काळा पैसा पांढरा करण्याचे बरेच मार्ग प्रचलित आहेत. त्यातील एक प्रकार जो नेहमी वापरला जातो तो म्हणजे ‘स्मूर्फिंग’. या प्रकारात छोटे छोटे भाग करून पैसे बँकेत जमा केले जातात. मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या बँकांमध्ये खाते उघडून त्यामध्ये सतत थोडी थोडी रक्कम जमा केली जाते. जेणेकरून कुठल्याही नियामकाच्या डोळ्यात ती येत नाही आणि काळा पैसा असा कुमार्गाने पांढरा केला जातो. नुसता पैसा जमा केला जात नाही तर काही ‘मनीऑर्डर’ सारखी आर्थिक साधने सुद्धा वापरात आणली जाऊ शकतात. म्हणून रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार आणि बँकिंग पद्धतीनुसार बँका वेळोवेळी ‘नो युवर क्लायंट’ अर्थात ‘केवायसी’ करून घेतात. आता अशी किती तरी बँक खाती उघडून, कुणाला तरी हाताशी धरून हे गैरव्यवहार केले जातात. म्हणजे समजा एक चित्रपट गृह (थिएटर) उघडले आणि त्याला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असे दाखवले आणि सगळ्या रसिकांनी रोख रक्कम भरून तिकिटे घेतली आणि दुसऱ्या दिवशी हे सारे पैसे बँकेत जमा केल्यास शंका घेण्यास तसा वाव कमीच असतो. म्हणजे मध्यस्थी वापरून काळा पैसा पांढरा करण्यातील हा प्रकार आहे. या प्रकारात अगदी न्हाव्याचा देखील वापर करून काळा पैसा पांढरा केल्याची उदाहरणे आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा