वैद्यक शास्त्रानुसार निरोगी आयुष्यासाठी आहार, विहार, व्यायाम, निद्रा या चतुःसूत्रीचा जीवनशैली म्हणून अंगीकार केल्यास शरीरावर जो सकारात्मक बदल होतो त्याला ‘बाळसं’ असं संबोधतात. वरील चतुःसूत्रीतील दोन किंवा तीन सूत्रात बिघाड झाल्यास व तो बिघाड दीर्घकाळ टिकल्यास, त्याचा विपरीत परिणाम म्हणजे शरीरावरची ‘सूज’. या दोहोंमधील साम्य म्हणजे दोन्ही प्रकारांत शरीराचा आकार हा गोल गरगरीत होत असतो. यात ‘बाळसं’ हे शरीराच्या सुदृढतेचं प्रतीक, तर या चतुःसूत्रीमध्ये झालेल्या बिघाडांची, शरीरावर उमटलेली रासायनिक प्रतिक्रिया म्हणजे ‘सूज’. आता याच ‘चतुःसूत्री संकल्पने’चा आधार घेत आपण शेअर बाजारच्या चतुःसूत्रींना विचारात घेऊ या.

पहिलं सूत्र: कंपनीची आर्थिक कामगिरी व त्यानुसार ठरणारे कंपनीचे मूल्यांकन.
दुसरं सूत्र : देशाचे औद्योगिक, व्यापार, गुंतवणूक याविषयी धोरण
तिसरं सूत्र : परदेशी म्युच्युअल फंडांचे, कंपनीविषयीचे अनुकूल अथवा प्रतिकूल गुंतवणूक धोरण (उदा. एमएससीआय कम्पोझिट इंडेक्स)
चौथं सूत्र : आकर्षक पर्याय. परदेशी म्युच्युअल फंडांना, इतर देशात गुंतवणुकीचे आकर्षक पर्याय उपलब्ध झाल्यास, उच्चांकी मूल्यांकन असलेल्या देशातील भांडवली बाजारात, ते बाजार तेजीत असताना, तिथे नफारूपी विक्री करत तो पैसा आकर्षक स्वस्त असलेल्या देशातील भांडवली बाजारात त्या पैशाचा ओघ वळवणे.

Germanys Warren Buffett Karl Hellerding
जर्मनीचा वॉरेन बफे : कार्ल हेलरडिंग
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!

आणखी वाचा-जर्मनीचा वॉरेन बफे : कार्ल हेलरडिंग

आताच्या घडीला भारताच्या बाबतीत गुंतवणुकीच्या चतुःसूत्रीतील चारही सूत्र भारताच्या विरोधात जात असल्याने निर्देशांकावरील सप्टेंबरमधील तेजी ही ‘बाळसं नसून सूज’ होती, हे आता जाहीर होणाऱ्या कंपन्यांच्या तिमाही निकालांवरून जाणवायला लागलं आहे. वरील चारही आर्थिक सूत्रांचं या व पुढील लेखात विस्तृत विवेचन आपण करणारच आहोत, पण त्या अगोदर निर्देशांकाचा सरलेल्या सप्ताहातील साप्ताहिक बंद जाणून घेऊ या.

शुक्रवारचा बंद भाव: सेन्सेक्स: ७९,४८६.३२ / निफ्टी: २४,१४८.२०

तूर्त पहिल्या सूत्राचा विचार करता, कंपनीची आर्थिक कामगिरी व त्यानुसार त्या कंपनीचे ठरणारे मूल्यांकन लक्षात घेऊ.

ही संकल्पना आपण दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदाच्या समर्पक उदाहरणावरून समजून घेऊ या.

दहीहंडी फोडणारा वरच्या थरावर एकच मुलगा असतो, पण त्याला सावरण्यासाठी, आधार देण्यासाठी जमिनीवर पाय रोवून खंबीरपणे बाळगोपाळांचं वर्तुळ उभं असतं. हे गोविंदाचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवत भांडवली बाजारात कंपनीच्या समभागांच्या किमती नवनवीन उच्चांकाला गवसणी घालत असतात. या वरच्या चढाईचा पाया हा कंपनीची उत्कृष्ट, नेत्रदीपक आर्थिक कामगिरी असते. आताच्या घडीला जुलै ते सप्टेंबर या तिमाहींचे जाहीर झालेले बहुतांश कंपन्यांचे तिमाही आर्थिक निकाल हे दारुण अपेक्षाभंग करणारे आहेत. किंबहुना समभागांचे भांडवली बाजारातील भाव हे त्यांच्या आर्थिक मूल्यांकनापेक्षा फार वरच्या स्तरावर आहेत. गोविंदाचा पायाच भुसभुशीत / ठिसूळ झाल्याने समभागांच्या वरच्या किमतींचा डोलारा पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळत आहे. हे ‘बाळसं नसून सूज’ आहे. हा मुद्दा अधोरेखित करण्यासाठी एकाच घटनेचा दाखला घेऊ या. भारताचे परममित्र, भांडवली बाजारस्नेही डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यावर तेथील भांडवली बाजारांचा निर्देशांक अगोदरच्या उच्चांकासमीप झेपावले, तर आम्ही ‘निफ्टीच्या नाकावरील २४,००० चे सूत टिकू दे रे बाबा!’ अशी मनोमन प्रार्थना करत बसलो आहोत. यातच सर्व काही आले.

आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकावर २३,८०० ते २४,५०० च्या परिघाला ‘अनन्यसाधारण महत्त्व’ आहे. निफ्टी निर्देशांक सातत्याने २४,५०० च्या स्तरावर १५ दिवस टिकल्यास निफ्टी निर्देशांकाचे प्रथम वरचे लक्ष्य २४,८०० ते २५,००० तर, द्वितीय लक्ष्य २५,३०० ते २५,६०० असेल. ही नाण्याची एक बाजू झाली.

आणखी वाचा-माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड

निफ्टी निर्देशांक सातत्याने २३,८०० स्तराच्या खाली टिकल्यास, त्याचे खालचे लक्ष्य २३,५०० ते २३,२०० असेल.

निकालपूर्व विश्लेषण

१) देवयानी इंटरनॅशनल लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल- सोमवार, ११ नोव्हेंबर

८ नोव्हेंबरचा बंद भाव : १७०.९० रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: १६९ रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून १६९ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १८२ रुपये, द्वितीय लक्ष्य २०० रुपये.

ब) निराशादायक निकाल: १६९ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १४५ रुपयांपर्यंत घसरण

२) ग्रॅफाईट इंडिया लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल : सोमवार, ११ नोव्हेंबर

८ नोव्हेंबरचा बंद भाव : ५१९.७० रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: ५०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ५०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ५४० रुपये, द्वितीय लक्ष्य ५७० रुपये.

ब) निराशादायक निकाल: ५०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ४७० रुपयांपर्यंत घसरण

३) बीएसई लिमिटेड

आणखी वाचा-दुरावलेला खरेदी उत्साह बाजारात परत दिसेल?

तिमाही वित्तीय निकाल : मंगळवार, १२ नोव्हेंबर

८ नोव्हेंबरचा बंद भाव : ४,६९३.९० रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर : ४,३५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ४,३५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ४,९५० रुपये, द्वितीय लक्ष्य ५,४०० रुपये.

ब) निराशादायक निकाल: ४,३५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ४,००० रुपयांपर्यंत घसरण

४) संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल : मंगळवार, १२ नोव्हेंबर

८ नोव्हेंबरचा बंद भाव : १७६.०८ रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: १८० रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून १८० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १९५ रुपये, द्वितीय लक्ष्य २१० रुपये.

ब) निराशादायक निकाल: १८० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १६५ रुपयांपर्यंत घसरण

५) डीसीडब्ल्यू लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल : बुधवार, १३ नोव्हेंबर
८ नोव्हेंबरचा बंद भाव : १०६.८२ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: १०० रु.
अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून १०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ११० रुपये, द्वितीय लक्ष्य १२० रुपये.
ब) निराशादायक निकाल: १०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ८५ रुपयांपर्यंत घसरण
६) गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल : बुधवार, १३ नोव्हेंबर

८ नोव्हेंबरचा बंद भाव : ९९४.०५ रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: १,००० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,००० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,१५० रुपये, द्वितीय लक्ष्य १,२५० रुपये.

ब) निराशादायक निकाल : १,००० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ९१५ रुपयांपर्यंत घसरण

लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि ‘इच्छित लक्ष्य’ या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.