मुंबई शेअर बाजार ९ जुलै १८७५ ला सुरू झाला. मात्र १८७५ ते १९८६ अशी १११ वर्षे बाजारात निर्देशांक ही संकल्पना अस्तित्वात नव्हती. १९७८-७९ हे पायाभूत वर्ष विचारात घेऊन २ जानेवारी १९८६ ला निर्देशांकाची बाजाराला प्रथम ओळख झाली. त्या दिवशी हा निर्देशांक पहिल्यांदा प्रसिद्ध झाला.

निर्देशांक अस्तित्वात नव्हता तेव्हा बाजाराचा कल कसा जोखला जायचा? त्या समयी बाजारात होकायंत्राचे काम हे ठरावीक दिग्गज समभाग करीत असत. तेव्हा प्रथम टाटा डिफर्ड आणि नंतर टाटा ऑर्डिनरी या समभागांनी बाजारात निर्देशांकाचे काम केले. कोलकात्याच्या बाजारात तर फक्त मोटर हा शब्द उच्चारला की काम व्हायचे. याच स्तंभातून या अगोदर ‘बाजारातील अदृश्य खेळाडू’ (अर्थ वृत्तान्त, २२ मे २०२३) म्हणून निर्देशांकाची ओळख करून दिली होती. आज क्षणभर या शेअरला माणूस समजा आणि कोणा एकाचा चेहरा विचारात घेण्याऐवजी डिफर्ड हा अनेकांचा मुखवटा होता. त्या मुखवट्यामागे फक्त पारशी, गुजराती, मारवाडी हे चेहरे नव्हते तर अनेक जातीतल्या सटोडियांचा तो मुखवटा होता.

My Portfolio Phoenix Mills Ltd
माझा पोर्टफोलियो : फिनिक्स मिल्स लिमिटेड
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
fake branch of state bank open in Chhattisgarh
आमची कुठेही शाखा नाही!
Should buy gold or diamond jewellery on Diwali
Money Mantra : दिवाळीत सोन्याचे की हिऱ्याचे दागिने घ्यावेत?
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले, “मला एक उदाहरण दाखवा की…”
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…

संपूर्ण बाजाराला आपल्या तालावर नाचवणारा शेअर म्हणजे ‘टाटा डिफर्ड.’ १९१७ ला टाटा स्टीलकडे ४८,७५० डिफर्ड शेअर होते. त्यापैकी २६,२५० शेअर प्रत्येकी ३० रुपये दर्शनी किंमत असलेले ३७० रुपये अधिमूल्य घेऊन देण्यात आले. डिफर्ड हा लाडावून ठेवलेला शेअर होता. त्याचे काय लाड व्हायचे? तर त्याला लाभांश दर वेगळा असायचा. कंपनीच्या नफ्यानुसार त्यात बदल व्हायचे. मग कधी ७.८० रुपये लाभांश, कधी १२९ रुपये, तर कधी ९३.१० रुपये असा लाभांश दिला जायचा. कंपनीकडे ९ टक्क्यांचे फर्स्ट प्रीफरन्स शेअर, १७.८० टक्के लाभांशाचे सेकंड प्रीफरन्स शेअर असाही प्रकार होता.

आणखी वाचा-मार्ग सुबत्तेचा : आंतरराष्ट्रीय गुंतवणूक करताना….

वर्ष १९३५-३६ ला ऑर्डिनरी शेअरची दर्शनी किंमत ७५ रुपये होती. वर्ष १९७६-७७ ला ७५ रुपयांवरून दर्शनी किंमत १०० रुपये करण्यात आली. वर्ष १९८९-९० ला दर्शनी किंमत १० रुपये आणि त्यानंतर २९ जुलै २०२२ ला दर्शनी किंमत १ रुपया करण्यात आली.

वर्ष १९५१ ला संचालक मंडळाने निर्णय घेतला आणि डिफर्ड शेअरचे रूपांतर ऑर्डिनरी शेअरमध्ये केले गेले. संचालक मंडळाला हा निर्णय का घ्यावा लागला. तर वर्ष १९५० ला कंपनीने सरकारकडे कंपनीच्या नूतनीकरणासाठी आणि विस्तारासाठी कर्ज मागितले. सरकारने अट घातली जर डिफर्ड शेअरचे रूपांतर कंपनीने ऑर्डिनरी शेअरमध्ये केले तरच सरकार कंपनीला कर्ज उपलब्ध करून देईल. आणि मग काही वर्षे कंपनीच्या भागधारकांमध्ये दोन पक्ष निर्माण झाले. एक डिफर्ड शेअर असलेले भागधारक आणि दुसरा पक्ष ऑर्डिनरी शेअर असलेले भागधारक. त्यातून जे रामायण घडले ते खूपच तांत्रिक स्वरूपाचे आहे. त्यामुळे त्यांचा बारकाईने उल्लेख करण्याची आवश्यकता वाटत नाही. मात्र हे प्रमाण कसे ठरवायचे किती शेअरला किती शेअर मिळायला हवे, शेअरचे मूल्य कसे ठरवायचे, पुस्तकी किंमत की बाजारातली किंमत, पुस्तकी किंमत योग्य असते का? बाजारातील किंमत योग्य असते का? मग बाजारातील किमतीवरून वाद सुरू झाले. बाजारभाव कंपनीचे योग्य मूल्यमापन करतो का? कंपनीचे मूल्यमापन कंपनी अस्तित्वात आहे, अस्तित्वात राहणार आहे, अशी भूमिका घेऊन मूल्यमापन करायचे की कंपनीने गाशा गुडांळला. कंपनीचे लिक्विडेशन करण्याचे ठरवले तर मग कंपनीची मालमत्ता, त्या मालमत्तेत पुन्हा घसारा आकारणी झाल्यानंतर असलेली किंमत विचारात घ्यायची की मालमत्तेचे फेरमूल्यांकन करून नंतर मग मूल्यांकन करायचे? एक नाही दोन नाही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.

