आनंद म्हाप्रळकर

कॉलेज जीवनापासून किंवा त्याच्याही थोडं आधीच ‘मुलांचा पॉकेटमनी’ हल्ली सुरू होतो. वाढदिवसाला मिळालेलं पाकीट किंवा आपण मुलांना दिलेले पैसे साठवत जाणं, त्याची बचत करणं याचं महत्त्व या टीनएजर्सना शाळेपासूनच सांगितलं गेलं पाहिजे. साधारण चौदा वर्षापासून पुढचा वयोगट आपण डोळ्यांसमोर ठेऊया. तर मग या मुलांना बचतीचं महत्त्व कसं पटवून द्यावं? खरं तर लहानपणापासून मुलं पालकांचं निरीक्षण करत असतात. त्यामुळे पालकांनी सुद्धा आपल्या आर्थिक सवयी व्यवस्थित ठेवायला हव्यात. म्हणजे नको तिथे खर्च करू नये, उत्स्फूर्तपणे एकसारखी खरेदी करणं टाळावं.

jan dhan account marathi news
अकरा कोटी निष्क्रिय जनधन खात्यांमध्ये १४,७५० कोटी पडून
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?
papaya sheera for breakfast
मुलांसाठी नाश्त्यात बनवा पपईचा पौष्टिक शिरा; वाचा साहित्य आणि कृती
bitcoin price review bitcoin prices got a boost reaches 100000 usd
विश्लेषण : ‘बिटकॉइन’ पोहोचले १ लाख डॉलरवर… का आणि कसे? भारतात मान्यता मिळेल?
regional transport officer of Jalgaon, bribe,
जळगावच्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यासह दोघे ३ लाखांची लाच घेताना सापळ्यात
congress shocking performance In maharashtra assembly election
लोकजागर : काँग्रेसचा ‘नागरी’ पेच!
sbi demands relaxation of rules related to inoperative bank accounts
‘निष्क्रिय बँक खात्यां’सदर्भात नियम शिथिलतेचे स्टेट बँकेची मागणी

आणखी वाचा : Money Mantra: कोणत्या शेअर्सचे भाव वाढले, कुणाचे कमी झाले?

पालकांचा आदर्श
मुलं पालकांकडे ‘आदर्श’ म्हणून पाहात असतात. त्यांना त्यांच्या पालकांसारखं व्हायचं असतं. त्यामुळे पालक कसे वागतात, पैशाचं नियोजन कसं करतात हे सगळं मुलं बघत असतात. म्हणूनच पैशांच्या बाबतीत मुलांसमोर बोलताना पालकांची जबाबदारी वाढते. पैशाचं नियोजन, घराचं बजेट या विषयी बोलताना पालकांनी एका मर्यादेपर्यंत मुलांना समाविष्ट करून घेतलं, तर त्यांनाही या विषयात स्वारस्य निर्माण होतं, हळूहळू बचतीचं महत्त्वही त्यांच्या लक्षात येऊ लागतं आणि जबाबदारीने पैशाचं नियोजन कसं करावं याचं बाळकडू त्यांना नकळत मिळू लागतं.

आणखी वाचा : Money mantra: रिव्हर्स मॉर्गेज पद्धती आहे तरी कशी?

तुम्ही जेव्हा मुलांना बाहेर खरेदीला घेऊन जाता तेव्हा गरजेच्या गोष्टी कोणत्या, गरज नसलेल्या गोष्टी कोणत्या यातील फरक ओळखायला शिकवा. कोणत्याही वस्तूची खरेदी करताना कसा विचार करावा, कुठली खरेदी आपण लांबणीवर टाकू शकतो हे त्यांना लहानपानापासूनच कळायला हवं. एखादी गोष्ट आवडली म्हणून घ्यावीशी वाटू शकते पण प्रत्यक्षात त्याची गरज नाहीये, तर ती खरेदी आपण काही काळासाठी पुढे ढकलू शकतो. कदाचित कालांतराने त्या वस्तूची अजिबात गरजच नाही हे आपल्याला जाणवतं. त्यामुळे आपण ती वस्तू घेण्याचा विचार कायमचा सोडून देतो. म्हणजे आपण एखादी मोठी गोष्ट घेत असू तर ती गरजेची आहे की नाही याचा विचार मुलांना करायला शिकवला पाहिजे. उदाहरणच द्यायचे तर, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक गॅझेटस् किंवा कपडे असतील, ह्या गोष्टींची खरेदी आपण लांबणीवर टाकू शकतो. मुळात या गोष्टी सहज उपलब्ध होतात पण त्याची त्या त्या वेळी खरंच गरज आहे का याचा विचार मुलांना करायला लावला पाहिजे. किंबहुना या विषयावरील चर्चा मुलांच्या समोर आणि त्यांच्या समवेतच व्हायला हवी. पालक त्यांच्या स्वतःच्या आचरणातून हे धडे मुलांना शिकवू शकतील.

आणखी वाचा : Money Mantra : गुंतवणुकीचा अमृतकाळच, पण परताव्यासाठी संयम, सबुरी हवीच!

आपली गरज ओळखणे

मुलांना बऱ्याचवेळा मोठ्यांकडून ‘गिफ्ट’ म्हणून पैसे दिले जातात. त्या पैशातून त्यांना आवडता एखादा गेम घ्यायचा असतो. त्यांच्या मित्रमंडळींमध्ये प्रत्येकाची कौटुंबिक व आर्थिक पार्श्वभूमी वेगवेगळी असते. सधन कुटुंबातून आलेल्या मुलांकडे असणाऱ्या वस्तू त्या गटातील इतर मुलांना हव्याहव्याशा वाटत असतात. अशावेळी, त्या वस्तूंची आपल्याला गरज आहे की नाही हे मुलांना समजावून सांगणं आणि त्याप्रमाणे खर्च करणं आवश्यक असतं. आपण मुलांना पर्याय देऊ शकतो. थोडा फार खर्च करायलाही काही हरकत नाही. पण गरज नसताना खर्च टाळायलाच हवा. गरज असताना आपण खर्च करतोच हेही मुलांना समजवायला हवं. मुलांना त्यांनी जमवलेल्या पैशाची कशी बचत करायला हवी हेही शिकवलं पाहिजे. त्यासाठी मुलांना बँकांतील व्यवहारांबद्दल लवकर शिकवायला हवं.

बँकिंग म्हणजे काय ?

बँक ही संस्था काय करते, हे मुलांना समजावून सांगितलं पाहिजे. तुमच्याकडे म्हणजे लहान मुलांकडे जर काही पैसे असतील तर ते घरात ठेवण्यापेक्षा बँकेत ठेवणं चांगलं; जेणेकरून ते सुरक्षितही राहतात आणि विनाकारण खर्च होत नाहीत. घरी ठेवले तर चोरीला जाण्याची किंवा लगेच खर्च होण्याची शक्यता असते. जर पैसे तुम्ही मुदत ठेवीत म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट म्हणून बँकेत ठेवले तर त्याचं व्याज मिळतं. म्हणजे तुम्ही ठेवेलेल्या पैशात आणखी थोडी भर पडते, या गोष्टी सांगितल्याने बँकेचं कार्य कसं चालतं हे त्यांना ठाऊक होईल. (क्रमश:)

Story img Loader