डॉ. दिलीप सातभाई

प्रश्न १- ( निनाद सावंत) : मी एका विधी महाविद्यालयात लेखनिक म्हणून कार्यरत आहे. मला येत्या वर्षात म्हणजे आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये साडेसात लाख रुपये पगार मिळणार आहे. गेल्या वर्षी मी आयुर्विम्यात महिन्यास रु. अडीच हजार भरले आहेत. पीपीएफ खात्यात वर्षातून एकदा पंचवीस हजार रुपये भरतो. माझे आई वडील वृध्द असून त्यांच्या वैद्यकीय औषधोपचारासाठी महिना रु. पाच हजार खर्च करीत आहे. मी कोणती कर प्रणाली निवडू? जुनी की नवी करप्रणाली?

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
success story of utham gowda started his own startup owner of captain fresh company
जास्त पगाराची नोकरी सोडली अन् घेतली ‘ही’ जोखीम, आता आहेत कोटींचे मालक; वाचा उथम गौडा यांचा प्रेरणादायी प्रवास
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
mallikarjun kharge criticize pm narendra modi in nagpur
पंतप्रधान देशाचे असतात, पण मोदी मात्र सर्व चांगले प्रकल्प आपल्याच गृहराज्यात…खरगेंची जोरदार टीका
guruji Nitesh Karale concern over giving opportunity to mp Kale wife Mayura Kale in Maharashtra
Video : कराळे गुरूजींची स्वपक्षीय खासदाराबद्दल ‘खदखद’,काय म्हणाले  ?
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा

उत्तर (डॉ. दिलीप सातभाई) : पगारातून व इतर स्त्रोतातून मिळणारे एकूण उत्पन्न साडेसात लाख रुपयांपर्यंत असल्यास त्यास नवीन करप्रणाली अतिशय फायद्याची आहे. या संपूर्ण रक्कमेवर त्याला काहीही कर द्यावा लागणार नाही व देय कर कलम ८७ए अंतर्गत कर सवलती अंतर्गत पूर्णतः करमुक्त असेल. जुन्या कर प्रणालीत कलम ८० सी अंतर्गत आयुर्विम्यासाठी रुपये तीस हजार व पीपीएफ साठी रुपये पंचवीस हजार अशी पंचावन्न हजारांची वजावट व कलम ८० डी अंतर्गत वैद्यकीय खर्च साठ हजार रुपये झाला तरी महत्तम रक्कम वजावटी साठी पन्नास हजार रूपये पात्र असल्याने दोन्ही कलमे मिळून एक लाख दहा हजाराची उत्पन्नातून वजावट मिळेल व करपात्र रक्कम सहा लाख चाळीस हजार होईल. (रु ७५०००० वजा ११००००) जुन्या करप्रणालीत अडीच ते पाच लाख रुपयांच्या दरम्यान असणारे उत्पन्न पाच टक्के दराने करदेय होते व त्यावरील वीस टक्के दराने. सबब रुपये चाळीस हजार पाचशे अधिक ४% उपकर द्यावा लागणार असल्याने नवी कर प्रणाली फायदेशीर ठरेल.

प्रश्न २- (अपेक्षा खामकर): पूर्वी कनिष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक व अतिज्येष्ठ नागरिक यांना असणारी किमान करपात्र उत्पन्न मर्यादा आजही उपलब्ध आहे काय?

उत्तर (डॉ. दिलीप सातभाई): एखाद्या व्यक्तीसाठी मूलभूत किमान उत्पन्न करपात्र मर्यादा त्याच्या/ तिच्या वयावर अवलंबून असते, जर त्याने/ तिने जुन्या प्राप्तिकर पद्धतीची निवड केली असेल तर. यात तीन वयोगट असून त्यातील पहिला गट साठ किंवा त्यापेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तींचा असून त्याची किमान करपात्र उत्पन्नाची मर्यादा अडीच लाख रुपये आहे. दुसरा गट साठापेक्षा अधिक वय असणारे परंतु ऐंशी वर्षापेक्षा कमी असणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींचा असून त्यांची उत्पन्नाची किमान करपात्र मर्यादा तीन लाख रूपये आहे. तिसरा वयोगट ऐंशीपेक्षा अधिक वय असणाऱ्या अतिज्येष्ठ नागरिकांचा असून त्यांची उत्पन्नाची किमान करपात्र मर्यादा रु. पाच लाख आहे. प्रत्येक वर्षाच्या ३१ मार्च रोजी किती वयाचे आहात, यावर त्यास कोणत्या वयाच्या गटवारीत टाकायचे हे ठरते.

