सीए डॉ दिलीप सातभाई
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
राष्ट्रीय निवृत्त वेतन प्रणालीने गुंतवणूकदरांच्या प्राधान्यबरहुकूम व जोखीम अंगीकार वृत्तीला साजेसे असे बहुविध गुंतवणूक पर्याय तयार केले आहेत. अशा तयार केलेल्या विविध पेन्शन गुंतवणूक पर्यायांमधून अनिवासी भारतीय (एनआरआय) आणि ओसीआय त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी नॅशनल पेन्शन सिस्टम (एनपीएस) मध्ये गुंतवणूक करू शकतात इतकी महत्वाची व आदर्श हे निवृत्त वेतन प्रणाली आहे. या प्रणालीमध्ये गुंतवणूक केल्याने गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीसाठी भौमित्तिक पद्धतीसारखी चक्रवाढ शक्तीचा फायदा होण्याची मोठी शक्यता असते.
राष्ट्रीय निवृत्त वेतन
राष्ट्रीय निवृत्त वेतन प्रणालीचे (एनपीएस) फायदे फक्त निवासी भारतीयांपुरतेच मर्यादित नाहीत तर अनिवासी भारतीय (एनआरआय) आणि भारताचे परदेशी नागरिक (ओसीआय) देखील राष्ट्रीय निवृत्त वेतन प्रणालीचे खाते उघडू शकतात आणि परदेशात काम करत असताना त्यांचे पैसे वाढत्या भारतीय भांडवली बाजारात गुंतवू शकतात.
अनिवासी भारतीय (एनआरआय) आणि ओसीआयनी एनपीएसमध्ये गुंतवणूक का करावी?
राष्ट्रीय निवृत्त वेतन प्रणाली ही भारत सरकारने सुरू केलेली आणि पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अँथोरीटी (PFRDA) द्वारे नियंत्रित केलेली सेवानिवृत्ती बचत योजना आहे. ही योजना व्यक्तींना त्यांच्या स्वतःच्या पेन्शन खात्यांमध्ये योगदान देण्यास प्रवृत्त करून सक्षम करते, तसेच नियंत्रण आणि आर्थिक सुरक्षिततेची भावना वाढवते. राष्ट्रीय निवृत्त वेतन प्रणाली मध्ये गुंतवणुकदार त्याच्या आवडीनिवडी आणि जोखमीच्या क्षमतेनुसार विविध पेन्शन गुंतवणूक पर्यायांमधून योग्य गुंतवणूक प्रकार निवडू शकतो. यामुळे गुंतवणूकदाराचे सेवानिवृत्ती बचत धोरण त्याची अन्य ध्येयं आणि आशाआकांक्षांशी मिळते जुळते राहून योग्य प्रकारे गुंतवणुकीस आकार देण्यास प्रोत्साहन देते.
एनआरआय/ओसीआय हे देशांतर्गत गुंतवणूकदारांपेक्षा वेगळे कसे आहेत?
राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीत करभार व कार्यरत असण्याच्या निकषांअंतर्गत, परदेशी गुंतवणूकदार (एनआरआय/ओसीआय) देशांतर्गत गुंतवणूकदारांमध्ये भिन्नता आहे. अनिवासी भारतीयांनी किमान रु. पाचशेचे योगदान करणे आवश्यक आहे तर खाते सक्रिय ठेवण्यासाठी वर्षभरात किमान रु. सहा हजारची गुंतवणूक होणे आवश्यक आहे. देशांतर्गत ग्राहकांसाठी मात्र ही रक्कम एक हजार रुपये आहे. एनपीएसमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एनआरआयसाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही. एनआरआय वा ओसीआय व्यक्तीसाठी या योजनेमध्ये जमा झालेला निधी परिवर्तनीय चलनात परत करण्याजोगा आहे, त्यामुळे परदेशात निधी पाठविला जाऊ शकतो. तथापी, देशांतर्गत गुंतवणूकदारांना हा पर्याय उपलब्ध नाही.
वयोमर्यादा आणि आवश्यक कागदपत्रे
१८ ते ७० वयोगटातील कोणताही अनिवासी भारतीय कायम निवृत्ती खाते क्रमांक (पीआरएएन) मिळवू शकतो आणि अशा प्रकारे राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये खाते सुरू करू शकतो. आवश्यक कागदपत्रात त्याचा/तिचा आधार क्रमांक असल्यास, स्वाक्षरीची प्रत, रद्द केलेला चेक किंवा पॅन तपशील आणि त्याचा पासपोर्ट.
नॅशनल पेन्शन सिस्टम एलआयटीइ निर्गमनचे सुधारित नियम
पोस्ट विभाग ग्रामीण डाक सेवकांचा अपवाद वगळता, अटल पेन्शन योजना लाँच झाल्यानंतर २०१५ मध्ये नॅशनल पेन्शन सिस्टम एलआयटीइ स्वावलंबन योजनेअंतर्गत नवीन नोंदणी थांबवण्यात आली. १८ ते ४० वयोगटातील सदस्यांना अटल पेन्शन योजना मध्ये जाण्याची संधी देण्यात आली होती, तर ज्यांनी यापूर्वी २०१० आणि २०१५ दरम्यान नॅशनल पेन्शन सिस्टम -लाइट-स्वावलंबन योजनेसाठी खरे उघडले होते त्यांना ते सुरू ठेवण्याची परवानगी होती. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने २७ जुलै २०२३ रोजी जारी केलेल्या सार्वजनिक सूचनेनुसार, नॅशनल पेन्शन सिस्टम एलआयटीइ -स्वावलंबन योजनेंतर्गत बाहेर पडणाऱ्या ग्राहकांना याद्वारे सूचित केले जाते.
अ) सदस्य त्यांच्या अंतर्निहित खात्याद्वारे त्यानंतरचे योगदान जमा करू शकतात किंवा इ-एन्पिएस पोर्टलवर लॉग इन करून ऑनलाइन योगदान देऊ शकतात.
ब) १८ ते ४० वर्षे वयोगटातील सदस्य हमी पेन्शनचा लाभ घेण्यासाठी अटल पेन्शन योजना मध्ये स्थलांतर करू शकतात. खात्याच्या स्थलांतरासाठी ग्राहक जिथे त्यांच्याकडे बचत बँक खाते आहे बँक/पोस्ट ऑफिसशी संपर्क साधू शकतात.
क) ४० वर्षांपेक्षा जास्त वयाचे सदस्य जे योजनेअंतर्गत पुढे जाऊ इच्छित नाहीत ते अकाली बाहेर पडण्याची विनंती/फॉर्म अंतर्निहित पोर्टलवर दाखल करून बाहेर पडू शकतात.”
गुंतवणुकीची रक्कम
राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये तुमच्या आर्थिक क्षमतेला अनुकूल अशी लवचिकता देते. प्रति व्यवहार किमान योगदान रुपये पाचशे आहे आणि तुम्ही वार्षिक एकूण एक हजार रुपये किंवा अधिक योगदान दिले पाहिजे. सर्वोत्तम भाग असा आहे की गुंतवलेल्या रकमेवर कोणतीही कमाल मर्यादा नाही, गुंतवणूकदारास त्याच्या इच्छित आर्थिक टप्या नुसार सेवानिवृत्ती निधी तयार करण्याचे स्वातंत्र्य देते. एनआरआय/ओसीआय पीआरएएन क्रमांक व्युत्पन्न करण्यासाठी त्यांची राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमधील गुंतवणूक किमान पाचशे रुपयांपासून सुरू करू शकतात.तर, कमाल मर्यादेवर कोणतेही बंधन नाही.
गुंतवणूक कशी करावी?
अनिवासी भारतीयांना त्यांची बँकेतील खाती विदेशी चलनात परावर्तित होणारी किंवा विदेशी चलनात परावर्तित न होणारी उघडण्याची परवानगी आहे. ते त्यांच्या अनिवासी बाह्य (एनआरइ) आणि अनिवासी सामान्य (एनआरओ) बँक खात्यांचा वापर करून राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये गुंतवणूक करू शकतात. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॅरिटीच्या संदर्भात नियमानुसार, चलन विनिमय नियमांव्यतिरिक्त, निवासी भारतीयांना एनआरआय आणि ओसीआय पासून वेगळे करणारे कोणतेही वेगळे नियम नाहीत. तसेच, एनआरआय एनपीएसच्या टियर २ खात्यांमध्ये गुंतवणूक करू शकत नाहीत.
