How to invest in gold during festive season and balance your portfolio : सोने हे भारतीयांच्या आवडीचं साधन असून, महिला सोन्याचे दागिणे परिधान करायला पहिली पसंती देतात. सणासुदीच्या काळात तर सोन्याला प्रचंड मागणी असते. कारण लोकांना सणासुदीच्या काळात सोने खरेदी करायला आवडते. या पारंपरिक गुंतवणुकीतही तुमचा पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण ठेवण्याची सोन्यात ताकद आहे, त्यामुळे यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते. खरं तर सणासुदीच्या काळात सोने खरेदी करण्याच्या जुन्या प्रथेला तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये समतोल साधण्याच्या संधीत रूपांतरित करू शकता, त्याबद्दल संपूर्ण माहिती घेतल्यानंतर योग्य गुंतवणुकीचा निर्णय घेणे आवश्यक आहे. कोणत्याही गुंतवणूकदाराच्या पोर्टफोलिओमध्ये वाढ, स्थिरता आणि सुरक्षितता यांचा चांगला समतोल राखणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ संतुलित करायचा असेल तर सोन्यात गुंतवणूक करणे हा एक उत्तम मार्ग असू शकतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा