वर्षाच्या सुरुवातीला बाजारातील असणारा उत्साह आता शंका आणि भीतीच्या समीप येऊन ठेपला आहे. शुक्रवारी बाजार बंद होताना सेन्सेक्स आठवड्याभरात ४,००० अंशांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १,१०० अंशांनी कोसळून गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. देशांतर्गत आणि जागतिक या दोन्ही विषयांचा गुंतवणूकदारांना अभ्यास ठेवावा लागतो याची प्रचीतीच यानिमित्ताने आली आहे. एखाद्या कंपनीची आर्थिक प्रगती होत असेल तर त्याचा लाभ त्या भागधारकांना प्रत्येक वेळी होतोच असे नाही, हे गुंतवणुकीतील तत्त्व पुन्हा एकदा लक्षात घ्यायला हवे. या आठवड्यात बाजार पडण्यामागील प्रमुख कारणांचा आढावा घेऊया.

परदेशी गुंतवणूकदारांनी फिरवलेली पाठ

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला थोडा का होईना परदेशी गुंतवणूकदारांनी खरेदीचा उत्साह दाखवायला सुरुवात केली. मात्र पुन्हा एकदा परदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला. गेल्या आठवड्यात त्यांनी जवळपास १२,००० कोटी रुपये मूल्याचे समभाग विकून पैसे काढून घेतले. आशियाई बाजारपेठांतील निरुत्साह जपानचा निक्केई, चीन, हाँगकाँग हे सगळेच निर्देशांक उतरले आहेत. रिझर्व्ह बँकेचा आलेला ताजा अहवाल अर्थव्यवस्थेसंबंधी नकारात्मक चित्र निर्माण करणारा आहे. रिझर्व्ह बँकेकडील परकीय चलनाचा साठा दोन अब्ज डॉलरने कमी होऊन ६५२ अब्ज डॉलरपर्यंत खालावला आहे.

How useful are tax-saving investments
मार्ग सुबत्तेचा : कर वाचवणारी गुंतवणूक किती उपयुक्त?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Gen Beta
Gen Beta (2025-2039):आजपासून दहा दिवसांनी होणार ‘Gen Beta’ चा जन्म; पिढ्यांचे वर्गीकरण कोणी आणि का केले?
Shocking video of girl heart attack during dance on stage video goes viral on social media
“मरण कधी येईल सांगता येत नाही” डान्स करताना स्टेजवर कोसळली ती पुन्हा उठलीच नाही; नेमकं काय घडलं? VIDEO आला समोर
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Dhananjay munde
Dhananjay Munde : खातेवाटप जाहीर झाल्यानंतर धनंजय मुंडे यांची पोस्ट चर्चेत; म्हणाले,”मी…”
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?
Bullet Train Bridge Collapse in Anand Gujarat
Bullet Train Bridge Collapse : बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळला, तीन मजूर ठार; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, बचावकार्य जारी

आणखी वाचा-मार्ग सुबत्तेचा : कर वाचवणारी गुंतवणूक किती उपयुक्त?

फेडरल रिझर्व्हची बैठक आणि रुपयाची घसरगुंडी

रुपयाने प्रतिडॉलर ८५ रुपयांची पातळी ओलांडली असून भारतातील परदेशी गुंतवणूकदारांच्या मानसिकतेमध्ये बदल होऊ लागला आहे. भारतीय बाजारात पैसे ठेवण्यापेक्षा योग्य त्या संधीची वाट बघण्यासाठीच समभाग विकून ते मोकळे होत आहेत, अशी ही एक वदंता आहे. ‘फेड’चे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी शेअर बाजारातील घडामोडींना आणखी फोडणी देताना महागाई आणि व्याजदरावरील आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाव टक्क्याने व्याजदर कमी केल्यानंतर आणखी व्याजदर कमी करणे हितावह ठरणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. येत्या वर्षात चार वेळा तरी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपातीची शक्यता असताना आता याला लगाम लागू शकतो.

भारतीय बाजाराचे महाग असणे

गोल्डमन सॅक या अमेरिकेतील वित्तसंस्थेने सेन्सेक्स आणि निफ्टीचे २०२५ च्या अखेरीस समाधानकारक आकडे दाखविले असले तरीही, सध्या कंपन्यांच्या नफ्याची आकडेवारी आणि कंपन्यांच्या शेअरच्या किमतीमध्ये तफावत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यावर आंतरराष्ट्रीय बाजारात अस्थिरता वाढली आहे, याची आपण आवर्जून नोंद घ्यायला हवी. ट्रम्प यांनी चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर १० टक्के तर मेक्सिको आणि कॅनडामधून येणाऱ्या वस्तूंवर २५ टक्के आयात शुल्क वाढवण्याचा घेतलेला निर्णय अधिकच गोंधळाची स्थिती निर्माण करणार आहे.

आणखी वाचा-बाजारातील माणसं – पैशाची गुलामी झुगारणारा गुंतवणूकपंथ : वाहेई टाकाडा

निफ्टी एकीकडे आणि आयपीओ बाजार दुसरीकडे!