राष्ट्रीय पेन्शन प्रणालीत गुंतवणूक करणे सोपे
पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीने सदस्यांसाठी राष्ट्रीय पेन्शन प्रणालीत गुंतवणूक करणे सोपे केले आहे. पेन्शन फंड आणि नियामक आणि विकास प्राधिकरणने सेंट्रल रेकॉर्डकीपिंग एजन्सी आणि पॉइंट ऑफ प्रेझेन्स स्थानांद्वारे राष्ट्रीय पेन्शन योजना खाते उघडण्याची प्रक्रिया सुलभ केली आहे. यामुळे सदस्यांना त्यांचा कायम निवृत्ती खाते क्रमांक (पीआरएएन) त्वरित तयार करण्यास मदत मिळेल. ऑनलाइन पीआरएएन जनरेशन मॉड्यूल अंतर्गत राष्ट्रीय पेन्शन प्रणालीत सदस्यांची ऑनबोर्डिंग प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, सीआरएने दोन पद्धती सुरू केल्या आहेत: एक संबंधित नोडल ऑफिस किंवा पॉइंट ऑफ प्रेझेन्सद्वारे अपलोड केलेल्या ग्राहकाचा फोटो आणि स्वाक्षरीसह आणि दुसरा फोटोशिवाय आणि स्वाक्षरीसह.
एनपीएस सदस्यांनी गरजेनुसार अॅन्युइटी पेन्शन योजना निवडणे आवश्यक आहे
पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीने हजारो नॅशनल पेन्शन सिस्टम सहभागींना दिलासा देण्यासाठी पेन्शन कॉर्पसमधून पैसे काढण्याचे निर्बंध सोपे केले आहेत. पेन्शन एजन्सीने 27 जुलै 2023 रोजीच्या पत्रात सर्व NPS सदस्यांना माहित असणे आवश्यक असलेल्या तीन मुद्यांवर जोर दिला.
वेगवेगळ्या मालमत्ता वर्गांसाठी तीन पर्यंत पेन्शन फंड व्यवस्थापक निवडीचे स्वातंत्र्य
पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने जाहीर केले आहे की नॅशनल पेन्शन सिस्टमआधील सदस्य गुंतवणूकदार आता वेगवेगळ्या मालमत्ता वर्गांसाठी एकापेक्षा अधिक पेन्शन फंड व्यवस्थापक निवडू शकतात. नवीन पीएफआरडीए परिपत्रकानुसार, एनपीएस सदस्य विविध मालमत्ता वर्गांसाठी तीन पेन्शन फंड व्यवस्थापक निवडू शकतात. गुंतवणूकदार अनेक मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणूक करू शकतो, ज्यात इक्विटी (इ), सरकारी बाँड (जी), कॉर्पोरेट बाँड (सी), आणि पर्यायी मालमत्ता वर्ग (ए) यांचा समावेश आहे.
एकाच जीवन विमा कंपनीकडून अनेक वार्षिकी
नॅशनल पेन्शन सिस्टमचे सदस्य एकाच विमा कंपनीकडून एकापेक्षा अधिक अॅन्युइटी योजना खरेदी करू शकतात. पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटीने जाहीर केले आहे की ते आता ज्यांनी १० लाखांपेक्षा जास्त वार्षिक निधी राखून ठेवला आहे, ज्यामध्ये प्रत्येक वार्षिक योजना खरेदी करण्यासाठी ५ लाख रुपये वापरले जातात. त्या एनपीएस सदस्यांना एका पेक्षा अधिक वार्षिकी घेण्याच्या पर्यायाय अनुमती देईल यामुले ग्राहकांना वार्षिकी पर्यायांची विस्तृत श्रेणी देण्यासाठी आहे.
योगदान कसे द्यावे?
निवासी भारतीयांना फक्त त्यांच्या संबंधित एनआरइ/एनआरओ खात्यांमधून योगदान द्यावे लागेल आणि सर्व विमोचन/पैसे काढणे एनआरओ खात्यात स्थानिक चलनात म्हणजे भारतीय रुपयात जमा केले जातील.
कर सवलती
कर लाभ अनिवासी भारतीयांना भारतीय आयकर कायद्याच्या कलम ८०सी आणि ८०सीसीडी१बी मधून कर लाभ मिळू शकतात जे निवासी करदात्यांप्रमाणेच असतील..परकीय गुंतवणूकदार आयकर कायद्याच्या ८०सी अंतर्गत उत्पन्नातील वजावट म्हणून दीड लाख रूपयांपर्यंत उत्पन्नातून वजावट मिळवून कर कपात करू शकतात. ही रक्कम प्राप्तिकर कायद्याच्या या कलमांतर्गत घोषित केलेल्या इतर कोणत्याही गुंतवणुकी सारखीच असल्याने समतुल्य आहे. या खेरीज त्यांच्या राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये गुंतवणुकीवर वार्षिक रु पन्नास हजार हे कलम ८०सीसीडी१बी अंतर्गत उत्पन्नातून वजावट करून घेऊन कर सवलतीची ची मागणी करू शकतात.
मुदतपूर्ती पश्चातील पैशाची जमावट
मुदत पूर्ती नंतर वर, अनिवासी भारतीयांना भारतात अनिवार्य वार्षिकी (अॅन्युइटी) खरेदी करणे आवश्यक आहे. ६०% रक्कम काढून एनआरओ खात्यामध्ये जमा केले जाऊ शकते. नंतर ते कोणत्याही चलनात परत केले जाऊ शकतात. एनआरआय/ओसीआयसाठी पैसे काढण्याचे नियम वेगळे आहेत. सेवानिवृत्ती किंवा मुदतपूर्तीनंतर, अनिवासी भारतीय कोणत्याही कर दायित्वाशिवाय व्युत्पन्न केलेल्या कॉर्पसच्या ६०% पर्यंत काढू शकतात, तर उर्वरित ४०% रक्कम एएसपीच्या वार्षिक योजनेत अनिवार्यपणे गुंतवणूक करणे बंधनकारक आहे. गुंतवणुकदाराच्या निवडीवर आधारित आणि अॅन्युइटी पेमेंटवर भरावा लागणारा कर हा अनिवासी व्यक्तीच्या राहत्या देशाच्या बरोबर भारताने केलेल्या दुहेरी कर प्रतिबंध करारावर अवलंबून असेल. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अँथोरीटीने नॅशनल पेन्शन सिस्टम मधून बाहेर पडल्यानंतर वार्षिकी पेमेंट जलद आणि सुलभ करण्यासाठी तसेच ग्राहकांच्या हितासाठी आणि वार्षिकी उत्पन्नाच्या वेळेवर पेमेंट करून लाभ मिळावा व या सर्वांचा फायदा होण्यासाठी,१ एप्रिल २०२३ पासून प्रणाली सदस्यांनी काही कागदपत्रे ऑनलायीन दाखल करणे अनिवार्य केले आहे.
अ.. नॅशनल पेन्शन सिस्टम एक्झिट/ विथड्रॉवल फॉर्म
ब. पैसे काढण्याच्या फॉर्ममध्ये नमूद केल्याप्रमाणे ओळख आणि पत्त्याचा पुरावा
क. बँक खात्याचा पुरावा
ड. पीआरएएन कार्डची प्रत
मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढणे
टियर I मधील राष्ट्रीय पेन्शन प्रणाली खाते मुदतपूर्तीपूर्वी सहजासहजी पैसे काढण्यास परवानगी देत नाही. तथापि, एनआरआय विशिष्ट आर्थिक गरजांसाठी अंशतः पैसे काढू शकतो. उदाहरणार्थ: शैक्षणिक खर्चाची पूर्तता करणे, वैद्यकीय खर्चाची भरपाई करणे, घर खरेदी करणे इत्याडी. सुरुवातीला तीन वर्षांच्या गुंतवणुकीनंतर आणि प्रत्येकी पाच वर्षांच्या अंतरानंतर आंशिक पैसे काढण्याची परवानगी आहे. ते एका वेळी गुंतवलेल्या रकमेच्या २५% पर्यंत रक्कम काढू शकतात आणि आंशिक पैसे काढण्यासाठी जास्तीत जास्त तीन वेळा अर्ज करू शकतात. एनआरआय साठी पैसे काढण्याची रक्कम स्थानिक चलनात फक्त भारतीय रुपयात आणि एनआरओ खात्यातच जमा केली जाईल. एनआरआय साठी आधार असल्यास ओटीपी वापरून संपूर्ण गुंतवणूक आणि पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करता येते. पॉइंट ऑफ प्रेझेन्स (पीओपी) द्वारे ऑफलाइन प्रक्रिया देखील उपलब्ध आहे. राष्ट्रीय पेन्शन प्रणाली मध्ये गुंतवणूक करण्यासाठी अनिवासी भारतीयांना देशानुसार काहीही निर्बंध नाहीत तर फक्त चलन विनिमय नियम लागू आहेत..
पद्धतशीर एकरकमी पैसे काढण्याची सुविधा
नवीन नियमानुसार, सदस्य त्यांच्या एकूण निवृत्ती वेतन निधीच्या ६०% रक्कम मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर एकरकमी पद्धतशीर पैसे पद्धती द्वारे त्यांनी जे सेवानिवृत्तीचे वय निवडले असेल त्या ७५ वर्षांपर्यंतच्या कालावधी होईपर्यंत काढू शकतात,. पद्धतशीर एकरकमी पैसे काढण्याच्या सुविधेसह, बाहेर पडल्यावर, सुपर अॅन्युएशनमुळे, एकरकमी रक्कम टप्प्याटप्प्याने काढता येते हा नवा बदल आहे.
