सरकारने नवीन उत्पादन सुरु करणाऱ्या कंपन्यांसाठी आकर्षक प्राप्तिकर व्यवस्था लागू केली आहे. २० सप्टेंबर २०१९ रोजी पारित झालेल्या प्राप्तिकर आकारणी कायदे (सुधारणा) अध्यादेश, २०१९ मध्ये नवीन उत्पादन सुरु करणाऱ्या कंपन्यांना १५ % कर दर (अधिक अधिभार आणि उपकर) प्रदान करणारे कलम ११५ बीएबी समाविष्ट केले आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० (आकारणी वर्ष २०२०-२१) पासून लाभ उपलब्ध आहे. नवीन मॅन्युफॅक्चरिंग स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी या तरतुदी कायद्यात केंद्र सरकारने समाविष्ट केल्या आहेत. सध्या नवीन स्थापन झालेल्या व उत्पादन सुरु करणाऱ्या कंपन्यांसाठी ३१ मार्च २०२४ पर्यंत १५% सवलतीचा कर दर लागू आहे. तथापि, केंद्र सरकारने नवीन मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट-अप कंपन्यांवर लागू असलेल्या १५% सवलतीच्या कर दराची संपुष्टात आलेली अंतिम मुदत वाढवविलेली नाही हे अनपेक्षित, अनाकलनीय आहे हे मात्र नक्कीच..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा