सुधाकर कुलकर्णी
दिवसेंदिवस समाजामध्ये पर्यटनाची आवड वाढत चालली आहे. त्यामुळे सर्व वयोगटातील लोक जमेल तेव्हा व जमेल तसे देशी- विदेशी पर्यटनाला जात असल्याचे मोठ्या प्रमाणावर दिसून येते. प्रत्येक पर्यटनासाठी बऱ्यापैकी पूर्वतयारी करावी लागते. विशेषत: जेव्हा आपण परदेशी पर्यटन करणार असतो त्यावेळी तर जास्त पूर्वतयारी करावी लागते व यातील प्रमुख घटक म्हणजे ट्रॅव्हल इन्श्युरन्स. कारण परदेशी प्रवासाला ट्रॅव्हल इन्श्युरन्स घेणे बंधनकारक असते. यामुळे परदेश प्रवास करताना असा ट्रॅव्हल इन्श्युरन्स केवळ बंधनकारक आहे म्हणून घेतला जातो.
मात्र ट्रॅव्हल इन्श्युरन्स का घ्यायचा त्याच्या अटी काय असतात व त्यामुळे होणारे फायदे काय असतात याबाबत बहुतेकांना फारशी माहिती नसते व अशी इन्श्युरन्स पॉलिसी केवळ एक औपचारीकता म्हणून घेतली जाते. मात्र अशी पॉलिसी घेताना त्याबाबतची संपूर्ण माहिती करून घेऊन आपल्याला नेमके ‘की इन्श्युरन्स कव्हर’ घेणे गरजेचे आहे याचा विचार करून ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी घेणे योग्य असते. त्या दृष्टीने आज पण ट्रॅव्हल इन्श्युरन्स बाबत तपशिलात माहिती घेऊ.
हेही वाचा… Money Mantra: आयुर्विमा पॉलिसीवरील नॉमिनेशन- कोणती काळजी घेणे आवश्यक?
ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी ही असी एक इन्श्युरन्स पॉलिसी आहे जी जनरल इन्श्युरन्स कंपनी मार्फत दिली जाते व या पॉलिसीमुळे प्रवासात विविध कारणांनी होणाऱ्या आर्थिक नुकसानीची भरपाई पॉलिसी धारकास प्रत्यक्ष झालेले नुकसान किंवा पॉलिसी कव्हरची रक्कम यातील कमी असणाऱ्या रकमे पर्यंत दिली जाते.
ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसीची वैशिष्ट्ये:
- पॉलिसी कालावधी हा प्रवासाच्या कालावधी इतका असतो एखाद दुसरा दिवस जास्त असतो पण कमी नसतो.
- पॉलिसीमध्ये प्रामुख्याने प्रवासात समान गहाळ होणे , उशिरा मिळणे , पासपोर्ट हरवणे , प्रवासादरम्यान तातडीने वैद्यकीय उपचार करावे लागल्याने त्यावर होणारा खर्च, प्रवासादरम्यान अपघातामुळे होणारे आर्थिक नुकसान किंवा अपघाती मृत्यू अथवा अपंगत्व, काही अपरिहार्य कारणाने प्रवास रद्द करावा लागणे यासारख्या बाबी समाविष्ट असतात.
- ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसीचे देशांतर्गत व परदेशी प्रवासाची पॉलिसी असे दोन प्रकार असतात.
- काही परदेशी प्रवासाची पॉलिसी ठरविक देशासाठी वेगळी असते तर काही पॉलिसीत एकदोन देशांचा अपवाद वगळता सर्व देशांचा समावेश असतो. तर काही पॉलिसी सर्व देशासाठी मिळतात कुठलाही अपवाद नसतो.
- जी परदेशी प्रवासाची पॉलिसी एकाच प्रवासासाठी असते त्या पॉलिसीत किती दिवसांसाठी आहे याचा उल्लेख असतो व अशी पॉलिसी प्रवासास जाण्याच्या दिवशी सुरु होऊन व परत येण्याच्या दिवशी संपते.
- जी परदेशी प्रवासाची पॉलिसी एकाहून अधिक प्रवासाठी असते तिचा कालावधी एक वर्षाचा असतो व या एका वर्षाच्या काळात पॉलिसीधारक एकूण देशात त्याच्या सोयीने प्रवास करू शकतो. या पॉलिसीची सुरुवात पहिल्या प्रवासाच्या तारखेपासून होते व तेथून पुढे एक वर्ष चालू राहते. ज्यांना एका वर्षात एकाहून अधिक वेळा परदेश प्रवास करावयचा आहे त्यांच्यासाठी ही पॉलिसी सोयीची असते शिवाय प्रीमियमचीही बचत होते.
- परदेशी प्रवासाची पॉलिसी वैयक्तिक तसेच समूह (ग्रुप) स्वरुपात घेता येते. वैयक्तिक पॉलिसी ही एकट्यासाठी किंवा कुटुंबातील सदस्यांसाठी घेता येते. या उलट ग्रुप इन्श्युरन्स पॉलिसीत ग्रुप घेवून जाणारे कर्मचारी किंवा यात्रा कंपन्या त्यांच्या टूरमध्ये असणाऱ्या पर्यटकांसाठी घेऊ शकतात.
- या व्यतिरिक्त परदेशी शिक्षणास जाणाऱ्या विद्यार्थांसाठी स्टूडंट ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी सुद्धा दिली जाते या पॉलिसीत शिक्षणाच्या कालावधीत येणारे आजारपण किंवा काही अपरिहार्य कारणाने परदेशी शिक्षणात अडथळा आला तर होणाऱ्या आर्थिक नुकसानीची पॉलिसी कव्हर पर्यंची नुकसान भरपाई दिली जाते.
- प्रवासात आपले पाकीट/पर्स गहाळ झाल्यास तातडीने पैशाची गरज लागू शकते काही पॉलिसी अशा परिस्थितीत आपल्याला रोख रक्कम काढण्याचा पर्यत देऊ करतात.
ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसीतील समाविष्ट बाबी व अटी इन्श्युरन्स कंपनी व पॉलिसीनुसार कमी अधिक असू शकतात. सर्वसाधारणपणे आपला प्रवासाचा कालवधी, सोबत असलेल्या सामानाचे बाजार मूल्य , आपली तब्येत या सर्व बाबींचा एकत्रित विचार करून पुरेसे कव्हर असणारी ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी घेणे आवश्यक असते.आजकाल पॉलिसी ऑन लाईन तसेच ऑफ लाईन पद्धतीने घेता येते.
थोडक्यात प्रवासास निघताना आपल्या गरजेनुसार ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी घ्यावी.