ग्राहकाच्या बँक खात्याच्या तपशीलात बदल करणे
पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने सदस्यांनी पैसे काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर किंवा योजनेचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर ग्राहकांच्या बँक खात्यांत वेळेवर नॅशनल पेन्शन सिस्टम पेमेंट मिळतील याची खात्री करण्यासाठी झटपट बँक खाते पेनी ड्रॉप पडताळणी करणे अनिवार्य केले आहे. त्यांच्या २५ ऑक्टोबर २०२३ च्या परिपत्रकानुसार, २०२३, पेनी ड्रॉप पडताळणीत सदस्याचे नाव जुळणे, योजनेतून बाहेर पडणे/विथड्रॉवल विनंत्यांची प्रक्रिया करणे आणि ग्राहकांच्या बँक खात्याच्या तपशीलात बदल करणे या प्रक्रिया यशस्वी होणे आवश्यक आहे,
एकत्रित खात्यांच्या माहितीमध्ये राष्ट्रीय पेन्शन प्रणाली विवरण
पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी आणि सेबीने आता नवीन मार्क-टू-मार्केट मूल्यांसह, राष्ट्रीय पेन्शन प्रणाली सदस्यांसाठी सिक्युरिटी मार्केटमधील वैयक्तिक गुंतवणुकीचे एकसंध दृश्य प्रदान केले आहे. यामध्ये गुंतवणुकीचे डिमॅट खाते आणि म्युच्युअल फंडाचे होल्डिंग या दोन्हींचा समावेश होतो. पीएफआरडीएच्या १० ऑगस्ट २०२३ च्या परिपत्रकानुसार, पीएफआरडीएने एनपीएस स्टेटमेंट ऑफ ट्रान्झॅक्शन (एसओटी) सीएएससह समाकलित केले आहे.
युपीआय-सक्षम क्यूआर कोड वापरून राष्ट्रीय पेन्शन प्रणालीत योगदान
भारतातील पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीने नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये योगदानाचा आणखी एक डिजिटल पर्याय उपलब्ध केला आहे. राष्ट्रीय पेन्शन प्रणाली सदस्य आता त्यांच्या राष्ट्रीय पेन्शन प्रणाली खात्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी क्यूआर कोड वापरू शकतात. क्यूआर कोड स्कॅन करण्यासाठी आणि योगदान देण्यासाठी सदस्य कोणतेही युपीआय-सक्षम ऍप्लिकेशन वापरू शकतात. क्यूआर कोड प्रत्येक सदस्यासाठी एकमेव असतो आणि पेमेंटसाठी ऑफलाइन ठेवला जाऊ शकतो; टियर I आणि टियर II साठी क्युआर कोड वेगळे आहेत.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी NPS टियर II खात्यांमध्ये डिफॉल्ट पर्याय उपलब्ध आहे
राष्ट्रीय पेन्शन प्रणाली टियर II खात्यांमध्ये डिफॉल्ट योजना निवड आता सरकारी क्षेत्रातील राष्ट्रीय पेन्शन प्रणाली सदस्यांसाठी उपलब्ध असेल. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॅरिटीने २२ सप्टेंबर २०२३ रोजी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, “केवळ सरकारी क्षेत्रातील ग्राहकांसाठी राष्ट्रीय पेंशन प्रणाली टियर II डिफॉल्ट योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लक्षात ठेवण्यासाठी महत्वाचे मुद्दे
परदेशी गुंतवणूकदार, विशेषत: एनआरआय आणि ओसीआय, एनपीएसमध्ये गुंतवणूक करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे:
- प्रथम, त्यांनी १८ते ७० वर्षांच्या दरम्यान वयाची आवश्यकता पूर्ण केली पाहिजे.
- त्यांच्याकडे वैध बँक खाते असणे आवश्यक आहे, जे अनिवासी बाह्य (एनआरइ) खाते किंवा अनिवासी सामान्य (एनआरओ) खाते असू शकते.
- बँकेच्या ग्राहकाला सक्त्चीचे असलेले केवायसी नियमांचे पालन करणे, वैध आधार किंवा पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.
- एनआरआय आणि ओसीआय ला फक्त टियर I खाती उघडण्याची परवानगी आहे आणि टियर II खात्यासाठी पर्याय उपलब्ध नाही.
- हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की जर एनआरआय किंवा ओसीआयने भारताचे नागरिकत्व सोडून दिले, तर त्यांचे राष्ट्रीय पेन्शन प्रणालीचे सदस्यत्व बंद केले जाईल.