सुधाकर कुलकर्णी
मागील लेखात आपण म्युच्युअल फंडाच्या तीन प्रकारांची( इक्विटी, हायब्रीड व डेट) थोडक्यात माहिती घेतली. या पुढील तीन लेखात आपण यातील प्रत्येकाची तपशीलात माहिती घेऊ. आता आपण इक्विटी फंडाबाबत सविस्तर माहिती घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
इक्विटी म्युच्युअल फंड ही एक असी योजना आहे जी प्रामुख्याने सूचीबद्ध भारतीय कंपन्यांच्या समभागांमध्ये(लिस्टेड शेअर्स) गुंतवणूक केली जाते. सेबीच्या नियमांनुसार, इक्विटी म्युच्युअल फंड म्हणून पात्र होण्यासाठी एखाद्या योजनेला आपल्या मालमत्तेच्या किमान ६५% इतकी गुंतवणूक इक्विटी आणि इक्विटीशी संबंधित इन्स्ट्रुमेन्ट्समध्ये करणे आवश्यक असते. अन्य दोन फंडांच्या तुलनेने इक्विटीमधील गुंतवणूक जास्त असल्याने या फंडातील गुंतवणूक जास्त जोखीम असणारी असते. मात्र यातून मिळणारा रिटर्न (परतावा) सुद्धा अन्य दोन फंडांच्या तुलनेने जास्त असू शकतो, असतोच असे नाही.
हेही वाचा… Money Mantra : नवविवाहितांसाठी फायनान्शिअल प्लॅनिंग #couplegoals – 1
इक्विटी फंडाचे प्रामुख्याने खालील प्रकार आहेत.
लार्ग कॅप फंड : या योजनेत लार्ज कॅप कंपन्यांच्या इक्विटी आणि इक्विटीशी संबंधित इन्स्ट्रुमेन्ट्समध्ये किमान ८०% गुंतवणूक. उदा: रिलायन्स, इन्फोसिस, एचडीएफसी बँक,टीसीएस यासारख्या मोठ्या कंपन्या की ज्यांचे मार्केट कॅपिटलायझेशन रु.२०००० कोटीहून अधिक असते.
लार्ज अँड मिडकॅप फंड: या योजनेत लार्ज कॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये किमान ३५ % गुंतवणूक आणि तर मिड कॅप कंपन्याच्या शेअर्समध्ये किमान ३५% इतकी गुंतवणूक केली जाते. लार्ग कॅप फंडाच्या तुलनेने यातील गुंतवणुकीत जोखीम थोडी जास्त असते.
मिड कॅप फंड: या योजनेत मिड कॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये किमान ६५% गुंतवणूक केली जाते. यातील गुंतवणुकीस वरील दोन योजनांपेक्षा जास्त जोखीम असते.
स्मॉल कॅप फंड: या योजनेत स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअर्स मध्ये किमान ६५ % इतकी गुंतवणूक करावी लागते. यातील गुंतवणुकीस वरील तीन योजनांपेक्षा जास्त जोखीम असते.
मल्टी कॅप फंड: या योजनेत लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते व प्रत्येक सेगमेंटमध्ये किमान २५ टक्के गुंतवणूक करावी लागते.
हेही वाचा… Money Mantra : ‘अर्थ’पूर्ण लग्न
फ्लेक्सी कॅप फंड: या योजनेत लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते मात्र प्रत्येक सेगमेंटचे % बाजारातील परिस्थितीनुसार कमी अधिक केले जाते मात्र शेअर्समधील किमान गुंतवणूक ६५% इतकी असावी लागते.
डिव्हिडंड फंड : या योजनेत प्रामुख्याने लाभांश देणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते आणि इक्विटीमध्ये किमान ६५ टक्के गुंतवणूक ठेवावी लागते.
फोकस फंड : ही योजना शेअर्सच्या संख्येवर (जास्तीत जास्त 30) लक्ष केंद्रित करते आणि एकूण गुंतवणुकीच्या किमान ६५% शेअर्स मध्ये गुंतवणूक केली जाते.
सेक्टोरल फंड: या योजनेत एखाद्या विशिष्ट क्षेत्राच्या शेअर्समध्ये किमान ८०% गुंतवणूक केली जाते. उदा: बँकिंग, आयटी, फार्मा ई. निवडलेल्या सेक्टरच्या कामगिरीवर यातून मिळणारा रिटर्न अवलंबून असतो.
याशिवाय इक्विटी लिंक्ड सेव्हिंग फंड (ईएलएसएस) : हा डायव्हर्सीफायिड इक्विटी फंड असून यात किमान ८०% गुंतवणूक इक्विटीमध्ये केलेली असते व यातील गुंतवणूक प्राप्तिकर कलम ८० सी अंतर्गत कर सवलतीस पात्र असते मात्र यातील गुंतवणुकीस ३ वर्षांचा लॉकइन पिरीयड असल्याने या कालावधीत रक्कम काढता येत नाही.
हेही वाचा… Money Mantra : अग्रिम कर अर्थात अॅडव्हान्स्ड टॅक्स १५ डिसेंबरपूर्वी कोणी भरावा?
वरील सर्व फंड अॅक्टिव्ह फंड असून फंड मॅनेजर बाजारातील परिस्थितीनुसार यातील शेअर्सची खरेदी अथवा विक्री करत असतो.
इंडेक्स फंड हा आणखी एक इक्विटी फंडाचा प्रकार असून याला पॅसिव्ह फंड असे म्हणतात यातील गुंतवणूक निवडलेल्या इंडेक्समध्ये असलेल्या शेअर्स मधेच केली जाते व तीही सबंधित शेअरचे त्या इंडेक्स मधील वेटेजनुसारच केली जाते. या फंडाचे रिस्क सबंधित इंडेक्स इतकेच असल्याने फंड मॅनेजर यात बदल करत नाही. वरीलपैकी आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार आपण फंड निवडू शकतो आणि त्यानुसार रिटर्नची अपेक्षा करू शकतो. पुढील लेखात आपण हायब्रीड फंडाची सविस्तर माहिती घेऊ.