भारतीय शेअर बाजाराचा आयपीओचा सुकाळ अजून संपत नाहीये. येत्या आठवड्यात जवळपास डझनभर कंपन्यांचे समभाग आयपीओच्या माध्यमातून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. विविध व्यवसाय करणाऱ्या कंपन्या आयपीओद्वारे बाजारात पदार्पण करत आहेत. या कंपन्यांचे नफ्याचे आकडे आणि त्यांच्या शेअर मिळणारा प्रतिसाद यांचा एकत्रित आकडा बघितल्यावर सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी यापासून दूरच राहणे योग्य आहे, असे सुचवावेसे वाटते.

सेक्टरल म्युच्युअल फंडाकडे लक्ष द्या

गेल्या दोन वर्षांत भारतात जेवढ्या म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक झाली आहे, त्यातील घसघशीत गुंतवणूक सेक्टर किंवा थिमॅटिक फंडामध्ये झाली आहे. माहिती तंत्रज्ञान, आरोग्य क्षेत्र, इन्फ्रास्ट्रक्चर, बँकिंग आणि फायनान्शिअल सर्व्हिसेस या क्षेत्रातील फंडांकडे गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा वळवला आहे. या गुंतवणूकदारांनी आता अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. जेव्हा बाजारात चलती असते त्या वेळी असे फंड अभूतपूर्व कामगिरी बजावतात. यातील बहुतांश फंडांची कामगिरी या आणि पुढच्या तिमाहीत तितकी आकर्षक असणार नाही. ज्या गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओचा थोडासा भागच सेक्टरल फंड असतील त्यांची गोष्ट वेगळी पण घसघशीत परताव्याच्या आहारी जाऊन जर तुम्ही गुंतवणूक केली असेल तर पुनर्विचार करायला हवा.

जी गोष्ट सेक्टर फंडाची तीच गोष्ट स्मॉलकॅप आणि मिडकॅप फंडातील गुंतवणुकीची. अनेक तरुण त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक असलेल्या गुंतवणूकदारांची एकूण पोर्टफोलिओपैकी निम्म्याहून अधिक गुंतवणूक फक्त स्मॉल आणि मिडकॅप प्रकारामध्येच आहे. लार्जकॅप कंपन्या हळूहळू वाढतात म्हणून ‘आम्हाला त्या नकोत’ असा चुकीचा पवित्रा त्यांनी घेतलेला दिसतो. या पार्श्वभूमीवर पोर्टफोलिओमध्ये संतुलितपणा आणणे का महत्त्वाचे आहे, हे त्यांना येत्या सहा ते आठ महिन्यांत नक्की शिकायला मिळेल.

आणखी वाचा- इन्कम टॅक्स रिटर्न अजूनही दाखल करता येईल?

म्युच्युअल फंड योजनांतील रोकड वाढते आहे

भारतातील म्युच्युअल फंड कंपन्यांकडे जवळपास सत्तर हजार कोटी रुपये एवढी रक्कम गुंतवणुकीशिवाय पडून आहे. सर्वसाधारणपणे पोर्टफोलिओतील पाच टक्क्यांपेक्षा कमी हिस्सा रोकड स्वरूपात असतो. मात्र गेल्या काही महिन्यांत यात वाढ होत आहे. एसबीआय म्युच्युअल फंड आणि पराग पारीख म्युच्युअल फंड या दोन फंड घराण्याकडे सर्वाधिक रोकड आहे. त्यानंतर आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड, निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड आणि कोटक म्युच्युअल फंड यांच्याकडे रोकड आहे. म्युच्युअल फंड कंपन्यांचे निधी व्यवस्थापक पैसे गुंतवत नाहीत यातून एक सोपा अर्थ काढता येईल तो म्हणजे त्यांनाही भारतीय बाजार महाग वाटत आहेत का?

आपल्याला हव्या असलेल्या कंपनीकडे लक्ष असू द्या

गेल्या सहा महिन्यांची निफ्टीची आकडेवारी विचारात घेतल्यास अनेक कंपन्यांचे शेअर १५ ते २५ टक्क्यांनी खाली घसरलेले आहेत. या कंपन्यांच्या व्यापारात / व्यावसायिक प्रारूपामध्ये बदल घडून आले असतीलही पण ते दीर्घकालीन नाहीत. ज्यावेळी परदेशी गुंतवणूकदार परत येतील आणि पुढच्या तिमाहीची आर्थिक कामगिरी जाहीर होईल, त्या वेळी हेच शेअर पुन्हा एकदा उसळी घेणार आहेत. टाटा मोटर्स, एशियन पेंट, टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट, हिरो मोटो कॉर्प, रिलायन्स इंडस्ट्रीज, नेस्ले हे निफ्टीमधील तर अवेन्यू सुपर मार्केट, इंडियन ऑइल, जिओ फायनान्शिअल, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन हे निफ्टी नेक्स्ट फिफ्टी या निर्देशांकातील शेअर आकर्षक किमतीत उपलब्ध आहेत. बाजार पुढील तीन ते चार महिने असेच निराशाजनक राहिले आणि तुमच्या पोर्टफोलिओच्या दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी तुम्ही चांगल्या कंपन्यांचा समावेश करू शकत असाल तर नक्कीच या संधीचा लाभ घेता येईल.

Story img Loader