कलम ८७ए अंतर्गत कर सवलतीचा फायदा जरी सर्व वयोगटातील व्यक्तींना उपलब्ध असला तरी ऐंशी वर्षावरील व्यक्ती त्याचा लाभ घेऊ शकत नाहीत. कारण सवलतीचा महत्तम फायदा साडेबारा हजार रुपयांपर्यंत सीमित केला आहे. तथापि, जर करदात्याने नवीन कर प्रणालीची निवड केलेली असेल, तर वयाची पूर्वअट नसल्याने मूलभूत करपात्र उत्पन्नाची मर्यादा सर्व वयोगटात समान म्हणजे रु. तीन लाख असणार आहे. करसवलतीसह मिळणारी किमान करमुक्त मर्यादा पगारदार व्यक्तीस जुन्या करप्रणालीत रु. पाच लाख आहे तर नवीन कर प्रणालीत ती साडेसात लाख आहे. पगारदार व्यक्ती सोडून इतरांसाठी ही मर्यादा जुन्या करप्रणालीत रु पाचलाख तर नवीन कर प्रणालीत रु. सातलाख आहे.

प्रश्न ३- (प्रकाश मुलानी) : प्राप्तिकर विवरणपत्र किती उत्पन्न असल्यास दाखल करावे?

उत्तर (डॉ. दिलीप सातभाई) : प्राप्तिकर कायद्यानुसार, एखाद्या रहिवासी/ गैररहिवासी व्यक्तीचे आर्थिक वर्षात मिळालेले एकूण ‘ढोबळ जमा उत्पन्न’ किमान करपात्र नसलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असल्यास प्राप्तिकर विवरणपत्र अनिवार्यपणे दाखल करणे आवश्यक आहे. या वाक्यरचनेत ढोबळ उत्पन्न रक्कम जमा असा शब्द वापरला आहे. याचा अर्थ असा की जरी व्यक्तीचे प्राप्तिकर कायद्याअंतर्गत असणारे करपात्र उत्पन्न वरील किमान मर्यादेच्या आत असले पण ढोबळ उत्पन्न वरील किमान मर्यादेपेक्षा अधिक असेल तर प्राप्तिकर विवरणपत्र भरणें सक्तीचे आहे. यासाठी प्राप्तीकर कायद्यात असणाऱ्या कोणत्याही कर सवलती, वजावटी विचारात घेतल्या जात नाहीत, हे पूर्णपणे लक्षात ठेवले पाहिजे. एखाद्या व्यक्तीने त्याच्या/तिच्या पॅनवर जमा केलेल्या जास्त करांची माहिती कर विभागाला प्राप्तिकर विवरण पत्र दाखल करणे आवश्यक आहे. प्राप्तिकर विभाग त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीशी प्राप्तिकर विवरणपत्रामध्ये दाखल केलेल्या माहितीशी जुळवून घेतो. तपशील बरोबर असल्यास प्राप्तिकर परतावा जारी केला जातो. प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची किमान उत्पन्न मर्यादा आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी जुन्या करप्रणालीत रु अडीच लाख तर नवीन कर प्रणालीत रु तीन लाख आहे.

उदाहरण: एखाद्या ४५ वर्षीय करदात्याचे ढोबळ उत्पन्न रुपये तीन लाख असेल व त्याने रुपये साठ हजाराची गुंतवणूक भविष्य निर्वाह निधी व आयुर्विम्यामध्ये केलेली असेल तर त्याचे प्राप्तिकर कायद्या अंतर्गत असणारे करपात्र उत्पन्न रुपये दोन लाख चाळीस हजार इतके होईल जे किमान करपात्र असणाऱ्या अडीचलाख रुपयांच्या उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी आहे. अशावेळी सदर व्यक्तीस त्याचे ढोबळ उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याने प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करणे अनिवार्य ठरणार आहे, याची माहिती अनेक व्यक्तींना नाही. सबब करपात्र उत्पन्न नव्हे तर व्यक्तीचे ढोबळ उत्पन्न प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याचा मुख्य निकष आहे हे लक्षात घेतले पाहिजे.