Tata Group Mutual Funds: जेव्हा बाजारात गुंतवणुकीचा विचार येतो, तेव्हा टाटा ग्रुपची नक्कीच चर्चा होते. टाटा समूहाच्या अनेक कंपन्या शेअर बाजारात सूचिबद्ध असताना हा समूह म्युच्युअल फंड व्यवसायातील सर्वात जुन्या कंपन्यांपैकी एक आहे. टाटा समूहाच्या म्युच्युअल फंडाच्या काही योजना २० ते २५ वर्षे जुन्या आहेत. हा म्युच्युअल फंड जवळजवळ प्रत्येक श्रेणीत गुंतवणूक करण्याचा पर्यायदेखील उपलब्ध करून देतो. मग ते लार्जकॅप असो वा मिडकॅप, स्मॉलकॅप असो वा मल्टिकॅप किंवा ईएलएसएस असो. टाटा समूहाच्या शेअर्सची बरीच चर्चा होत असली तरी परतावा देण्याच्या बाबतीत समूहाच्या म्युच्युअल फंड योजनाही अव्वल आहेत.

मागील १ वर्ष, ३ वर्षे, ५ वर्षे किंवा १० वर्षांच्या परताव्याच्या योजनांबद्दल बोलायचे झाल्यास टाटा समूहाचे अनेक फंड परतावा देण्याच्या बाबतीत सर्वात पुढे असल्याचे सिद्ध झाले आहे. यामध्ये गेल्या १० वर्षांत सातत्याने १७ ते २१ टक्के दराने परतावा मिळत आहे. म्हणजेच जर एखाद्याने १० वर्षांपूर्वी १ लाख रुपये वार्षिक २१ टक्के दराने सर्वाधिक परतावा असलेल्या योजनेत गुंतवले असतील, तर त्याचे पैसे ६.७२ लाख होतील. यासंदर्भात त्याला ६.७ पट परतावा मिळाला. अशा ५ फंडांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्यांनी SIP आणि एकरकमी गुंतवणुकीवर १० वर्षांत सर्वाधिक परतावा दिला. यामध्ये ज्यांनी एकरकमी गुंतवणूक आणि सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP केले ते या काळात श्रीमंत झाले.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

टाटा मिडकॅप ग्रोथ फंड

१० वर्षांचा परतावा: २१ % वार्षिक
किमान एकरकमी गुंतवणूक: ५००० रुपये
किमान SIP: १५० रुपये
एकूण संपत्ती: २०२६ कोटी (३१ मे २०२३)
खर्चाचे प्रमाण: ०.९७% (३१ मे २०२३ पर्यंत)

१ लाख गुंतवणुकीचे मूल्य : ६.७२ लाख रुपये
१० वर्षांत १० हजार मासिक SIP चे मूल्य: ३७.७४ लाख रुपये

हेही वाचाः जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसला वेगळे करण्याच्या घोषणेनंतर रिलायन्सच्या शेअरमध्ये तेजी, बाजारमूल्य १८ लाख कोटींच्या पुढे

टाटा इक्विटी पीई फंड

१० वर्षांचा परतावा: १९.४१% प्रतिवर्ष
किमान एकरकमी गुंतवणूक: ५००० रुपये
किमान SIP: १५० रुपये
एकूण संपत्ती: ५५४० कोटी (३१ मे २०२३)
खर्चाचे प्रमाण: ०.८९% (३१ मे २०२३ पर्यंत)

१ लाख गुंतवणुकीचे मूल्य: ५.८९ लाख रुपये
१० वर्षांत १० हजार मासिक SIP चे मूल्य: ३४.२२ लाख रुपये

हेही वाचाः अदाणी हिंडेनबर्ग प्रकरणात सेबीकडून सर्वोच्च न्यायालयात ४१ पानी प्रतिज्ञापत्र सादर, मंगळवारी होणार सुनावणी

टाटा इंडिया टॅक्स सेव्हिंग्स फंड

१० वर्षांचा परतावा: १८.१३% प्रतिवर्ष
किमान एकरकमी गुंतवणूक: ५०० रुपये
किमान SIP: ५०० रुपये
एकूण संपत्ती: ३२५३ कोटी (३१ मे २०२३)
खर्चाचे प्रमाण: ०.७७% (३१ मे २०२३ पर्यंत)

१ लाख गुंतवणुकीचे मूल्य: ५.२९ लाख रुपये
१० वर्षांत १० हजार मासिक SIP चे मूल्य: ३३.०७ लाख रुपये

टाटा लार्ज आणि मिडकॅप फंड

१० वर्षांचा परतावा: १७.४९% प्रतिवर्ष
किमान एकरकमी गुंतवणूक: ५००० रुपये
किमान SIP: १५० रुपये
एकूण संपत्ती: ४३४८ कोटी (३१ मे २०२३)
खर्चाचे प्रमाण: ०.८८% (३१ मे २०२३ रोजी)

१ लाख गुंतवणुकीचे मूल्य: ५.०१ लाख रुपये
१० वर्षांत १० हजार मासिक SIP चे मूल्य: ३३.३० लाख रुपये

टाटा इन्फ्रास्ट्रक्चर फंड

१० वर्षांचा परतावा: १७.०४% प्रतिवर्ष
किमान एकरकमी गुंतवणूक: ५००० रुपये
किमान SIP: १५० रुपये
एकूण मालमत्ता: १०७७ कोटी (३१ मे २०२३)
खर्चाचे प्रमाण: १.४८% (३१ मे २०२३ रोजी)

१ लाख गुंतवणुकीचे मूल्य: ४.८३ लाख रुपये
१० वर्षांत १० हजार मासिक SIP चे मूल्य: ३४.२२ लाख रुपये

Story img Loader