वरुणला नुकतीच एका चांगल्या कंपनीमध्ये नोकरी लागली होती. मनासारखं काम आणि चांगला पगार यामुळे तो समाधानी होता. गावी राहणाऱ्या त्याच्या आईवडिलांना त्याचा अभिमान होता! शिक्षणासाठी घराबाहेर दूर शहरात राहिल्याने त्याला पैशांचे मूल्य, खर्चाचा ताळमेळ चांगला कळला होता.

आता स्वकमाईच्या पैशांचे योग्य नियोजन त्याला करायचे होते. त्याच्यासमोर गुंतवणुकीचे अनेकविध पर्याय होते, इन्शुरन्सचं महत्त्व जाणवत होतं, तरुण वयानुसार त्याची अनेक छोटी मोठी स्वप्नं होती आणि त्याचबरोबर आईवडिलांप्रती त्याला असलेल्या जबाबदारीचीसुद्धा जाणीव होती!

Kavadi for lord importance of kavadi price of a kavadi
लोक-लौकिक : ‘कवडी’मोल!
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
India turmeric export target of 1 billion doller by 2030
हळदीचे १०० कोटी डॉलरचे निर्यातलक्ष्य
what is the genome india project why it matters
विश्लेषण : जिनोमइंडिया प्रकल्प भारतासाठी किती महत्त्वाचा?
portfolio, investment , Alphaportfolio Concept ,
चला अल्फापोर्टफोलिओ तयार करूया
aishwarya narkar gives tips for couple to save money
“घर घ्यायचं ठरलं तेव्हा, वर्षाला २ लाख…”, संसारात पैशांची बचत कशी करावी? ऐश्वर्या नारकरांनी सांगितला अनुभव
Fund Jigyaza Wealth Creation Through SIP
फंड जिज्ञासा – ‘एसआयपी’च्या माध्यमातून संपत्ती निर्मिती
Portfolio With Alpha
अल्फा पोर्टफोलिओ कसा तयार करायचा?

हेही वाचा – विदेशी पर्यटकांचे जंगल भ्रमण महागणार, काय आहेत कारणे?

या सगळ्यांचा एकत्रित विचार केला तर सगळ्यासाठी कमी अधिक प्रमाणात ‘पैसा’ लागणारच होता. योग्य प्रकारे ध्येयनिश्चिती केली तर हे सगळे सोपे होईल हे त्याला जाणवले पण ही ध्येयनिश्चिती कधी करावी हे मात्र त्याला समजत नव्हते!

वरुण सारख्या अनेकांची ध्येयनिश्चितीसाठी काहीशी गोंधळलेली स्थिती असते. पुढील काही सोप्या गोष्टी तुम्हाला तुमची ध्येय निश्चित करायला मदत करतील.

१) आपले Cash flows किंवा जमा खर्चाचा ताळमेळ ओळखा

आपल्या प्रत्येकाचे मासिक उत्पन्न असते तसेच काही खर्च असतात. आवश्यक ते खर्च वगळले तर बाकीचे पैसे आपण ‘बचत’ करू शकतो. ही बचत आपण किती करू शकतो याचा आपण आधी विचार करायला हवा. कोणत्याही ध्येयासाठी आपल्याला योग्य प्रकारे गुंतवणूक करावी लागते आणि या गुंतवणुकीचा पाया ही ‘बचत’ असते! एकदा हे कळलं की ध्येयनिश्चितीची लागणारी किंमत ठरवता येते. आपली गुंतवणूक क्षमता कळते!

२) आर्थिक जबाबदाऱ्या, गरजा आणि इच्छा यांची यादी करणे

आपल्या प्रत्येकावर विविध आर्थिक जबाबदाऱ्या असतात जसं की एखादी कर्ज फेड, घरातील एखाद्या लग्न कार्यासाठी आर्थिक हातभार इत्यादी. तसंच आपल्या काही ‘गरजा’ असू शकतात जसं की आहे त्यापेक्षा मोठे घर विकत घेणे. याबरोबर, आपण भविष्यात काही इच्छा मनात बाळगतो जसं की स्वतःची कार घेणे! या सगळ्याची एकदा यादी तयार झाली की तुम्हाला विचारांना एक दिशा मिळेल.

३) आर्थिक जबाबदाऱ्या, गरजा आणि इच्छा यांचा कालावधी ठरवा

वरील गोष्टींना लागणारा वेळ अथवा कालावधी हा महत्त्वाचा ठरतो. यामुळे तुम्हाला हे समजते की कमी पल्ल्याची, मध्यम कालावधीची आणि लांब पल्ल्याची ध्येयं कोणती असू शकतात. या कालावधीनुसार सुयोग्य अशा गुंतवणूक पर्यायाचा कालावधी ठरवणे सोपे जाते.

४) प्राधान्य क्रम आणि ध्येय पूर्तीसाठी सद्य काळानुसार आवश्यक रक्कम निश्चित करा

जबाबदाऱ्या आपण टाळू शकत नाही पण इच्छेबाबत आपण विचाराधीन होऊ शकतो. गरजा खरंच किती आहेत हे तपासू शकतो. आपण या नुसार प्राधान्य क्रम ठरवू शकतो. या प्राधान्यक्रमानुसार या सगळ्या ध्येयपूर्तीसाठी आवश्यक सद्यकाळातील किंमत किंवा Present Value ठरवू शकतो. अशाप्रकारे कालावधी, प्राधान्यक्रम आणि present value नुसार तुम्ही तुमची खरी ध्येय ‘शॉर्ट लिस्ट’ करू शकता!

हेही वाचा – डिजिटल सहेली! जाणून घ्या पथदर्शी प्रकल्पाची वैशिष्ट्ये…

५) विश्लेषण करा

नुसते ध्येय ठरवून उपयोग नसतो तर ते अधिक सखोल आणि स्पष्ट हवे. उदा. मला माझी एक मोठी कार घ्यायची आहे हे जर ध्येय असेल तर त्याचे विश्लेषण असे पाहिजे – मला रु १० लाख किमतीची माझी स्वतःची कार पुढील २ वर्षांत घ्यायची आहे! हे विश्लेषण, ही स्पष्टता ध्येय ठरवताना खूप महत्त्वाची ठरते!

यामुळेच योग्य तो गुंतवणुकीचा पर्याय, भविष्यातील ध्येय मूल्यानुसार आज करायला लागणारी गुंतवणुकीची रक्कम ठरवणे आणि त्याचा कालावधी निश्चित करणे सोपे जाते! आपल्या कमाईला, गुंतवणुकीला,आणि कष्टांना जर योग्य अशा ध्येयनिश्चितीचा आधार असेल तर आपले कष्टाचे पैसे आपल्याला बरंच काही मिळवून देऊ शकतात!

Story img Loader