देशात सायबर गुन्ह्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, असं २०२३ मध्ये गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. आता सायबर गुन्ह्यात कर्जाचाही समावेश करण्यात आला आहे. सायबर फसवणूक करण्यासाठी बरेच लोक दुसर्‍या व्यक्तीच्या नावावर कर्ज घेतात. या फसवणुकीचे प्रमाणही गेल्या काही दिवसांपासून वाढले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फसवणूक करणारे लोक दुसऱ्याच्या नावाने बनावट कर्ज घेतात. कर्जामध्ये घेतलेली रक्कम ज्याच्या नावावर कर्ज घेतले आहे, त्या व्यक्तीने भरावी लागते. अशा फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. आज या बातमीद्वारे आपण तुमच्या नावे इतर कोणी कर्ज घेतलेले असल्यास ते जाणून घेणार आहोत, तसेच एखाद्याने कर्ज घेतले असेल तर त्याची तक्रार कुठे करायची? याचीसुद्धा माहिती देणार आहोत.

तुमच्या नावावर किती कर्जे आहेत ते पाहा?

तुमच्या नावावर किती कर्जे घेतली आहेत हे तुम्हाला तपासायचे असेल तर तुम्ही ते तुमच्या सिबिल स्कोरवरून तपासू शकता. CIBIL स्कोरमध्ये तुम्ही कर्जाचे तपशील जाणून घेऊ शकता. जर तुमच्या नावावर कोणतेही बनावट कर्ज असेल तर तुम्ही त्याची माहिती CIBIL स्कोरवरून मिळवू शकता.

CIBIL स्कोर काय आहे?

जेव्हा एखादी व्यक्ती कर्ज घेते तेव्हा तो त्याचा CIBIL स्कोर तपासतो. खरं तर CIBIL स्कोर एखाद्या व्यक्तीची आर्थिक स्थिती दर्शवतो. एखाद्या व्यक्तीचा CIBIL स्कोर चांगला असेल तर त्याला कर्ज सहज मिळू शकते, परंतु एखाद्या व्यक्तीचा CIBIL स्कोर खराब असल्यास त्याला कर्ज मिळण्यात अडचणी येतात. तुम्ही वेळेवर कर्ज किंवा क्रेडिट कार्ड पेमेंट न केल्यास CIBIL स्कोर खराब होतो. तुमचा CIBIL स्कोर खराब असल्यास तुम्ही डिफॉल्टरच्या यादीत सामील होऊ शकता. देशात अनेक क्रेडिट ब्युरो आहेत, जिथे तुम्ही तुमचा क्रेडिट रिपोर्ट विनामूल्य तपासू शकता. याशिवाय तुम्ही अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर तुमचा सिबिल स्कोर सहज तपासू शकता. CIBIL स्कोअर मोफत तपासण्याची सुविधा देखील बँक अॅप्सवर प्रदान करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Money mantra has anyone else taken a loan in your name now you will understand in a few minutes vrd