प्रश्न १: स्टॉक स्प्लीट म्हणजे काय ?

जेव्हा एखादी लिस्टेड कंपनी आपल्या शेअरची सध्याची दर्शनी किंमत (फेस व्हॅल्यू ) विभागून एका ठरविक प्रमाणात देऊ करते याला स्टॉक स्प्लीट असे म्हणतात. उदाहरणार्थ एबीसी या कंपनीच्या शेअर्सची दर्शनी किंमत १० रुपये असून सध्याची मार्केट व्हॅल्यू १००० रुपये आहे आणि कंपनीने आपल्या शेअर १:५ असे स्प्लीट करण्याचे ठरविले असेल तर ज्याच्याकडे सध्या कंपनीचा १ शेअर असेल तर त्याच्याकडे आता कंपनीचे ५ शेअर्स असतील व एका शेअरची किंमत आता २०० रुपये असेल.

inflation rate declined
किरकोळ महागाई दराची उसंत, नोव्हेंबरमध्ये ५.४८ टक्क्यांवर घसरण
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
indian stock market nifty sensex
अमेरिकी महागाई दराच्या प्रतीक्षेत निर्देशांकात नगण्य वाढ
gold price increased
लग्नाच्या हंगामात सोन्याच्या दराने वाढवली चिंता… हे आहे आजचे दर…
ipo allotment loksatta news
‘आयपीओ’ मिळण्याची शक्यता कशी वाढवावी? कटऑफ किंमत, एकापेक्षा अधिक डिमॅट खाती, कोटा याबाबत निर्णय कसा करावा?
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
loksatta money motra article Growth and Value strategy
तुमची रणनीती काय? ‘ग्रोथ की व्हॅल्यू’

प्रश्न २: स्टॉक स्प्लीट करण्याचा उद्देश काय असतो?

जेव्हा कंपनीच्या शेअरची मार्केट व्हॅल्यू मोठ्या प्रमाणावर वाढते अशावेळी किंमत जास्त असल्याने शेअर खरेदी करणे सामान्य गुंतवणूकदारास शक्य होत नाही व यामुळे बाजारात शेअर्सची खरेदी विक्री करण्याचे प्रमाण कमी होते व यामुळे शेअर्सची तरलता (लिक्विडीटी) कमी होते शेअर स्प्लीट केल्याने शेअरची बाजारातील किंमत कमी होत असल्याने कंपनीच्या शेअरची बाजारातील खरेदी विक्री होण्याचे प्रमाण वाढते व कंपनीच्या शेअर्सची तरलता (लिक्विडीटी) वाढते.

हेही वाचा… Money Mantra : फंड विश्लेषण: एचडीएफसी मिड कॅप ऑपॉर्च्युनिटी फंड

प्रश्न ३: स्टॉक स्प्लीटमुळे कंपनीचे वसूल भाग भांडवल (पेडअप कॅपीटल) वाढते का?

स्टॉक स्प्लीट मुळे कंपनीचे वसूल भाग भांडवल (पेडअप कॅपीटल) वाढत नाही कारण ज्या प्रमाणात शेअर्सचे नंबर वाढतात तरी त्याच प्रमाणात शेअर्सची फेस व्हॅल्यू कमी होत असते त्यामुळे वसूल भाग भांडवलात काहीही फरक पडत नाही. उदाहरणार्थ कंपनीचे सध्या बाजारात १० रुपयाच्या दर्शनी किंमतीचे १० कोटी शेअर्स आहेत आता स्प्लीट नंतर २रुपयाचे ५० कोटी शेअर्स होतील त्यामुळे १० कोटी * १० =१०० रुपये कोटी एवढे वसूल भाग भांडवल आहे आता स्प्लीट नंतर ५० कोटी शेअर्स २ रुपये दर्शनी किंमतीचे होणार असल्याने वसूल भाग भांडवल आता ५०*२=१०० कोटीच असणार आहे.

प्रश्न ४: स्टॉक स्प्लीट कशा पद्धतीने होते?

स्टॉक स्प्लीट १:१, १:२, १:५ व १:१० या प्रमाणात होते. स्प्लीट रेशो काय असावा हे कंपनीचे व्यवस्थापन ठरवीत असते. नुकतेच पर्सीस्टंट कंपनीने आपल्या शेअर्सचे १:२ या प्रमाणत विभाजन केले आहे.

हेही वाचा… Money Mantra : सव्वा लाख कोटीच्या सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, मार्केटला बूस्टर डोस !

प्रश्न ५: स्टॉक स्प्लीट व बोनस शेअर मध्ये नेमका काय फरक आहे?

स्टॉक स्प्लीटमध्ये शेअरच्या दर्शनी किमतीत दिलेल्या रेशोनुसार बदल होऊन दर्शनी किंमत कमी होत असते उदाहरणार्थ रेशो १:१० असेल तर स्प्लीट झालेल्या शेअर्सची दर्शनी किंमत आता १ रुपया इतकी असे. बोनस शेअरमध्ये शेअरची दर्शनी किंमत बदलत नाही व दोन्हीही प्रकारात भाग भांडवल आहे तेवढेच राहते.

Story img Loader