EPFO Account Holders Get 7 Lakh Free Insurance : जर तुम्ही EPFO ​​मध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ही तीन योजना चालवते, त्यात १९५२ ची EPF योजना; १९९५ ची EPS पेन्शन योजना आणि एम्प्लॉइज डिपॉझिट-लिंक इन्शुरन्स (EDLI) योजना यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे भविष्य निर्वाह निधीमध्ये योगदान देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी EDLI ही योजनासुद्धा उपलब्ध आहे. ही योजना अकाली निधन झाल्यास कर्मचाऱ्यांच्या नामनिर्देशित व्यक्तींना ७ लाख रुपयांचे मृत्यू लाभ प्रदान करते. EPS आणि EPF योजनांच्या बाबतीत कर्मचार्‍यांना योगदान द्यावे लागते, EDLI योजनेसाठी कर्मचार्‍याला कोणतेही योगदान द्यावे लागत नाही. योजनेत फक्त नियोक्ता योगदान देतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आनंद राठी इन्शुरन्स ब्रोकर्सचे एम्प्लॉई बेनिफिट्स प्रॅक्टिस आणि इंटरनॅशनल बिझनेसचे संचालक अमजद खान यांनीसुद्धा यावर प्रतिक्रिया दिलीय. “कोणत्याही कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना विमा संरक्षण म्हणून EPFO द्वारे प्रदान केला जाणारा हा एक लाभ आहे. ही योजना १९७६ मध्ये सुरू करण्यात आली आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा १९५२ अंतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व संस्था EDLI लाभांसाठी नोंदणीकृत असतात. जर तुम्हाला जास्त लाभ देणारी जीवन विमा योजना घ्यायची असेल, तर तुम्ही या योजनेची निवड रद्द करू शकता,” असंही आनंद राठी इन्शुरन्स ब्रोकर्सचे एम्प्लॉई बेनिफिट्स प्रॅक्टिस आणि इंटरनॅशनल बिझनेसचे संचालक अमजद खान म्हणालेत.

हेही वाचाः Money Mantra : पॅन-आधार अद्याप लिंक केले नाही, मग करदात्यांना भरावा लागणार ६००० रुपयांचा दंड, जाणून घ्या कसा?

EDLI योगदान

EPF लाभाच्या बाबतीत कर्मचारी आणि नियोक्ता यांचे योगदान महत्त्वाचे असते. पण EDLI योजनेंतर्गत योगदान फक्त नियोक्त्याकडून बेसिक + DA च्या ०.५ टक्क्यांवर येते, कमाल ७५ रुपये द्यावे लागतात. शिवाय तुम्ही काम करत असलेल्या कंपन्यांवर कोणतेही बंधन नाही. तुम्ही एक वर्ष सतत काम केले असेल तरच ही योजना सुरू होईल. त्यासाठी तुम्ही EPF चे सक्रिय सदस्य असणे आवश्यक आहे.

हेही वाचाः ८ वर्षांचा विक्रम मोडत टाटा मोटर्सचा शेअर नवीन उंचीवर; जेएलआरच्या जबरदस्त विक्रीनं बनला नवा रेकॉर्ड

EDLI गणना

एखाद्या कर्मचाऱ्याच्या नोकरीच्या शेवटच्या १२ महिन्यांतील सरासरी मासिक पगाराच्या ३५ पट घेऊन गणना केली जाते. खान म्हणाले, “कमाल सरासरी मासिक पगार १५,००० हजार रुपये असल्यास अशा प्रकारे ३५ पट कमाल मर्यादा म्हणजे ३५ x १५,००० = ५.२५ लाख रुपये आहेत. या योजनेंतर्गत एकूण देय रक्कम ७ लाख रुपये होण्यासाठी संस्था १.७५ लाख रुपयांपर्यंत बोनसची रक्कम जोडते.”

दाव्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे

अकाली निधन झाल्यास नामनिर्देशित व्यक्तींनी पीएफ, पेन्शन काढणे आणि EDLI दाव्यांसाठी संयुक्त दावा फॉर्मद्वारे भरणे आवश्यक आहे. नामनिर्देशित व्यक्तीकडे कर्मचाऱ्याच्या मृत्यूचे प्रमाणपत्र किंवा उत्तराधिकार प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. याशिवाय कॅन्सल चेकही जोडावा लागतो.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Money mantra epfo account holders get 7 lakh insurance absolutely free know how to get the benefit vrd
Show comments