तुम्ही तुमचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड पिन वर्षानुवर्षे एकच ठेवला आहात का? पण ही चांगली सवय नाही. खरं तर तुमचा सुरक्षा पिन धोक्यात आल्यास ते तुम्हाला महागात पडू शकते. व्यवहार करण्यासाठी तुम्ही तुमचा सिक्युरिटी पिन किती ठिकाणी आणि विक्रेत्यांकडे टाकला असेल हे तुम्हालाही आठवत नसेल. त्यामुळे तुमचे पिन योग्यरित्या सेट करणे आणि शक्य असल्यास दर तीन महिन्यांनी ते बदलत राहणे महत्त्वाचे असते.
तंत्रज्ञान अभूतपूर्व वेगाने प्रगती करीत असल्याने संभाव्य धोक्यांपासून स्वतःचे संरक्षण करणे आवश्यक आहे. अनेकांसाठी क्रेडिट आणि डेबिट कार्ड महत्त्वाचे झाले आहेत. स्वतःचं नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी तुमच्या कार्डसाठी सुरक्षा पिन सेट करणे महत्त्वाचे आहे. भारतात तुमच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डसाठी सुरक्षा पिन तयार करण्यासाठी फायनान्शिअल एक्स्प्रेसच्या लेखात ९ सूचना दिल्या आहेत.
- एक युनिक पिन निवडा: तुमचा सुरक्षा पिन तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात वापरत असलेल्या इतर कोणत्याही पिनसारखा नसावा. जसे की, तुमच्या फोनचा अनलॉक कोड किंवा तुमचा ईमेल पासवर्ड आहे.
- स्पष्टपणे कॉम्बिनेशन टाळा: तुमच्या पिनच्या सुरक्षेसाठी ‘1234’ किंवा ‘0000’ सारखी स्पष्ट अंक वापरू नका. हे काही सर्वात सामान्य आणि सहज हॅक करण्यायोग्य पिन आहेत.
- यादृच्छिक क्रम वापरा (Use a random sequence): यादृच्छिक आणि इतरांना अंदाज लावणे कठीण असलेल्या संख्यांचा क्रम वापरा. ते अधिक क्लिष्ट बनवण्यासाठी तुम्ही संख्या आणि अक्षर मिळून वापरू शकता.
- एक लांब पिन तयार करा: तुमचा सुरक्षा पिन जितका मोठा असेल तितका हॅकर्सना तो क्रॅक करणे कठीण होणार आहे. तुमचा पिन सहा ते आठ अंकांच्या दरम्यान ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
हेही वाचाः अदाणी समूहाने रोखे विक्रीद्वारे उभारले ‘इतके’ कोटी रुपये, हिंडेनबर्ग अहवालानंतर पहिला मोठा निधी उभारला
Bankbazaar.com चे CEO Adhil शेट्टी म्हणतात, “तुमचा सिक्युरिटी पिन सुरक्षित ठेवण्यासाठी तो नियमितपणे बदलणे गरजेचे आहे. दर सहा महिन्यांनी तुमचा पिन बदलणे चांगले आहे. तुम्ही खूप जास्त व्यवहार करत असल्यास घोटाळे टाळण्यासाठी तुम्ही अधिक वारंवार पिन बदलांची निवड केली पाहिजे.”
- तुमचा पिन लक्षात ठेवा: तुमचा सिक्युरिटी पिन तुमच्या कार्डवर कधीही लिहू नका किंवा तो तुमच्या वॉलेटमध्ये ठेवू नका, कारण तो सहजपणे चोरीला जाऊ शकतो.
- तो सुरक्षित ठेवा: तुमचे कार्ड आणि पिन सुरक्षित ठेवा आणि ते कधीही कोणाशीही शेअर करू नका, जरी कोणीही व्यक्ती बँकेची असल्याचा दावा करत असली तरीही त्याला सांगू नका.
- ATM मशिनचा सार्वजनिक वापर टाळा: गर्दीच्या ठिकाणी किंवा तुम्हाला असुरक्षित वाटत असलेल्या किंवा कोणीही पाळत ठेवत असलेल्या ठिकाणी ATM वापरू नका.
- तुमचा फोन लॉक करा: तुम्ही मोबाईल बँकिंग वापरत असल्यास अतिरिक्त सुरक्षिततेसाठी पिन किंवा फिंगरप्रिंट ओळख वैशिष्ट्य सेट केल्याचे सुनिश्चित करा.
- फिशिंग घोटाळ्यांपासून सावध राहा: नेहमी तुमच्या कार्डचे तपशील किंवा पिन विचारणाऱ्या ईमेल किंवा मेसेजपासून सावध राहा. कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी विनंती खरी असल्याची खात्री करा.
हेही वाचाः तांदळाचे भाव कमी करण्यासाठी सरकारने बनवली जबरदस्त योजना; उचलू शकतात ‘हे’ मोठे पाऊल
शेवटी तुमच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डांसाठी सिक्युरिटी पिन सेट करणे हे तुमच्या आर्थिक फसवणुकीपासून संरक्षण करण्याच्या दिशेने एक आवश्यक पाऊल आहे. या टप्प्यांचे अनुसरण करून तुम्ही एक मजबूत आणि सुरक्षित पिन तयार करू शकता, जो हॅकर्सना क्रॅक करणे कठीण आहे. या डिजिटल काळात आपला आर्थिक डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आपण सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घेतली पाहिजे.