Children Mutual Funds : सध्याच्या काळात पालकांना मुलांच्या सुरक्षित भवितव्याची चिंता सतावत असते. त्यासाठीच मुलं मोठी होण्यापूर्वीच त्यांच्या नावे थोडी थोडी बचत करणे आवश्यक आहे. अशा वेळी पालक विविध प्रकारच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. पण आता छोट्या बचतींवरील परतावा कमी मिळत असल्यानं उद्दिष्ट पूर्ती होणे कठीण होऊन बसते. म्हणूनच चाइल्ड म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय असू शकतो. बाजारात अनेक फंड हाऊस आहेत, जे मुलांसाठी खास म्युच्युअल फंड ऑफर करीत आहेत. एचडीएफसी, एसीबीआय, अॅक्सिस, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल, टाटा आणि यूटीआय यांसारख्या फंडातून मुलांच्या योजना चालवल्या जात आहेत. जर त्यांच्या परताव्याबद्दल बोलायचे झाल्यास गेल्या १५ ते २० वर्षांमध्ये त्यांनी वार्षिक १२ ते १५ टक्के परतावा दिला आहे.फायनान्शिअल एक्स्प्रेसने यासंदर्भात माहिती दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा