राजेश कृष्णन, चीफ ऑपरेशन्स ऑफिसर, बजाज अलायन्झ

गुंतवणूक, घराची खरेदी- विक्री, शेअर, इन्शुरन्स आदी सर्व व्यवहारांच्या संदर्भात आपल्याला नेहमी अनेक प्रश्न पडतात. कधी ते कर वाचविण्याच्या संदर्भात असतात तर कधी करपरताव्याच्या संदर्भात, कधी दीर्घकालीन नफ्या संदर्भात या सर्व प्रश्नांची उत्तरे दर शनिवारी मनीमंत्र सदरातील तज्ज्ञ देतील!

what 12 lakh exemption means and how tax is calculated
१२ लाख करमुक्त उत्पन्नाची सवलत नेमकी कुणासाठी?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
dsp mutual funds
फंडांचा फंडा: डीएसपी मिड कॅप फंड
Car buying 48 Percent Tax Viral Post
PHOTO : “या लूटमारीला काही मर्यादा?” नवीन कार खरेदीवरील करामुळे भडकला ग्राहक, अर्थमंत्र्यांना बिल टॅग करीत म्हणाला…
TReDS, features , uses , TReDS news,
Money Mantra : TReDSची उपयुक्तता आणि वैशिष्ट्यं काय?
e-insurance account , insurance ,
Money Mantra : ई – इन्शुरन्स अकाऊंट काढणं का महत्त्वाचं आणि त्याचा उपयोग कसा होतो?
review of impact on india stock market and economy after donald trump comes to power
Money Mantra : ट्रंप यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणामुळे आपलं आयुष्य का बदलणार?
investment tips
Money Mantra: घसरलेल्या मार्केटमध्ये गुंतवणुकीस सुरुवात करताय? मग या टिप्स खास तुमच्यासाठी

प्रश्न: मी गेल्या वर्षी धूम्रपान सोडले आहे आणि मला टर्म पॉलिसी घ्यायची आहे. विमा घेण्याच्या उद्देशाने मी किती वर्षांनी धूम्रपान न करणारा मानला जाईन?

एखादी व्यक्ती तंबाखू, सिगारेट, सिगार, हुक्का, ई-सिगारेट किंवा निकोटीन गम यांचे सेवन करत असल्यास धूम्रपान करणारी व्यक्ती म्हणून समजली जाते. धूम्रपान न करणार्‍यांच्या तुलनेत धूम्रपान करणार्‍यांना सामान्यतः जुनाट, जीवनशैलीशी संबंधित आजार होण्याची शक्यता जास्त असल्याने, विमा कंपन्या धूम्रपान करणार्‍या व्यक्तीने खरेदी केलेल्या पॉलिसींवर जास्त प्रीमियम आकारतात. विमा योजनेसाठी अर्ज करताना एखाद्याच्या धूम्रपानाच्या सवयीबद्दल खुलासा करणे उचित आहे कारण कोणतीही खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती भविष्यात दावा नाकारण्यास कारणीभूत ठरू शकते.

तुम्ही जर गेल्या १२ महिन्यांत कोणत्याही स्वरूपात निकोटीनचे सेवन केलेले नसेल (उत्पादन आणि इतर परिस्थिती यांच्या आधारे हा कालावधी २४ महिन्यांपर्यंतही बदलू शकतो) (तसेच कोटिनिन चाचणीच्या परिणामांवरही अवलंबून असते) तर तुम्ही सर्वसाधारण, धूम्रपान न करणाऱ्या प्रीमियम रकमेवर टर्म योजना खरेदी करू शकता. तुमची विमा कंपनी जोखीम स्वीकारण्यापूर्वी धूम्रपानामुळे होऊ शकणारे संभाव्य आरोग्य धोके समजून घेण्यासाठी तुमच्या वैद्यकीय चाचण्यांचे कसून विश्लेषण करेल.

प्रश्न: माझी विमा पॉलिसी संपल्यानंतर मी ती पुन्हा सुरु करू शकतो का?

