सध्या ‘टाइम करेक्शन’ सुरू झाले आहे. त्यामुळे बाजाराचे मूल्यांकन सध्या वाजवी पातळीवर आहे. शिवाय गेल्या काही महिन्यांपासून परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून काढता पाय घेतला होता, ते आता पुन्हा सक्रिय झाले आहेत. गुंतवणूकदारांनी बाजारातील चक्रवाढीची ताकद (कंपाऊंडिंग) समजून घेणे आवश्यक आहे. इक्विटीमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनी निश्चितच चक्रवाढीची जादू अनुभवली असेल. मात्र गुंतवणूकदारांनी शेअर बाजार, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना शिस्त आणि दीर्घकाळ गुंतवणूक सातत्य राखले पाहिजे.

विनीत सांबरे यांच्या मुलाखतीचा पूर्ण व्हिडीओ बघण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करा.

(gaurav.muthe@expressindia.com)