रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड व्यवहार सुरक्षित करण्यासाठी कार्ड टोकनायझेशन प्रणाली लागू केली आहे. ऑनलाइन पेमेंटसाठी ग्राहकांना जास्तीत जास्त सुरक्षा प्रदान करणे हा या प्रणालीचा उद्देश आहे. अशा परिस्थितीत अनेक लोकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की, कार्ड टोकनायझेशन त्यांना ऑनलाइन फसवणुकीपासून कसे संरक्षण देते.
कार्ड टोकनायझेशन म्हणजे काय?
टोकनायझेशन ही एक प्रकारची प्रणाली आहे. हे ऑनलाइन पेमेंटच्या वेळी डेबिट किंवा क्रेडिट कार्ड डेटा सुरक्षित ठेवते. कार्ड टोकनायझेशनमध्ये क्रेडिट किंवा डेबिट कार्डमध्ये समाविष्ट केलेला १६ अंकी कार्ड क्रमांक, नाव, कालबाह्यता तारीख आणि कोड सुरक्षित केला जातो. कार्ड क्रमांक एका युनिक क्रमांकामध्ये रूपांतरित केला जातो. कार्ड टोकनायझेशन तृतीय पक्ष अॅप्स (third party app) किंवा वेबसाइटद्वारे सहज संपर्करहित पेमेंट सक्षम करते.
सुरक्षेसाठी कार्ड टोकनायझेशन खूप महत्त्वाचे आहे. यामुळे ऑनलाइन शॉपिंग करताना होणारी फसवणूक काही प्रमाणात कमी झाली आहे. उदाहरणार्थ, कोणत्याही व्यापाऱ्याचे तपशील हॅक झाल्यास ग्राहकांची माहिती चोरीला जाण्याचा धोकाही असतो. अशा परिस्थितीत कार्ड टोकनायझेशन ग्राहकांचा डेटा सुरक्षित ठेवण्यास मदत करते.
हेही वाचाः रेमंडच्या सिंघानियांचा एक निर्णय आणि १५०० कोटी रुपये बुडाले, नेमके काय घडले?
कार्ड टोकनायझेशन कसे कार्य करते?
कार्ड टोकनायझेशनमध्ये ग्राहकाची माहिती अल्फान्यूमेरिक आयडीमध्ये रूपांतरित केली जाते. या युनिक आयडीमध्ये ग्राहकांच्या कोणत्याही माहितीचा समावेश नसतो. अल्फान्यूमेरिक आयडी बँकेला सांगितला जातो आणि ग्राहकाची माहिती सुरक्षितरीत्या साठवली जाते. कोणत्याही व्यापाऱ्याकडे या टोकनची माहिती नसते.