आजकाल प्रत्येक जण करोडपती होण्याचे स्वप्न पाहतो, परंतु काही मोजकेच ते साध्य करू शकतात. तुम्हीही मध्यमवर्गीय कुटुंबातील असाल आणि नोकरी करत असाल, तसेच भविष्यात तुम्हाला करोडपती बनायचे असेल तर हे स्वप्न SIP च्या माध्यमातून पूर्ण होऊ शकते. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक एसआयपीद्वारे करावी लागते. SIP हे मार्केट लिंक्ड असले तरी बहुतेक तज्ज्ञ एसआयपीला आजच्या काळातील गुंतवणुकीचे सर्वोत्तम साधन मानतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्ही SIP मध्ये जितके जास्त पैसे गुंतवाल तितके चांगले परतावे मिळतील. यामध्ये तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो. तुमचे गुंतवलेले पैसे दीर्घकाळात वेगाने संपत्तीत रूपांतरित होतात. SIP चा सरासरी परतावा १२ टक्के मानला जातो. हा परतावा आजच्या कोणत्याही योजनेपेक्षा खूप जास्त आहे. दीर्घकाळ एसआयपीमध्ये गुंतवणूक करत राहून तुम्ही स्वत:ला करोडपती बनवू शकता. कसे ते जाणून घेऊ यात?

५ हजार रुपये गुंतवून करोडपती होण्यासाठी किती वर्षे लागतील?

समजा आजपासून तुम्ही ५ हजारांची SIP सुरू केली आणि तुम्ही २६ वर्षापर्यंत ती सतत सुरू ठेवली तर तुम्हाला १२ टक्के रिटर्ननुसार २६ वर्षांत १,०७,५५,५६० रुपये मिळतील. तर ५ हजार रुपये दरमहा दराने तुमची एकूण गुंतवणूक १५,६०,००० रुपये असेल.

हेही वाचाः Money Mantra : नवे आलिशान घर घेण्याचा विचार करताय? ‘हे’ ८ महत्त्वाचे मुद्दे जाणून घ्या अन्यथा…

८००० रुपये गुंतवूनही करोडपती होता येणार?

जर तुम्ही गुंतवणुकीची रक्कम थोडी वाढवली आणि ती ८ हजार रुपये दरमहा केली, तर करोडपती होण्यासाठी तुम्हाला किमान २२ वर्षे गुंतवणूक करावी लागेल. २२ वर्षांत तुम्ही एकूण २१,१२,००० रुपये गुंतवाल, परंतु १२ टक्के रिटर्ननुसार तुम्हाला १,०३,६७,१६७ रुपये मिळतील.

हेही वाचाः It Sector Layoffs : टीसीएस ते इन्फोसिसपर्यंत आयटी कंपन्यांनी आतापर्यंत १६,१६२ कर्मचाऱ्यांना दिला नारळ, पण कारण काय?

१० हजार रुपयांच्या मासिक गुंतवणुकीसह तुमचे स्वप्न लवकर पूर्ण होणार

जर तुमचा पगार चांगला असेल आणि तुम्ही दरमहा १० हजार रुपये गुंतवू शकत असाल तर तुम्ही तुमचे करोडपती होण्याचे स्वप्न लवकर पूर्ण करू शकता. अशा परिस्थितीत तुम्हाला २० वर्षे सतत गुंतवणूक करावी लागेल. तुम्ही २० वर्षांत २४,००,००० रुपये गुंतवाल, परंतु तुम्हाला १२ टक्के परतावा म्हणून ९९,९१,४७९ रुपये (सुमारे १ कोटी रुपये) मिळतील. जर तुम्ही ते २१ वर्षे चालू ठेवले तर तुम्हाला परतावा म्हणून १,१३,८६,७४२ रुपये मिळू शकतात.

एसआयपीचे विशेष वैशिष्ट्य

SIP ची चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमची गुंतवणूक कधीही वाढवू किंवा कमी करू शकता. आर्थिक तज्ज्ञ दीप्ती भार्गव सांगतात की, चांगल्या परताव्यासाठी प्रत्येकाने दरवर्षी थोडी रक्कम वाढवून गुंतवणूक केली पाहिजे. फक्त ५०० रुपये वाढवले ​​तरी चालू शकतात हे इतके अवघड नाही, कारण तुमचे उत्पन्नही वेळेनुसार वाढते. या व्यतिरिक्त SIP मध्ये सरासरी परतावा १२ टक्के आहे, परंतु जर तुम्हाला यापेक्षा जास्त परतावा मिळाला तर तुमचे पैसे आणखी कमी वेळेत वाढतील. तसेच गरज भासल्यास तुम्ही SIP मध्येच थांबवू शकता आणि वेळेनुसार ती पुन्हा सुरूदेखील करू शकता.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Money mantra a small investment in sip will change fortunes you can become a millionaire with a monthly investment of 5000 8000 and 10000 rupees vrd
Show comments