गृहबांधणी उद्योगात सध्या तेजी आहे. आधुनिक सोयी-सुविधा असलेले नवीन गृह प्रकल्प तयार होत आहेत. मोठ्या शहरांमध्ये पुनर्विकासाच्या कामाला गती येत आहे. छोटे घर विकून मोठे घर घेणे, दुसऱ्या शहरात स्थलांतर होणे, सहज प्राप्त होणारे गृहकर्ज, या कारणाने घराच्या खरेदी-विक्रीचे प्रमाण वाढले आहे. घर खरेदी करणाऱ्याला अनेक पर्याय उपलब्ध आहेत. शहरांमध्ये घराच्या किमती या उत्पन्नापेक्षा खूपच जास्त असतात. त्यासाठी पैशांची जुळवाजुळव करणे हे आलेच. सोने, शेअर्स, म्युचुअल फंड वगैरे विकले जाते शिवाय गृहकर्ज सुद्धा घेतले जाते. हे सर्व करतांना कराच्या तरतुदी जाणून घेतल्या पाहिजेत. करदात्याला नवीन घर घेण्यासाठी सवलती देण्यात आल्या आहेत.
सोने, शेअर्स, म्युचुअल फंडातील युनिट्स, जुने घर विकून घर घेतले जाते. अशी भांडवली संपत्ती विकल्यास करदात्याला त्यावर होणारा भांडवली नफा हा करपात्र असतो. करदात्याने अशा भांडवली नफ्यावर कर भरल्यास नवीन घर घेण्यासाठी निधीची कमतरता भासू शकते. करदात्यांचा हा त्रास कमी करण्यासाठी प्राप्तिकर कायद्यात सवलत दिलेली आहे. परंतु ही सवलत घेण्यासाठी करदात्याला काही अटींची पूर्तता करावी लागते. या अटींची पूर्तता न केल्यास त्याला कर भरावा लागतो. त्यामुळे घर किंवा स्थावर मालमत्तेची विक्री करतांना करदात्याने प्राप्तिकर कायद्यातील त्याविषयीच्या तरतुदी जाणून घेणे गरजेचे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा