डॉ. दिलीप सातभाई
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
१) प्रश्न- निनाद सांगवीकर- मला अमेरिकेमध्ये तीन वर्षापूर्वी नोकरी मिळाली होती व आता मला बढती देखील मिळाली आहे. माझे नुकतेच लग्न झाले आहे आणि पत्नीही अमेरिकेस कायमची येण्याचा हट्ट धरून बसली आहे. पुण्यातील राहते घर विकून अमेरिकेत घर विकत घेण्याचा मानस आहे. मला असे सांगण्यात आले आहे की, एक घर विकून दुसरे घर विहित मुदतीत घेतल्यास जुने घर विकून येणारा दीर्घकालीन भांडवली नफा पूर्णतः करमुक्त असतो. पुण्याचे घर तीस लाख रुपयांना घेतले होते व आता त्याचे एक कोटी रुपये मिळतील. अमेरिकेत दोन कोटी रुपयांचे घर घेणार आहे. तर भारतातील घर विकल्यानंतर येणारा दीर्घकालीन भांडवली नफा नवीन घर अमेरिकेत घेतल्यास करमुक्त होईल काय?
उत्तर- डॉ दिलीप सातभाई- प्राप्तीकर कायद्याच्या कलम ५४ अंतर्गत एक राहते घर विकून नवीन घर घेतल्यास होणारा दीर्घकालीन भांडवली नफा नवीन घर खरेदी करण्यास वापरला तर पूर्णतः करमुक्त असतो. तथापि, हे नवीन घर जुने घर विकण्याच्या अगोदर एक वर्षात किंवा घर विकल्यानंतर दोन वर्षात किंवा बांधकाम करीत असल्यास तीन वर्षात भारतात पूर्ण केल्यास व त्यात पूर्ण दीरकालीन नफा गुंतविल्यास तो पूर्णतः करमुक्त असतो. याचा अर्थ जे घर घेण्यात येणार आहे ते भारतात खरेदी केले तरच त्यात गुंतविलेला दीर्घकालीन भांडवली नफा करमुक्त झाला असता. सबब, अमेरिकेत घर खरेदी केले तर ते करसवलती साठी पात्र ठरणार नाही.
२) प्रश्न- कौशल्य सावंत- मी ७६ वर्षांचा ज्येष्ठ नागरिक आहे. मी असे ऐकले आहे की ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना करपात्र उत्पन्न असूनही प्राप्तिकर विवरण पत्र भरण्यास माफी दिली आहे, हे खरे आहे काय?
उत्तर- डॉ दिलीप सातभाई- ज्या करदात्यांनी प्राप्तिकर कायदा १९६१ मध्ये नमूद केलेल्या काही किमान अटी पूर्ण केल्या असतील तर, ७५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या वृद्ध व्यक्तींना यापुढे आर्थिक वर्ष २०२१-२२ नंतर प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची आवश्यकता राहणार नाही. वित्त कायदा २०२१ द्वारे, केंद्र सरकारने प्राप्तिकर कायद्यामध्ये एक नवीन कलम १९४पी समाविष्ट केले असून, त्यात वृद्ध व्यक्तींना प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यापासून सूट देण्यासाठी काही मानके परिभाषित केली आहेत. करदाता भारताचा रहिवासी असेल आणि त्याचे वय ७५ किंवा त्याहून अधिक असेल, म्हणजे आर्थिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये व त्यानंतर करदात्यास प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. करदात्यास निवृत्तीवेतन मिळत असेल व पेन्शनच्या त्याच एकाच विशिष्ट बँकेच्या खात्यात त्याने कमावलेले गुंतवणुकीवरील सर्व व्याज उत्पन्न जमा झालेले असल्यास फक्त असे करदाते अशी सूट मिळवू शकतात.तथापि, करदात्याने आयटीआर दाखल करण्याचे अधिकार बँकेला प्रदान करणे आवश्यक आहे. करदात्याच्या वतीने हे कार्य बांका करतील असे नमूद करण्यात आले आहे.
३) प्रश्न- अॅलेक्स डिसूजा- मी म्हापसा गोवा येथे राहतो. मी व माझ्या पत्नीच्या नावाने बरीच संयुक्त मालमत्ता आहे. तथापि, त्यातून येणारे उत्पन्न आमच्यापैकी एकाच्या नावे येते जरी ते संयुक्त असले तरी. पूर्वीच्या ज्याला १८६० ची पोर्तुगीज नागरी संहिता म्हणतात, त्या अंतर्गत आमचे उत्पन्न वाटता येणे शक्य होते. अशी तरतूद प्राप्तीकर कायद्यात आहे काय?
उत्तर- डॉ. दिलीप सातभाई- गोवा, दादरा, नगर हवेली आणि दमण या केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू असलेल्या मालमत्तेच्या समुदायाच्या प्रणालीद्वारे ज्याला १८६० च्या पोर्तुगीज नागरी संहितेनुसार नियंत्रित केले जाते तेथे कलम ५ए नुसार आलेले उत्पन्न प्राप्तिकर कायद्यातील विहित स्त्रोताच्या शीर्षकाखाली सदर पती- पत्नीच्या उत्पन्नात समान वाटपाच्या तरतुदीनुसार प्रत्येकाच्या खात्यावर प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करूनच मागता येते. सबब प्रप्तिकर विवरणपत्र दाखल करणे तुम्हाला आवश्यक आहे. त्याला उत्पन्नाची पूर्व अट नाही.
तुम्हालाही पडले असतील काही प्रश्न तर थेट तज्ज्ञांकडून उत्तरे मिळवा… तुमचे प्रश्न आम्हाला कळवा, पुढील इ-मेल आयडीवर- moneymantr@gmail.com