Diwali 2023: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने (EPFO) ने आपल्या कर्मचार्यांना दिवाळी भेट देताना आर्थिक वर्ष २०२२-२३ चे व्याजदर खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यास सुरुवात केली आहे. या आर्थिक वर्षात EPFO खातेदारांच्या खात्यात जमा केलेल्या रकमेवर (आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी EPFO व्याजदर) ८.१५ टक्के व्याजदर देत आहे. EPFO चे व्याजदर दरवर्षी सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी (CBT) आणि वित्त मंत्रालयाद्वारे ठरवले जातात. या वर्षाबद्दल बोलायचे झाल्यास सरकारने २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी जून २०२३ मध्ये व्याजदर जाहीर केले होते. यानंतर सरकारने व्याजदराचे पैसे पीएफ खातेदारांच्या खात्यात हस्तांतरित करण्यास सुरुवात केली आहे.
ईपीएफओने दिली माहिती
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X म्हणजेच ट्विटरवरील अनेक युजर्स ईपीएफओला त्यांच्या खात्यात व्याजाचे पैसे कधी ट्रान्सफर केले जातील हे विचारत आहेत. सुकुमार दास नावाच्या युजरने या संदर्भात प्रश्न विचारला असता, ईपीएफओने उत्तर दिले की, खात्यात व्याज हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि खातेधारकांना यंदा कोणतेही नुकसान न होता संपूर्ण व्याजाची रक्कम मिळेल. याबरोबरच ईपीएफओने कर्मचाऱ्यांना संयम राखण्याची विनंती केली आहे.
हेही वाचाः अभिनेता रणवीर सिंगने मुंबईतील दोन अपार्टमेंट विकल्या; ‘इतक्या’ कोटींमध्ये झाला सौदा
पीएफ बॅलन्स कसा तपासायचा?
जर तुम्ही पीएफ खातेधारक असाल आणि तुमच्या खात्यातील शिल्लक तपासायची असेल तर तुम्ही हे सहज करू शकता. यासाठी तुम्ही मेसेज, मिस्ड कॉल, उमंग अॅप किंवा ईपीएफओ वेबसाइटची मदत घेऊ शकता. मेसेजद्वारे शिल्लक तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या EPFO नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून ७७३८२९९८९९ वर मेसेज पाठवावा लागेल. याशिवाय तुम्ही ०११-२२९०१४०६ या क्रमांकावर मिस्ड कॉल पाठवूनही बॅलन्स तपासू शकता. EPFO पोर्टलवर जाऊन आणि कर्मचाऱ्यांसाठी विभागात जाऊन बॅलन्स तपासता येतो.
हेही वाचाः आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ०९ नोव्हेंबरपर्यंत १२.३७ लाख कोटी रुपये एकूण प्रत्यक्ष कर संकलन
उमंग अॅपवर बॅलन्स तपासण्यासाठी आधी तुमच्या मोबाईलमध्ये अॅप डाऊनलोड करा. यानंतर EPFO विभागात जा आणि सर्व्हिस पर्याय निवडा आणि पासबुक पाहा. कर्मचारी-केंद्रित सेवेवर जा आणि OTP पर्याय निवडा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल आणि तो टाका. काही मिनिटांतच तुमच्यासमोर EPFO पासबुक उघडेल.