Best Performing Mid Cap Funds in 1 year (till 4 August 2023) : मिड कॅप म्युच्युअल फंड योजना गुंतवणूकदारांची संपत्ती वाढवण्याबरोबरच त्यांना फायदा मिळवून देण्यासाठी लोकप्रिय आहेत, परंतु सर्वच म्युच्युअल फंड योजना ठरवून दिलेल्या बेंचमार्क निर्देशांकांवर मात करू शकत नाहीत. केवळ ७ मिड कॅप योजना थेट निर्देशांकावर मात करू शकल्या आहेत आणि त्यातील चार फंडांनी १ वर्षात जबरदस्त फायदा मिळवून दिला आहे, असं असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) च्या वेबसाइटवर म्हटले आहे.

१८ मिड कॅप फंड एका वर्षात थेट आणि नियमित अशा दोन्ही योजनांतर्गत त्यांच्या बेंचमार्क निर्देशांकांवर मात करण्यात अयशस्वी ठरल्या आहेत. बहुतेक फंडांनी १५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे, तर दोन कमी कार्यक्षम फंडांनी १ वर्षात १०-१३ टक्के परतावा दिला आहे. ४ ऑगस्ट २०२३ पर्यंत ट्रॅक केलेल्या AMFI वेबसाइट डेटानुसार, १ वर्षातील ७ उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मिड कॅप फंडांची यादी देण्यात आलेली आहे.

Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Increase in cotton soybean prices print politics news
कापूस, सोयाबीनच्या दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; निवडणूक काळात शेतकऱ्यांमध्ये रोष
mallikarjun kharge criticize pm narendra modi in nagpur
पंतप्रधान देशाचे असतात, पण मोदी मात्र सर्व चांगले प्रकल्प आपल्याच गृहराज्यात…खरगेंची जोरदार टीका
devendra fadnavis assured to farmers if rate is less than guaranteed price government will pay difference
“हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार देणार,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन
Maharashtra government financial burden
महायुतीच्या लोकप्रिय आश्वासनांमुळे तिजोरीवर दीड ते दोन लाख कोटींचा अधिक आर्थिक भार ?
LIC net profit falls to Rs 7621 crore print eco news
एलआयसीचा निव्वळ नफा घसरून ७,६२१ कोटींवर; बाजार वर्चस्वासह, हिस्सेदारी वाढून  ६१ टक्क्यांपुढे
Assembly Election 2024 Malegaon Outer Constituency Dada Bhuse print politics news
लक्षवेधी लढत: मालेगाव बाह्य : मंत्री दादा भुसे यांचा मार्ग यंदा खडतर

HDFC मिड कॅप ऑपर्च्युनिटी फंड (HDFC Mid Cap Opportunities Fund)

HDFC मिड कॅप अपॉर्च्युनिटीज फंडाच्या थेट योजनेने ३१.३० टक्के परतावा दिला आहे तर नियमित योजनेने १ वर्षात ३०.३९ टक्के परतावा दिला आहे. ही योजना निफ्टी मिडकॅप १५० एकूण परतावा निर्देशांकानुसार ठरवून दिली जाते, ज्याने १ वर्षात २४.१० टक्के परतावा दिला आहे.

टॉरस डिस्कव्हरी मिडकॅप फंड (Taurus Discovery (Midcap) Fund)

टॉरस डिस्कव्हरी (मिडकॅप) फंडाच्या थेट योजनेने २७.७० टक्के परतावा दिला जातो, तर नियमित योजनेने १ वर्षात २७.२६ टक्के परतावा दिला आहे. ही योजना निफ्टी मिडकॅप १५० एकूण परतावा निर्देशांकानुसार ठरवून दिली जाते, ज्याने १ वर्षात २४.१० टक्के परतावा दिला आहे.

मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड (Motilal Oswal Midcap Fund)

मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंडाच्या डायरेक्ट प्लॅनने २७.०५ टक्के परतावा दिला आहे तर रेग्युलर प्लानने १ वर्षात २५.६१ टक्के परतावा दिला आहे. ही योजना निफ्टी मिडकॅप १५० एकूण परतावा निर्देशांकानुसार ठरवून दिली जाते, ज्याने १ वर्षात २४.१० टक्के परतावा दिला आहे.

हेही वाचाः Money Mantra : तरुण गुंतवणूकदारांसाठी ५ आवश्यक गुंतवणुकीचे मंत्र, आजच फॉलो करा अन् बना श्रीमंत

क्वांट मिड कॅप फंड (Quant Mid Cap Fund)

क्वांट मिड कॅप फंडाच्या थेट योजनेने २६.५५ टक्के परतावा दिला आहे, तर नियमित योजनेने १ वर्षात २३.९६ टक्के परतावा दिला आहे. ही योजना निफ्टी मिडकॅप १५० एकूण परतावा निर्देशांकानुसार ठरवून दिली जाते, ज्याने १ वर्षात २४.१० टक्के परतावा दिला आहे.

निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड (Nippon India Growth Fund)

निप्पॉन इंडिया ग्रोथ फंडाच्या थेट योजनेने २५.१८ टक्के परतावा दिला आहे तर नियमित योजनेने १ वर्षात २४.१७ टक्के परतावा दिला आहे. ही योजना निफ्टी मिडकॅप १५० एकूण परतावा निर्देशांकानुसार ठरवून दिली जाते, ज्याने १ वर्षात २४.१० टक्के परतावा दिला आहे.

हेही वाचाः Money Mantra : चेकवर सही करताना ‘या’ १० चुका टाळा अन्यथा मोठे नुकसान

टाटा मिडकॅप ग्रोथ फंड (Tata Midcap Growth Fund)

टाटा मिडकॅप ग्रोथ फंडाच्या थेट योजनेने २४.८० टक्के परतावा दिला आहे, तर नियमित योजनेने १ वर्षात २३.२८ टक्के परतावा दिला आहे. ही योजना निफ्टी मिडकॅप १५० एकूण परतावा निर्देशांकानुसार ठरवून दिली जाते, ज्याने १ वर्षात २४.१० टक्के परतावा दिला आहे.

महिंद्रा मॅन्युलाइफ मिड कॅप फंड (Mahindra Manulife Mid Cap Fund)

महिंद्रा मॅन्युलाइफ मिड कॅप फंडाच्या थेट योजनेने २४.३५ टक्के परतावा दिला आहे तर नियमित योजनेने १ वर्षात २२.३३ टक्के परतावा दिला आहे. ही योजना निफ्टी मिडकॅप १५० एकूण परतावा निर्देशांकानुसार ठरवून दिली जाते, ज्याने १ वर्षात २४.१० टक्के परतावा दिला आहे.