जेव्हा पॉलिसीधारक नूतनीकरण प्रीमियम देय कालावधीत भरण्यात अपयशी ठरतो तेव्हा जीवन विमा पॉलिसी रद्द होते. पॉलिसीधारकांना प्रीमियम भरण्याची आणि त्यांच्या विमा योजनांचे नूतनीकरण करण्याची परवानगी देण्यासाठी विमा कंपनी वाढीव कालावधी देते. सर्वसाधारणपणे पॉलिसी नूतनीकरणाच्या देय तारखेपासून (मासिक प्रीमियम पेमेंट मोडवर खरेदी केलेल्या पॉलिसींसाठी) वाढीव कालावधी १५ दिवसांचा आणि पॉलिसी नूतनीकरणाच्या देय तारखेपासून ३० दिवस (त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक प्रीमियमवर खरेदी केलेल्या पॉलिसींसाठी) असतो.

जर पॉलिसीधारकाने त्यांची पॉलिसी लॅप्स म्हणजेच रद्द झाल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत रिव्हाइव्ह म्हणजेच पुन्हा सुरू करण्याचे निवडले, तर ते पॉलिसीच्या अटी व शर्तींच्या अधीन विमाकर्त्याद्वारे आकारल्या जाणाऱ्या व्याज / विलंब शुल्कासह थकित नूतनीकरण प्रीमियम भरू शकतात.

जर एखाद्या पॉलिसीधारकाने त्यांची पॉलिसी सहा महिन्यांनंतर रिव्हाइव्ह करणे निवडले तर, विमाकर्ता अतिरिक्त आवश्यकता म्हणून चांगल्या आरोग्य प्रमाणपत्राची विचारणा करू शकतो. काही प्रकरणांमध्ये, विमा कंपनी पॉलिसीधारकाला अंडररायटिंग आवश्यकतांच्या आधारे वैद्यकीय चाचण्या करून घेण्याची विचारणाही करू शकते. त्यामुळे लॅप्सेशन टाळण्यासाठी आणि पॉलिसीच्या फायद्यांचे नुकसान टाळण्यासाठी जीवन विमा पॉलिसीचे वेळेवर नूतनीकरण करण्याचा सल्ला दिला जातो.

प्रश्न: मी पुढील वर्षी कॅनडामध्ये स्थलांतरित होणार आहे. अनिवासी भारतीय भारतात टर्म योजना खरेदी करू शकतात का? मी परदेशात राहत असताना मरण पावल्यास विमा संरक्षण लागू होईल का?

अनिवासी भारतीय (NRIs) भारतात टर्म विमा योजना खरेदी करण्यास पात्र आहेत. विमा पॉलिसीसाठी अर्ज करताना तुम्हाला तुमचा व्यवसाय, उत्पन्न, रहिवासी पुरावा इत्यादींशी संबंधित अतिरिक्त कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

तुम्ही परदेशात राहात असताना तुमच्या दुर्दैवी मृत्यूची घटना घडली तरी दावा लागू होऊ शकेल. अर्थात त्यासाठी तुम्ही प्रीमियम नियमितपणे भरलेला असणे आणि पॉलिसी अजूनही सुरू असणे आवश्यक आहे.

प्रश्न: माझ्या सासऱ्यांचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले. माझ्या पत्नीला नुकतेच कळले आहे की तिच्या वडिलांची जीवन विमा पॉलिसी होती आणि त्यासाठी ती नॉमिनी आहे. अशा प्रकरणात दावा करण्याची प्रक्रिया काय आहे?

होय, तुमची पत्नी विमा कंपनीशी संपर्क साधून दावा सूचित करू शकते. जर प्रीमियम नियमितपणे भरले जात आहेत आणि मृत्यूच्या तारखेपर्यंत पॉलिसी सक्रिय राहिली आहे तर तुमची पत्नी पॉलिसीच्या अटी व शर्तींच्या अधीन असलेल्या दाव्याच्या रकमेसाठी पात्र आहे.

विमाधारकाचे निधन होताच नॉमिनीने दावा सूचित करण्याचा सल्ला दिला जातो. प्रत्येकाने त्यांच्या नामनिर्देशित व्यक्तींना त्यांच्या जीवन विमा पॉलिसींबद्दल माहिती देणे देखील शहाणपणाचे आहे त्यामुळे लाभार्थ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही.

Story img Loader