सरकारने अल्पबचत योजनांच्या नियमांमध्ये मोठा दिलासा दिला आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात PPF, ज्येष्ठ नागरिक बचत योजना म्हणजेच SCSS आणि टाइम डिपॉझिट स्कीमच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार, सरकारने या नियमांमधील बदलांसाठी ९ नोव्हेंबरला राजपत्र अधिसूचनाही जारी केली आहे. सध्या सरकार ९ प्रकारच्या लहान बचत योजना चालवते. जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारने नेमका काय बदल केलाय ते जाणून घेऊ यात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीपीएफचा नवीन नियम काय?

पीपीएफच्या बाबतीत खाती अकाली बंद करण्याबाबत काही बदल करण्यात आले आहेत. अधिसूचनेत असे म्हटले आहे की, या योजनेला PPF (सुधारणा) योजना २०२३ म्हटले जाऊ शकते.

हेही वाचाः दिवाळीत मुहूर्त ट्रेडिंगदरम्यान शेअर बाजारात चौफेर खरेदी, सेन्सेक्स-निफ्टी तेजीत

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत बदल

ज्येष्ठ नागरिकांनी निवृत्तीनंतर एक महिन्याच्या आत या योजनेत गुंतवणूक करणे बंधनकारक होते. जो आता ३ महिन्यांत बदलला आहे. अधिसूचनेनुसार, एखादी व्यक्ती सेवानिवृत्तीचा लाभ घेतल्यानंतर तीन महिन्यांच्या आत ज्येष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत खाते उघडू शकते.

हेही वाचाः Crorepati Fisherman : ‘या’ पाकिस्तानी मच्छीमाराचे नशीब पालटले, एका माशाने रातोरात बनवले करोडपती

टाइम डिपॉझिट योजनेच्या नियमात बदल

सरकारी अधिसूचनेत असे म्हटले आहे की, जर पाच वर्षांच्या टाइम डिपॉझिट मुदत ठेव खात्यातून चार वर्षांनंतर आणि वेळेपूर्वी रक्कम काढली गेली तर, पोस्ट ऑफिस बचत योजनेच्या व्याजदराने पैसे दिले जातील. सध्याच्या नियमांनुसार, पाच वर्षांची एफडी चार वर्षांनी बंद केल्यास तीन वर्षांच्या एफडीवर आकारले जाणारे व्याज दिले जाणार आहे.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi government has changed the rules of these schemes including ppf a big relief vrd
Show comments