गेल्या वर्षभरात कर्जाच्या व्याजदरात लक्षणीय वाढ झाली आहे. आरबीआयकडून रेपो रेट वाढवणे हे त्यामागचे कारण होते. परंतु गेल्या तीन आर्थिक धोरणांमध्ये रेपो दर मध्यवर्ती बँकेने स्थिर ठेवला आहे. मात्र, आता काही बँकांकडून व्याजात वाढ करण्यात येत आहे. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा यांनी ऑगस्टमध्ये MCLR वाढवला आहे. MCLR हा असा दर आहे, ज्याच्या आधारावर बँका वाहन कर्ज, गृह कर्ज आणि वैयक्तिक कर्जासाठी व्याजदर ठरवतात.

बँक ऑफ बडोदा

बँक ऑफ बडोदाने सर्व मुदतीसाठी MCLR मध्ये ५ बेसिस पॉइंट्स (०.०५ टक्के) वाढ केली आहे. हे नवीन दर १२ ऑगस्ट २०२३ पासून लागू झाले आहेत. या वाढीनंतर एक वर्षाचा MCLR ८.०० टक्के झाला आहे.

Thane Anti Corruption Bureau arrested senior clerk for demanding two percent to clear dues
लाचेप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीक अटकेत
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
rupee continues to depreciate, US dollar, rupee ,
रुपयाचे मूल्य आणखी खोलात!
Income Tax , salary , Finance Minister,
पगारदारांच्या ‘इन्कम टॅक्स’मध्ये कपात? क्रयशक्तीत वाढीसाठी अर्थमंत्र्यांकडून उपाय शक्य
A photo representing gold investment.
Gold Investment : सोने गुंतवणूकदारांची चांदी, २०२४ मध्ये मिळवला २७ टक्के परतावा; भविष्यातही सोने चकाकणार

एचडीएफसी बँक

HDFC बँकेने निवडक कालावधीसाठी MCLR १५ बेसिस पॉइंट्सपर्यंत वाढवला आहे. हे नवे दर ७ ऑगस्टपासून लागू झाले आहेत. बँकेने एका रात्रीत MCLR १० बेसिस पॉइंट्सने वाढवून ८.३५ टक्के केला. पूर्वी तो ८.२५ टक्के होता. एक महिन्याचा MCLR पूर्वी ८.३० टक्क्यांवरून ८.४५ टक्के करण्यात आला आहे. तसेच तीन महिन्यांच्या MCLR मध्ये १० आधार अंकांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे तो ८.६० टक्क्यांवरून ८.७० टक्के झाला आहे. सहा महिन्यांचा MCLR ८.९० टक्क्यांवरून ८.९५ टक्क्यांनी ५ बेसिस पॉइंटने वाढवला आहे. एक वर्षाचा MCLR पूर्वी ९.०५ टक्क्यांवरून ५ बेसिस पॉइंट्सने वाढवून ९.१० टक्के करण्यात आला आहे. MCLR मध्ये एक वर्षापेक्षा जास्त काळ कोणताही बदल नाही.

आयसीआयसीआय बँक

आयसीआयसीआय बँकेकडून सर्व मुदतीच्या MCLR मध्ये ५ बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली आहे. या वाढीनंतर एक वर्षाचा MCLR ८.४० टक्के, तीन आणि सहा महिन्यांचा MCLR ८.४५ टक्के आणि ८.८० टक्के झाला आहे.

बँक ऑफ इंडिया

बँक ऑफ इंडियाने निवडक मुदतीसाठी MCLR वाढवला आहे. या वाढीनंतर ओव्हरनाइट MCLR ७.९५ टक्के, तीन आणि सहा महिन्यांचा MCLR ८.३० टक्के आणि ८.५० टक्के आहे. एक वर्षाचा MCLR ८.७० टक्के आहे.

Story img Loader