Free Aadhaar Update Deadline: आधार कार्ड हा भारतातील महत्त्वाच्या आयडींपैकी एक आहे, ज्याचा वापर शाळा प्रवेशापासून प्रवासापर्यंत अन् सरकारी योजनांचा लाभ मिळवणे, बँक खाते उघडणे इत्यादी सर्व महत्त्वाच्या कामांसाठी केला जातो. त्यामुळेच आधार अपडेट ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. UIDAI या आधार जारी करणाऱ्या संस्थेने नागरिकांना आधार अपडेट करण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून दिली आहे. तुम्हाला या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर १४ डिसेंबर २०२३ पर्यंत आधार अपडेट करा.

१० वर्षे जुने आधार अपडेट करणे अनिवार्य

आधार कार्ड हे आजकाल अतिशय महत्त्वाचे ओळखपत्र बनले आहे. अशा परिस्थितीत यासंबंधीच्या फसवणुकीची प्रकरणे अनेकदा समोर येतात. नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून वाचवण्यासाठी UIDAI लोकांना १० वर्षे किंवा त्याहून जुने आधार अपडेट करण्याचा सल्ला देत आहे.

Image of the BSE building.
Union Budget 2025 : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दिवशी शनिवार असूनही सुरू राहणार शेअर बाजार, ‘एनएसई’ने दिली मोठी अपडेट
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
chaturang article padsad
पडसाद : गृहिणीकडे स्वमर्जीने खर्च करण्यासाठी निधी हवाच
Shani Gochar 2024
पुढील १०३ दिवस शनी देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार धनसंपत्ती आणि प्रत्येक कामात यश
Income Tax Return, Income Tax, Tax, loksatta news,
इन्कम टॅक्स रिटर्न अजूनही दाखल करता येईल?
ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
Guru Asta 2025 Guru will set for 27 days in the new year
Guru Ast 2025: नवीन वर्षात २७ दिवसांनी अस्त होणार गुरू! ‘या’ राशींची होणार चांदी, झटपट वाढेल पगार
Free Aadhaar update details in marathi
Free Aadhaar update: उरला फक्त शेवटचा १ दिवस, आधारकार्डशी संबंधित ‘हे’ काम पटापट करा, अन्यथा…;

हेही वाचाः शेअर बाजाराची विक्रमी वाढ सुरूच, सेन्सेक्स ४३१ अंकांनी वधारला, निफ्टीने प्रथमच २०८५० चा टप्पा ओलांडला

आधार विनामूल्य अद्ययावत करता येणार

UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, कोणताही नागरिक त्यांची बायोमेट्रिक माहिती आणि नाव, मोबाईल नंबर, लिंग, पत्ता, पिन इत्यादी सारखे लोकसंख्या डेटा कोणत्याही अडचणीशिवाय सहजपणे ऑनलाइन अपडेट करू शकतो. यासाठी तुम्हाला वेगळे शुल्क भरावे लागणार नाही. मोफत आधार अपडेटची सुविधा फक्त ऑनलाइन अपडेटवर उपलब्ध असेल. आधार केंद्रावर जाऊन आधार अपडेट करण्यासाठी तुम्हाला शुल्क भरावे लागेल.

हेही वाचाः मोदी सरकारने सात वर्षांत २००० रुपयांच्या नोटा वितरणातून केल्या बाहेर, छपाईवर १७,६८८ कोटी रुपये खर्च

याप्रमाणे मोफत आधार ऑनलाइन अपडेट करा

  • यासाठी UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला आधार अपडेटचा पर्याय निवडावा लागेल.
  • उदाहरणार्थ, पत्ता अपडेट करण्यासाठी तुम्हाला अपडेट अॅड्रेसचा पर्याय निवडावा लागेल.
  • पुढे नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर येथे ओटीपी टाकावा लागेल.
  • यानंतर Documents Update चा पर्याय निवडावा लागेल.
  • पुढे तुम्हाला आधारशी संबंधित तपशील दिसेल.
  • सर्व तपशील सत्यापित करा आणि नंतर पत्ता अद्ययावत करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • यानंतर आधार अपडेट प्रक्रिया स्वीकारा.
  • यानंतर तुम्हाला १४ नंबरचा अपडेट रिक्वेस्ट (URN) नंबर मिळेल.
  • याद्वारे तुम्ही आधार अपडेटच्या प्रक्रियेचा मागोवा घेऊ शकता.

Story img Loader