भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ इंडियाने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे. BOI ने अधिकृतपणे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र २०२३ लाँच केले आहे. BOI चे MD आणि CEO रजनीश कर्नाटक यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे योजनेचे उद्घाटन केले. बँक ऑफ इंडिया ही देशातील पहिली बँक आहे, जिने ही योजना आपल्या सर्व शाखांमध्ये सुरू केली आहे, असंही त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे ही योजना पोस्ट ऑफिसमध्येही उघडता येते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘या’ योजनेत विशेष काय?

या योजनेची घोषणा वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी २०२३ रोजी आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान केली होती. योजनेअंतर्गत मुली किंवा महिला महिला सन्मान बचत प्रमाणपत्र मिळवू शकतात. याशिवाय मुलींचे पालकही अल्पवयीन मुलीच्या वतीने खाते उघडू शकतात. या योजनेअंतर्गत तुम्ही या खात्यात किमान १००० रुपये ते कमाल २ लाख रुपये जमा करता येतात. हा पैसा २ वर्षांसाठी ठेवला जातो आणि २ वर्षांनंतर तुम्हाला व्याजासह पैसे परत मिळतात.

हेही वाचाः सरकारी बँकांच्या प्रमुखांची बैठक घेऊन अर्थमंत्री घेणार बँकांची झाडाझडती

२ लाखांऐवजी २.३२ लाख मिळतील

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना वार्षिक ७.५ टक्के व्याज देते. त्यानुसार जर तुम्ही या योजनेत ७.५% व्याजदराने १ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळी सुमारे १.१६ लाख रुपये मिळतील. दुसरीकडे जर तुम्ही २ लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल, तर २ वर्षांनंतर ७.५ टक्के व्याजदराने तुम्हाला सुमारे २.३२ लाख रुपये मिळतील. म्हणजेच ३२,०४४ रुपयांचे जास्तीत जास्त व्याज मिळू शकते. या योजनेतील उत्पन्न करपात्र असेल. योजनेअंतर्गत TDS कापला जाणार नाही. या योजनेंतर्गत खाते ३१ मार्च २०२५ पर्यंत उघडता येईल. आतापर्यंत महिला सन्मान बचत प्रमाणपत्रांतर्गत खाती उघडण्यासाठी फक्त पोस्ट ऑफिस अधिकृत होते, परंतु सरकारने अनुसूचित बँकांना ही सुविधा २७ जून २०२३ च्या राजपत्र अधिसूचनेद्वारे प्रदान करण्याची परवानगी दिली आहे आणि बँक ऑफ इंडिया ही योजना सुरू करणारी पहिली बँक आहे.

हेही वाचाः राज्यांकडून महागडी कर्ज उचल; केंद्राच्या तुलनेत ३४ आधारबिंदूंनी चढे दर

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Money mantra along with post office now you can get mahila sanman saving certificate from bank what is special about the plan vrd