यापूर्वीच्या लेखात आपण आयुर्विम्याच्या पारंपारिक योजनांविषयी म्हणजेच टर्म इन्शुरन्स, एंडौमेंट, मनी बॅक, होल लाईफ पॉलिसी अशा विमा प्रकारांविषयी माहिती घेतली. आज आपण युलिप्स विषयी माहिती घेऊ या. युलिप्स या विमा योजनाच आहेत.

एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की युलिप्स या सुद्धा आयुर्विम्याच्या योजना आहेत. त्यामुळे यामध्ये सुद्धा प्रपोजल फॉर्म, विमा रक्कम, पॉलिसी दस्तावेज, प्रीमियम भरणे, मॅच्युरिटी क्लेम, डेथ क्लेम या सर्व गोष्टी इतर पारंपारिक योजनांप्रमाणेच असतात. मग युलिप्स योजना नेमक्या वेगळ्या कशा आहेत ते आपण पाहू. या योजना युनिट लिंक्ड म्हणजे भांडवली बाजाराशी निगडित असतात.पण म्हणजे नेमकं काय याबद्दल थोडं बोलू या.

Malavya Yoga and Kendra Trikon Rajyoga 2025
२०२५मध्ये ग्रहांचा अद्भुत संयोग! मीन राशीत निर्माण होईल केंद्र त्रिकोण-मालव्य राजयोग; नोकरीत होईल पदोन्नती, अचानक होईल आर्थिक लाभ
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Budh Margi 2024
बुध चालणार सरळ चाल, ‘या’ तीन राशींचे उजळणार नशीब; मिळणार अपार पैसा अन् धन
What is LIC Bima Sakhi Yojana ?
LIC ची विमा सखी योजना काय आहे? महिन्याला ७ हजार रुपये देणाऱ्या खास स्कीमच्या अटी आणि नियम काय आहेत?
Daily Horoscope 11 December 2024 in Marathi
११ डिसेंबर पंचांग: मोक्षदा एकादशीला धनूसह ‘या’ राशींना भगवान विष्णूसह लक्ष्मीही देईल आशीर्वाद; वाचा तुमचा बुधवार कसा जाणार?
Shani Nakshatra transformation 2024
२०२५ सुरू होण्याआधीच शनी देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तनाने मिळणार पैसा आणि प्रतिष्ठा
Shukra Budh Labh Yog
चार दिवसानंतर अचानक पलटणार या ३ राशींचे नशीब, शुक्र-बुधच्या लाभ दृष्टीचा दुर्मिळ योग
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?

पारंपरिक योजनांतील बोनसच्या स्वरूपात मिळणारे रिटर्न्स आकर्षक का नसतात?

पारंपरिक योजनांमध्ये प्रीमियमच्या रूपानं विमेदारांकडून मिळालेल्या रकमेतून विमा कंपनी विमा संरक्षण मूल्य (Cost of insurance) आणि विमा पॉलिसी संदर्भातले विविध खर्च (विमा पॉलिसी तयार करणे, स्टॅम्प ड्युटी, विमा पॉलिसी सेवा खर्च इत्यादी) यासाठीची आवश्यक रक्कम वजा करून झाल्यावर उर्वरित रकमेची गुंतवणूक करत असते. ही गुंतवणूक करत असताना सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. त्यामुळे शेअर मार्केट मध्ये किंवा भांडवली बाजारात फारशी गुंतवणूक केली जात नाही. विमा कायद्यातील मार्गदर्शक तत्त्वे आणि विमा कंपनीची विश्वस्ताची (Trustee) भूमिका याच्याशी ते सुसंगतही आहे. साहजिकच अशा गुंतवणुकी मधून आकर्षक परताव्याची (रिटर्न्स) ची अपेक्षा कशी काय करू शकणार? त्यामुळे यातून मिळणारे रिटर्न्स माफकच असतात. परिणामी विमेदारांना मिळणारा बोनस सुद्धा अल्प म्हणजे तीन ते पाच टक्के इतका कमी असतो.

