कंपनी कायदा २०१३ मध्ये स्वतंत्र संचालक म्हणून नवीन तरतूद आणली आणि चांगल्या कंपन्यांनी या तरतुदींचा आपल्या भरभराटीसाठी वापर करून घेतला. घोटाळेबाजांना मात्र याचीच अडचण वाटत असावी. कंपनीमध्ये भारत पटेल, अजित पटेल आणि देवल कुमार पटेल काही वर्षे स्वतंत्र संचालक होते. जे पैसे कंपन्यांमधून वळवण्यात येत होते त्यातील काही यांच्या बँकेच्या खात्यातदेखील वळवण्यात आले. अजित पटेल हे तर २ वर्षे लेखापालांच्या समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी आपल्या लेखी जबाबात म्हटले की, त्यांना समितीच्या कुठल्याही जबाबदाऱ्या माहीत नव्हत्या आणि कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या सांगण्यानुसार त्यांनी प्रत्येक गोष्टीला मंजुरी दिली. मी स्वतः स्वतंत्र संचालक होण्यासाठी दिलेल्या परीक्षा आणि चर्चासत्रांवर खर्च केलेल्या कित्येक तास माझ्या डोळ्यांसमोरून उगाचच तरळून गेले. नवीनचंद्र पटेल हे कंपनीचे २०१९ पासून मुख्य वित्तीय अधिकारी होते, त्यांनी भांडवली बाजार नियामक ‘सेबी‘ला दिलेल्या लेखी जबाबात आपली शैक्षणिक पात्रता १२वी पास अशी सांगितली तर कंपनीने आपल्या जबाबात त्यांना वाणिज्य शाखेतील पदवीधर असल्याचे सांगितले. मात्र त्याचा पुरावा म्हणून कुठलीही कागदपत्रे देण्याचे त्यांनी टाळले. नवीन पटेल यांनी तर कहरच केला, मुख्य वित्तीय अधिकारी असूनसुद्धा कुठलीही संचालकांची किंवा लेखापालाच्या बैठकीत त्यांनी हजेरी लावली नाही. कंपनीच्या ताळेबंदाबाबत कुठलेही वित्तीय ज्ञान त्यांना नसल्यामुळे त्यांनी अनेकदा कंपनी सांगेल तिथे त्यांनी स्वाक्षरी केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा