करदात्यांचे प्रकार आणि निवासी दर्जा याविषयी मागील लेखात माहिती घेतल्यानंतर आता या लेखात आपण उत्पन्नाचे प्रकार किती आणि कोणते आहेत हे पाहू. करदात्याचा कोणताही प्रकार असो किंवा निवासी दर्जा असो त्याला त्याचे उत्पन्न खालील पाच उत्पन्नाच्या स्त्रोतातच विभागावे लागते. उत्पन्न चुकीच्या स्त्रोतामध्ये विभागले गेल्यास उत्पन्नातून विशिष्ट वजावटी घेता येत नाहीत. शिवाय काही उत्पन्नाच्या स्त्रोतासाठी करआकारणी वेगळ्या पद्धतीने केली जाते. उत्पन्न चुकीच्या स्त्रोतात विभागले गेल्यास त्याला जास्त कर भरावा लागू शकतो किंवा कमी कर भरल्यामुळे भविष्यात व्याज आणि दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे करदात्याला या उत्पन्नाच्या स्त्रोताची माहिती असणे गरजेचे आहे. हे पाच उत्पन्नाचे स्त्रोत कोणते आणि त्यामध्ये कोणत्या उत्पन्नाचा समावेश होतो याची माहिती खालीलप्रमाणे :

आणखी वाचा : Money Mantra: प्राप्तिकर विवरणपत्र म्हणजे काय ? ते कोणी भरणे अपेक्षित आहे? (भाग पहिला)

Aditi Tatkare OnLadki Bahin Yojana January Installment Date in Marathi
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Article about obcs dominate government job recruitment
लोकजागर : ओबीसींची ‘सर्वोच्च’ अडवणूक!
what is the genome india project why it matters
विश्लेषण : जिनोमइंडिया प्रकल्प भारतासाठी किती महत्त्वाचा?
Direct tax rises 16 prcent to Rs 16.9 lakh crore in FY25
वैयक्तिक प्राप्तिकरातील वाढ अर्थव्यवस्थेसाठी वरदान; प्रत्यक्ष कर संकलन १२ जानेवारीपर्यंत १६.९० लाख कोटींवर
retail inflation rate at 5 22 percent in december
चलनवाढीचा दिलासा, पण बेताचाच! डिसेंबरमध्ये दर ५.२२ टक्के; चार महिन्यांच्या नीचांकी
Fund Jigyaza Wealth Creation Through SIP
फंड जिज्ञासा – ‘एसआयपी’च्या माध्यमातून संपत्ती निर्मिती
lokmanas
लोकमानस: उपभोग, गुंतवणूक, निर्यातीत वाढ आवश्यक

१) पगाराचे उत्पन्न : नोकरीतून मिळणारे उत्पन्न या उत्पन्नाच्या स्त्रोतात दाखविले जाते. नोकरी देणारा आणि कर्मचाऱ्यामध्ये मालक-कर्मचारी संबंध प्रस्थापित केले असले तर कर्मचाऱ्याला मिळणारे उत्पन्न ‘पगार’ या उत्पन्नाच्या स्त्रोतात दाखविता येते. असे संबंध प्रस्थापित होत नसतील तर ते उत्पन्न ‘उद्योग-व्यवसायाचे उत्पन्न’ किंवा ‘इतर उत्पन्न’ या सदरात दाखवावे लागते. उदा. एखाद्या कंपनीने एका वकिलाबरोबर नोकरीचा करार केला आणि त्यांच्यात मालक-कर्मचारी संबंध प्रस्थापित झाले तर वकिलाला दिलेला मोबदला ‘पगाराचे उत्पन्न’ म्हणून दाखवावे लागेल आणि समजा कंपनीने एका वकिलाला एका खटल्याचे काम पाहण्यासाठी मोबदला दिला आणि त्यांच्यात मालक-कर्मचारी संबंध प्रस्थापित नसतील तर वकिलाला मिळणारे उत्पन्न ‘उद्योग-व्यवसायाचे उत्पन्न’ म्हणून समजले जाईल.

आणखी वाचा : Money Mantra: ‘शून्य किमतीचा परिणाम’ म्हणजे काय?

पगाराच्या उत्पन्नात वेतन, पेन्शन, ग्रॅच्युइटी, फी, कमिशन, आगाऊ पगार, भत्ते, सवलती, रजेचा भत्ता, वगैरेंचा समावेश होतो. मालकाकडून कर्मचाऱ्याला मोफत घर, वैद्यकीय सुविधा, शैक्षणिक सुविधा वगैरे मिळते, त्याचा सुद्धा समावेश ‘पगाराच्या’ उत्पन्नात होतो. थोडक्यात मालकाकडून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश पगाराच्या उत्पन्नात होतो. पगाराच्या उत्पन्नातून करदात्याला मर्यादित स्वरूपाच्या वजावटी घेता येतात. उदा. ५० हजार रुपयांपर्यंतची प्रमाणित वजावट, २०२३-२४ या आर्थिक वर्षापासून करदात्याने नवीन किंवा जुनी करप्रणाली स्वीकारली, तरी ही वजावट मिळते. २०२२-२३ या आर्थिक वर्षापर्यंत जुनी करप्रणाली स्वीकारली असेल तरच ही वजावट मिळत होती. बाकीच्या वजावटी करदाता कोणती करप्रणाली स्वीकारतो त्यावर अवलंबून असतात. कर्मचाऱ्याला पगाराव्यतिरिक्त मिळणारे काही भत्ते किंवा सवलती करपात्र आहेत तर काही करमुक्त. साधारणतः निवृत्तीच्या वेळी मिळणारे भत्ते करपात्र नसतात तर काहींना रकमेच्या मर्यादा आहेत. याची माहिती वेळोवेळीं या लेख मालिकेतून देण्यात येईल.

आणखी वाचा : आठव ६.६.६६ चा!

२) घरभाडे उत्पन्न : या उत्पन्नाच्या स्त्रोताचे नाव ‘घरभाडे उत्पन्न’ असले तरी या उत्पन्नात कोणत्याही इमारतीच्या उत्पन्नाचा समावेश होतो. या ‘घरभाडे उत्पन्ना’मध्ये सर्व प्रकारच्या इमारतीचा आणि त्यालगत जमिनीचा समावेश होतो. ही इमारत कोणत्याही प्रकारची असली तरी त्याचे उत्पन्न ‘घरभाडे उत्पन्न’ म्हणूनच गणले जाते. उदा. निवासी घर, व्यापारी जागा, गोदाम, कार्यशाळा, हॉटेल, चित्रपटगृह, वगैरे, या सर्वांच्या भाड्याचे उत्पन्न ‘घरभाडे उत्पन्न’ या सदराखाली करपात्र आहे. उदा. करदात्याने त्याच्या मालकीचे असलेले दुकान किंवा ऑफिस भाड्याने दिले तरी त्याचे उत्पन्न घरभाडे उत्पन्न म्हणून समजले जाते. घर म्हटले तरी घराबरोबर जमिनीचासुद्धा समावेश होतो. घरभाडे उत्पन्नामध्ये घरालगतच्या जमिनीचासुद्धा समावेश होतो. परंतु नुसती जमीन भाड्याने दिलेली असेल तर जमिनीच्या भाड्याचा समावेश ‘घरभाडे उत्पन्ना’त होत नाही. जमीन भाड्याने द्यावयाचा उद्योग असेल तर जमिनीच्या भाड्याचे उत्पन्न ‘उद्योग आणि व्यवसायाच्या उत्पन्ना’त गणले जाते, अन्यथा ‘इतर उत्पन्ना’त गणले जाते. घरभाडे उत्पन्न हे घराच्या मालकालाच करपात्र आहे. करदाता हा घराचा कायदेशीर मालक असला पाहिजे. कायदेशीर मालक म्हणजे जो ज्याच्याकडे मालमत्तेचा मालकी हक्क आहे.

मालक नसलेल्या व्यक्तीला जर इमारतीचे भाडे मिळाले असेल तर ती व्यक्ती असे उत्पन्न ‘घरभाडे उत्पन्न’ म्हणून दाखवू शकत नाही. असे उत्पन्न ‘उद्योग-व्यवसायाचे उत्पन्न’ किंवा ‘इतर उत्पन्न’ या स्त्रोतात गणले जाते. या उत्पन्नाच्या स्त्रोतात सुद्धा काही ठराविक वजावटी घेता येतात. उदा. प्रमाणित वजावट. उत्पन्न ‘घरभाडे उत्पन्न’ या स्त्रोतात करपात्र असल्यास उत्पन्नाच्या ३०% इतकी प्रमाणित वजावट मिळते. यासाठी कोणता खर्च करण्याची आवश्यकता नसते.

घरभाडे उत्पन्न हे मालमत्तेच्या ‘वार्षिक मूल्यावर’ आधारित आहे. घर भाड्याने दिलेले नसले तरी अनुमानित घरभाडे उत्पन्न दाखवून त्यावर करदात्याला कर भरावा लागतो. जर करदात्याकडे दोन घरे असतील आणि त्याचा वापर तो स्वतःसाठी करत असेल आणि ती भाड्याने दिलेली नसतील तर घरभाडे उत्पन्न शून्य समजले जाते. जर करदात्याकडे एकच घर असेल आणि ते भाड्याने दिले असेल तर घरभाडे उत्पन्न शून्य समजले जात नाही. (क्रमश:)

Story img Loader