युलिप्स: आकर्षक रिटर्न्स शक्य अर्थात जोखीम विमेदाराची

अशा पारंपारिक विमा योजनांना पर्याय म्हणून आलेल्या आणि अधिक आकर्षक परतावा देण्याची क्षमता असलेल्या योजना म्हणजे युलिप्स. यामध्ये विविध गुंतवणूक फंडांचे पर्याय विमेदारांना उपलब्ध करून दिलेले असतात, ज्यायोगे विमेदारांना भांडवली बाजारात गुंतवणूक करण्याची संधी मिळते. अर्थात भांडवली बाजारात ज्याप्रमाणे अधिक आकर्षक परतावा मिळण्याची शक्यता असते, त्याचप्रमाणे तेथे नुकसानीची जोखीम (Risk) सुद्धा असते. ही जोखीम अर्थातच विमेदाराची असते. कंपनीकडील उपलब्ध फंडांची रचना पारदर्शक असते आणि विमेदाराला त्यांच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार फंड निवडीचे स्वातंत्र्यही असते. आपण एक उदाहरण घेऊन हे समजून घेऊ या.

हेही वाचा… Money Mantra: एनपीएस आणि रिस्क प्रोफाईल

समजा, एखाद्या कंपनीने ग्रोथ फंड, बॉंड फंड आणि बॅलन्स फंड असे तीन फंड विमेदारांना उपलब्ध करून दिले आहेत. अर्थात केवळ फंडांच्या या नावावरून काहीच अर्थ बोध होणार नाही. परंतु या फंडांची रचना असं सांगते की ग्रोथ फंड निवडलात तर तुमची ८० टक्के गुंतवणूक शेअर्स मध्ये आणि २०% गुंतवणूक सरकारी रोखे व अन्य सुरक्षित ठिकाणी केली जाते. बॉंड फंडामध्ये याच्या नेमकी उलट स्थिती आहे. इथे ८५% गुंतवणूक सुरक्षित ठिकाणी केली जाते आणि भांडवली बाजारात अवघी १५% गुंतवणूक होते, आणि बॅलन्स फंडात ४०% शेअर्स मध्ये तर ६०% सुरक्षित गुंतवणूक केली जाते.

यावरून हे लक्षात येईल की ग्रोथ फंडामध्ये शेअर्समधील गुंतवणूक जास्त असल्यामुळे अधिक आकर्षक रिटर्न्स मिळण्याची शक्यता आहे, अर्थात तिथं जोखीमही अधिक आहे. याउलट बॉंड फंडात जोखीम नगण्य असेल पण मिळणारे रिटर्न्सही माफकच असतील. बॅलन्स फंडात जोखीम आणि रिटर्न्स दोन्ही मध्यम स्वरूपात असतील. आता विमेदाराने आपली जोखीम घेण्याची क्षमता किती आहे याचा विचार करून, त्या फंडांचा पूर्वेतिहास तपासून पाहून योग्य फंडाची निवड करायची आहे. यासाठी तो जरूर तर सल्लागाराचं मार्गदर्शनही घेऊ शकतो.

प्रिमियम चे रूपांतर युनिट्स मध्ये कसे होते?

विमेदाराने प्रीमियम भरल्यानंतर वर सांगितल्याप्रमाणे चार्जेस Cost of insurance (यालाच Mortality charges असेही म्हणतात) आणि विविध खर्च (Expenses ) वजा करून उर्वरित रक्कम विमेदाराने निवडलेल्या फंडात गुंतवली जाते आणि ज्या दिवशी ही गुंतवणूक केली जाते त्या दिवसाच्या युनिटच्या मूल्यानुसार (एन ए व्ही = एका युनिटचे मूल्य ) विमेदाराच्या खात्यात युनिट्स जमा होतात.

हेही वाचा… Money Mantra: Post Retirement Income: रिटायरमेंटनंतरचं उत्पन्न करपात्र की करमुक्त?

