प्रियदर्शिनी मुळ्ये

दिवाळीच्या निमित्ताने फराल, दिवाळीची gifts घेणे, घरातल्यांसाठी खरेदी, आणि मुख्य म्हणजे ‘ घरातली साफ सफाई ‘!! Weekend ला घराची साफ सफाई करताना, त्यांना अनेक उपयोगी पण दुर्लक्षित वस्तू नव्याने सापडल्या. अनेक ज्यादा , त्यांच्यासाठी निरूपयोगी पण चांगल्या वस्तू त्यांनी गरजू संस्थांना देण्यासाठी बाजूला काढल्या.

New Home Investment, Tax Exemption,
करावे कर समाधान : नवीन घरातील गुंतवणूक आणि कर सवलत
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Why did the stock market fall before Diwali
Money Mantra : दिवाळीच्या आधी मार्केट का घसरलं?
international market investment
मार्ग सुबत्तेचा : आंतरराष्ट्रीय गुंतवणूक करताना….
share market down marathi news,
शेअर बाजारात दिवाळीपूर्वीच आतिषबाजी!
sensex drops 663 point nifty ends below 24200
‘मुद्रा’ कर्जांची मर्यादा दुपटीने वाढून २० लाखांवर
unified pension scheme
Money Mantra: युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे काय? याचा फायदा कोणाला मिळणार आहे?
credit card marathi article
Money Mantra: क्रेडिट कार्ड वापरताना काय काळजी घ्यावी?

दमून भागून, निवांत चहा पिताना सहज अमृता अमेयला म्हणाली, ” अरे, आपल्या घराप्रमाणे जरा आता आपल्या आर्थिक घटकांकडे, पोर्टफोलिओ कडे सुद्धा लक्ष देऊया. कधीपासून घेतलेले शेअर्स, हातात गुंतवण्यायोग्य पैसे आहेत म्हणून गुंतवलेले fixed Deposits, वाचून – ऐकून घेतलेले म्युच्युअल फंड, इतकेच नाही तर आपल्याकडे आता बँक savings a/c ची संख्या सुद्धा वाढली आहे. आता याकडे वेळीच लक्ष देऊ”!

तिच्या बोलण्यात तथ्य होतं. अमेयने लगेच यावर काम करायचं ठरवलं. खरं तर बरेचदा , रोजच्या धावपळीत, करिअरच्या स्पर्धेत, आयुष्यातल्या इतर जबाबदाऱ्या पार पाडताना, आपण आपल्या स्वतः च्या आर्थिक घटकांकडे लक्ष द्यायला, त्यांचा मागोवा घ्यायला, त्यात बदल करायला मागे पडतो.

चला तर मग, या दिवाळीत जरा या सगळ्याचा मागोवा घेऊया, आणि त्यांना योग्य प्रकारे align करूया!

तुम्हाला हे सोप्या पद्धतीने कसं करता येईल त्यासाठी पुढील सोप्या पद्धतींचा अवलंब करा –

१. सर्व आर्थिक बाबींची आणि घटकांची यादी करा

यात पुढील गोष्टींचा अंतर्भाव करा –
-Physical शेअर्स
-डिमॅट अकाउंट चे सर्व details
-Bank savings a/c आणि त्यांची यादी
-म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ स्टेटमेंट
-बॉण्ड्स
-पोस्ट ऑफिसमधील गुंतवणुकी आणि त्यांची यादी
-सर्व प्रकारच्या इन्शुरन्स पॉलिसी
-बँक गुंतवणूक जसं की fixed deposit, recurring deposit

  • तुमचे कर्जाचे तपशील
  • तुमच्या मालमत्तेचे सर्व तपशील

२. सखोल अभ्यास करा

वरील सर्व घटकांचा तुम्ही आता सखोल अभ्यास करा.
यात पुढील गोष्टी नक्की तपासा –

  • कोणत्या कालावधी उलटून गेलेल्या गुंतवणुकी
  • ज्या गुंतवणुकीमध्ये नॉमिनेशन नसेल त्या गुंतवणुक, मालमत्ता आणि इन्शुरन्स पॉलिसी
  • कोणताही तो आर्थिक घटक ज्यांची तुम्हाला पुरेशी माहिती नाही
  • गुंतवणुक ज्यांचा अधिकृत source, आढावा घेण्याची पध्दत आणि platform बद्दल तुम्हाला पुरेशी माहिती नाही
  • वडिलोपार्जित आणि स्व- मालकीच्या मालमत्ता, त्यांची सर्व कागदपत्रे

३. Action plan

वरीलप्रमाणे तुम्ही एकदा का तुमच्या आर्थिक घटकांचा आढावा घेतला की मग हळूहळू action plan तयार करा.

  • सर्व गुंतवणुका, इन्शुरन्स पॉलिसी आणि मालमत्ता यामध्ये nomination नोंद करा
  • ज्यादा असलेली सगळी बँक a/c किंवा demat a/c बंद करा
  • बाजार जोखमीच्या आधी गुंतवणुका ( market linked investment) चा आढावा घ्या. त्यातील तुमच्या ध्येयांना, आणि जोखमीला साजेसे फंड ठेऊन बाकीचे फंड तुम्ही काढून टाकू शकता. हे करताना त्यांचा आत्तापर्यंतचा परतावा, विविध मार्केट conditions मध्ये त्यांचा performance तपासा.
  • मुदत पूर्ण होत असलेल्या गुंतवणुका जसं की बँक FD, recurring deposit, बाँड इत्यादीची नोंद करून त्यांच्या पुनर्गुंतवणुकीचा विचार करा.
  • तुमच्या मालमत्तामध्ये वारस नोंद इत्यादी गोष्टी तपासा.

४. सर्व तपशीलांची नोंद करा

वरीलप्रमाणे सर्व आवश्यक ते बदल केल्यावर तुम्ही आता तुमच्या सर्व आर्थिक घटकांची नोंद नव्याने करा. ते वेळोवेळी update करत जा.

यासाठी तुम्ही एका डायरीमध्ये किंवा तुमच्या स्वतः च्या कॉम्प्युटरमध्ये सुद्धा ही नोंद ठेऊ शकता. तुमच्या कुटुंबियांना याची पूर्ण माहिती असू द्या.

५. तुमचं भविष्यातील ध्येय निश्चित करा

कमी आणि लांब पल्ल्याची ध्येय निश्चित करा. याद्वारे तुम्ही तुमच्या आताच्या गुंतवणुका त्या ध्येयासाठी संलग्न करु शकता. नवीन करायच्या गुंतवणुकासुद्धा तुम्ही त्याप्रमाणे नियोजन करू शकता.

आर्थिक नियोजन आणि त्याचा आढावा आपल्याला सातत्याने घ्यावा लागतो. दिवाळीच्या निमित्ताने आपण तो घेतला तर येत्या नवीन वर्षात आपल्याला आपले आर्थिक नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करता येईल.