संचालक मंडळाने एक अत्यंत चांगला निर्णय घेतला. त्यांनी त्या वेळचे भारत सरकारचे ॲटर्नी जनरल एम. सी. सेटलवाड यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेऊन निर्णय घेण्यासाठी मध्यस्थ म्हणून योग्य व्यक्तींची नेमणूक केली की ती व्यक्ती वादातीत होती.

आणखी वाचा-शेअर बाजारात दिवाळीपूर्वीच आतिषबाजी!

इतिहासाच्या पुस्तकाला पहिले पान नाही. विज्ञानाच्या पुस्तकाला शेवटचे पान नाही. तसेच भांडवली बाजाराचे पुस्तक आहे. त्या पुस्तकाला शेवटचे पान नाही. त्यामुळे कंपन्यांचे एकत्रीकरण असो की कंपन्यांचे विलगीकरण असो किंवा कंपनीच्या शेअरची बाजारातली सूचिबद्धता रद्द करण्याची प्रक्रिया असो, टाटा स्टीलच्या संचालकांनी जे त्या काळी केले त्याचे अनुकरण आज एखादी कंपनी करेल असा विचार करणे देखील वेडेपणा ठरेल. टाटा स्टीलने जगातली दोन महायुद्धे बघितलेली आहेत. टाटा डिफर्ड हा अनेकांचा लाडका शेअर सट्टेबाजी करण्यासाठी होता. मुळात पोलाद उत्पादन ही एक वस्तू (कमॉडिटी) व्यवसाय आहे आणि त्या काळात कमॉडिटी बाजार अस्तित्वात नव्हता. लोकांना तर सट्टा खेळायचा असतो. मग जगाच्या बाजारात काय परिस्थिती आहे. टाटा स्टीलला त्यांच्या स्टीलच्या उत्पादनात काही अडचणी निर्माण झाल्या आहेत का? की पुरवठा प्रचंड आणि मागणी नाही अशी परिस्थिती आहे. एखाद्या देशात युद्ध सुरू झाले म्हणून पोलादाची मागणी वाढली किंवा दुसऱ्या एखाद्या देशातला कारखाना काही कारणामुळे बंद पडला किंवा पोलाद उत्पादनाला कच्चे खनिज लागते, त्याचबरोबर कोळसा मोठ्या प्रमाणावर लागतो, त्याचा तुटवडा निर्माण झाला किंवा वीज पुरवठा पुरेशा प्रमाणात नाही. असंख्य कारणे सटोडियांकडे उपलब्ध असतात किंवा कोणतेही कारण नसताना लहर आली म्हणून सट्टा खेळला, असेही करणारे सटोडिये असतातच. या सर्वांची गरज टाटा डिफर्ड हा शेअर पूर्ण करत होता.

अहमदाबाद इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेने टाटा डिफर्ड या कंपनीचा केस स्टडी केला आहे. वर्ष १९७७ ला प्रसिद्ध झालेल्या एका पुस्तकात हे सर्व प्रकरण उपलब्ध आहे. एस.सी.कुच्छल हे फायनान्स मॅनेजमेंट या पुस्तकाचे लेखक आहेत ते अहमदाबादला इन्स्टिटयूटला सिनिअर प्रोफेसर होते. त्यांनी ऋणनिर्देश म्हणून चोक्सी या मुंबईच्या चार्टड अकाउंटट फर्मचा उल्लेख केला आहे. कंपनीचे घटनापत्रक, कंपनीचे नियम पत्रक, लाभांश वाटपाचे नियम या सगळ्यांचा या निमित्ताने दोन्ही पक्षांनी अत्यंत बारकाईने अभ्यास केला होता.

आणखी वाचा-शेअर बाजारात तेजीला पूर्णविराम की स्वल्पविराम?

संगीताचा एखादा राग कोणत्या अंगाने जातो हे सांगितलेले असते. त्यामुळे हा लेख बाजार हाच मुख्य विषय केंद्रित ठेवून स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या वेळचे बाजारभाव वाचले तर आश्चर्याचा धक्काच बसतो. १९४६ ला ऑर्डिनरी शेअर ६३५ रुपयाला उपलब्ध होता. तर डिफर्ड शेअर ३,६१७ रुपयाला होता. वर्ष १९४७ ला (या वर्षाचे काय महत्त्व आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही) ऑर्डिनरी शेअर ३७४ रुपयांपर्यंत खाली आला तर डिफर्ड शेअर १,८८० रुपयापर्यंत खाली आला होता. याउलट १९३० ला ऑर्डिनरी शेअरची जास्तीत जास्त किंमत ५५ रुपये तर डिफर्ड शेअर ३२७ रुपयाला होता. म्हणून बाजारातले शेअरचे भाव कंपनीचे योग्य मूल्यमापन करतात की नाही, मूल्यमापन योग्य नाही म्हणूनच सटोडियांना खेळण्याची संधी मिळते.

एचडीएफसी लिमिटेडचे जन्मदाते दिवंगत एच. टी. पारेख यांनी टाटा डिफर्डवर लिहिताना असे लिहिले होते की, टाटा डिफर्ड म्हणजे मुंबई शेअर बाजार. ५० वर्षे एखाद्या शेअरने बाजाराचे नेतृत्व करावे हे सोपे नाही. त्यानंतर मात्र नेतृत्व करणारे शेअर बदलत गेले. त्याचा मागोवा पुढे केव्हातरी.

Story img Loader