समजा, विमेदाराने भरलेल्या रुपये १६००० इतक्या वार्षिक प्रीमियम मधून एक हजार रुपये चार्जेस वजा झाले आणि १५००० रुपये गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहेत. विमेदाराने निवडलेल्या फंडाच्या एका युनिटचे त्या दिवशीचे मूल्य (एन ए व्ही) १२ रुपये असेल तर विमेदाराच्या खात्यात १२५० युनिट्स ,(१५००० ÷ १२ )जमा होतील. दरवर्षी प्रीमियम भरल्यानंतर त्याच्या खात्यात अशा प्रकारे युनिट्स जमा होत राहतील आणि मुदतपूर्तीच्या दिवशी पॉलिसी फंड व्हॅल्यू म्हणजेच अशा जमा झालेल्या एकूण युनिट्सचे मूल्य (एकूण युनिट्सची संख्या × मुदतपूर्तीच्या दिवसाचे प्रति युनिट मूल्य ) विमेदाराला मॅच्युरिटी क्लेम रक्कम म्हणून मिळेल. फंडाची कामगिरी चांगली असेल तर प्रति युनिट मूल्य (एन ए व्ही ) चांगल्यापैकी वाढलेलं असेल (जशी शेअरची किंमत वाढते) आणि विमेदाराला भरघोस रक्कम मिळेल. दुर्दैवाने ही कामगिरी फारशी चांगली नसेल तर मिळणारे रिटर्न्स सुद्धा माफकच असतील किंबहुना यामध्ये नुकसान सुद्धा होऊ शकते. अर्थात असं नुकसान होण्याची शक्यता खूप कमी असते. कारण पॉलिसीचे करार हे १५, २०, २५ अशा वर्षांचे म्हणजेच दीर्घ मुदतीचे असतात. त्यामुळे मार्केटचा अनुभव असं सांगतो की अशा नुकसानीची शक्यता जवळजवळ नसते.

डेथ क्लेम मध्ये विमा रक्कम सुरक्षित असते

मुदतपूर्तीच्या आधी विमेदाराचा मृत्यु झाल्यास वरीलप्रमाणे येणारी पॉलिसी फंड व्हॅल्यू म्हणजेच त्या दिवशीचे एकूण युनिट्सचे मूल्य किंवा मूळ विमा रक्कम यापैकी जास्त असणारी रक्कम डेथ क्लेम म्हणून नॉमिनीला दिली जाते. म्हणजेच फंडाची कामगिरी जरी खूप खराब असली तरी मूळ विमा रकमेवर त्याचा परिणाम होत नाही, ती सुरक्षितच राहते.

थोडक्यात

१. युलिप्स या विमा योजनाच आहेत. परंतु यात रिटर्न्सवर विशेष फोकस असतो. या insurance cum investment योजना आहेत. पारंपरिक योजनांत investment वर नव्हे तर insurance वर फोकस असतो.

२. युलिप्समध्ये विमा संरक्षण आहेच, पण यात भांडवली बाजारातील गुंतवणूकीमुळे अधिक आकर्षक रिटर्न्स मिळण्याचीही शक्यता आहे, जी पारंपारिक योजनांत नाही.

३. अर्थात ‘No Risk No Gain’ प्रमाणे युलिप्समध्ये अधिक रिटर्न्स मिळवण्यासाठी थोडीशी जोखीमही (Risk) आहे, जी विमेदारानेच सोसायची असते. पारंपारिक योजना सुरक्षित आणि त्यामुळेच अत्यंत मर्यादित रिटर्न्स देतात.

४. युलिप्समध्ये गुंतवणुकीसाठी फंड निवडीचे स्वातंत्र्य तर असतेच, पण नियमानुसार त्या फंडात बदलही (switching) करता येतात. याशिवाय फंडात अधिक रक्कम गुंतविणे (Top up) किंवा फंडातून काही रक्कम काढून घेणे (Partial withdrawal) याही सुविधा असतात. अशी लवचिकता (flexibility) पारंपारिक योजनात उपलब्ध नसते.

५. युलिप्समध्ये चार्जेस, गुंतवणुकीचे फंड, फंडाची रचना, फंडाचे मूल्यमापन (Performance) याबाबत पारदर्शकता असते, जिचा पारंपारिक योजनात अभाव असतो.

Story img Loader