उच्च मध्यमवर्गीय, एका आयटी कंपनीत काम करणारा चिन्मय ! तो, पत्नी आणि त्याची दोन छोटी मुलं असा चौकोनी कुटुंब!

सहा आकडी पगार असला तरी गेले अनेक दिवस त्याच्या लक्षात येत होतं की महिन्याकाठी हातात शिल्लक फार कमी उरतेय!

Ketu Gochar 2024
Ketu Gochar 2024 : केतु ग्रहाने केला सूर्याच्या नक्षत्रात प्रवेश, ‘या’ तीन राशींना मिळणार अचानक पैसाच पैसा!
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Jeevan pramaan online process
Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?
Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कमी वयात होतात श्रीमंत, कमावतात आयुष्यात भरपूर धन-संपत्ती
rupee falls 4 paise to close at all time low of 84 43 against us dollar
रुपया ८४.४३ च्या गाळात!
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
Use UPI without Bank account NPCI launches new feature UPI Circle for family members and friends
आता बँक खाते नसलेला व्यक्ती करू शकतो UPIचा वापर; NPCIने कुटुंबातील सदस्यांसाठी सुरू केलं UPI Circle, जाणून घ्या नव्या फीचरबद्दल…
Gold prices at lows Big fall after Diwali
सुवर्णवार्ता… सोन्याचे दर निच्चांकीवर… दिवाळीनंतर मोठी घसरण…

” आज महिन्याच्या सुरुवातीलाच कर्जाचे हफ्ते, घराची बिले, मुलांचे खर्च, किराणामाल यात अर्ध्याहून अधिक पगार खर्च झाला! पुढे अख्खा महिना आ वासून उभा आहे. त्यात काही आगंतुक खर्च, दैनंदिन प्रवासाचे खर्च सुधा असतील. मासिक गुंतवणूकसुद्धा सुरू आहे. सगळीकडे हा पैसा पुरणार कसा”?

चिन्मयप्रमाणेच आज बऱ्याच चाकरमान्यांना पडणारे हे प्रश्न आहेत. वाढलेली महागाई, बदलती जीवनशैली, खर्चाचे विविध मार्ग, यामुळे पैसा पटकन खर्च होतो.

खर्च सांभाळताना, भविष्यातली ध्येय सुद्धा खुणावत असतात आणि त्यांच्यासाठी सुद्धा गुंतवणूक करायची असते.

खरंतर, ‘ बचत ‘ हा प्रत्येक गुंतवणुकीचा आणि त्याद्वारे साध्य करता येणाऱ्या भविष्यातील ध्येयांचा पाया आहे. आज अनेक जागतिक आणि देश पातळीवरील घडामोडींमुळे आर्थिक समीकरणे बदलली आहेत. जग हळूहळू कोव्हिडच्या दुष्परिणामांमधून बाहेर येतंय. महागाई वाढलेय. कर्ज हप्त्यांची मासिक रक्कम, रोजच्या वापरातल्या वस्तू इ महाग झालेत.

आणखी वाचा: Money Mantra: कमावू लागलात; आता गुंतवू लागा!

यामागची कारणे, त्यावरचे उपाय थेट आपल्या हातात नसले तरी आपल्या पैशांचे नियोजन, त्यांचा योग्य विनियोग नक्कीच आपल्या हातात आहे.

अशावेळी बचत योग्य प्रकारे कशी करता येईल आणि पैशाचे योग्य नियोजन कसे होईल ते पाहू.

१.आठवड्याचे बजेट आखा

बचत करणे कठीण होत असेल तर महिन्याऐवजी ‘ आठवड्याचे बजेट ‘ आखा. आपला आगंतुक खर्च जसा की हॉटेलिंग, शॉपिंग इत्यादी बऱ्यापैकी वीकेंडला होतो. या बजेटमुळे ठोस आणि आगंतुक खर्च तुम्हाला समजतील आणि त्यावर तुमचे नियंत्रण राहू शकेल. दर आठवड्याला तुम्ही किती पैशांची बचत करू शकलात हे कळेल.

२.जमा खर्चाच्या नोंदी ठेवा

कितीही कंटाळवाणे काम असले तरी तुम्ही तुमच्या जमा खर्चाची नोंद नियमित ठेवा. यामुळे तुम्हाला तुमचे खर्च समजतील. बजेट तुम्ही कसे पाळता आहात ते कळेल. एखादी डायरी, किंवा तुमच्या कॉम्प्युटरच्या एक्सेल शीटमध्ये सुद्धा तुम्ही हे नोंदवून ठेऊ शकता.

३.ऑनलाईन व्यवहारांसाठी स्वतंत्र बँक बचत खाते ठेवा

खर्चासाठी जर तुम्ही ऑनलाईन व्यवहार अथवा UPI चा वापर करत असाल तर त्यासाठी एका स्वतंत्र बचत खाते ठेवा. याद्वारे तुम्ही नेमके आणि अत्यंत आवश्यक असेच खर्च कराल. यामुळे तुम्हाला तुमच्या खर्चाची मर्यादा कळेल.

४.दैनंदिन आर्थिक व्यवहारांविषयी घरात चर्चा करा
प्रत्येक कमावती व्यक्ती ही आपल्या कुटुंबाचा आर्थिक स्तर राखणे, तो उंचावणे यासाठी प्रयत्नशील असते. परंतु, उत्पन्न , खर्च, गुंतवणूक, त्यांचे valuations ई कायम बदलत असतात. अशा बदलत्या गोष्टीची, वाढत्या खर्चाची कल्पना हलक्या फुलक्या स्वरूपात घरामध्ये चर्चिली गेली पाहिजे. यामुळे कुटुंबातील सर्व घटकांना वास्तवाचे भान राहील.

जिथे, जसे शक्य असेल तेव्हा उत्पन्न (-) गुंतवणूक = खर्च हे सूत्र अवलंबणे

आपण भारतीय कायमच बचतीला प्राधान्य देत आलो आहोत. त्यामुळे पूर्वी पासूनच आपल्या घरात आपण ” उत्पन्न (-) खर्च = बचत ” हे सूत्र पाळतो.

खरंतर, आपल्या सर्वांची आंतरिक इच्छा असते की आपण ” खर्च(+) बचत = उत्पन्न ” हे सूत्र पाळू ! पण तसं होत नाही!!

म्हणूनच पैशांचे काळानुसार कमी होत जाणारे मूल्य ( Time value of money), महागाई, भविष्यातील ध्येय, राहणीमान आणि त्याचा स्टार उंचावणे अशा गोष्टी साध्य करायच्या असतील , तर आपण ” उत्पन्न (-) बचत, गुंतवणूक = खर्च”. हे सूत्र जसे जमेल तसे अवलंबून!

उत्पन्नाचे मार्ग मर्यादित असतात पण खर्चाच्या वाटा अनेक असतात. म्हणूनच अशा काही सोप्या गोष्टी पाळल्या तरी खूप चागला बदल घडू शकतो!