Mutual Fund NFO: मालमत्ता व्यवस्थापन कंपनी ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडा(ICICI Prudential Mutual Fund)ने इक्विटी (Thematic) श्रेणीमध्ये ICICI प्रुडेन्शियल निफ्टी २०० क्वालिटी ३० ईटीएफ हा नवीन फंड लॉन्च केला आहे. ही एक ओपन अँडेड योजना आहे. योजनेची सदस्यता २१ जुलै २०२३ पासून सुरू झाली आहे. यामध्ये गुंतवणूकदार २६ जुलै २०२३ पर्यंत बोली लावू शकणार आहेत. तसेच ही योजना ०४ ऑगस्ट २०२३ रोजी बंद होणार आहे. ही योजना दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी उपयुक्त ठरू शकते, असंही म्युच्युअल फंड हाऊसचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे ही माहिती फायनान्शिअल एक्स्प्रेसने दिली आहे.

गुंतवणूक १००० रुपयांपासून करता येणार

तुम्ही ICICI प्रुडेन्शियल निफ्टी २०० क्वालिटी ३० ETF स्कीममध्ये किमान १००० आणि त्यानंतर एक हजाराच्या पटीत गुंतवणूक करू शकता. योजनेचा बेंचमार्क निर्देशांक NIFTY २०० क्वालिटी ३० TRI आहे. या योजनेत गुंतवणुकीचे उद्दिष्ट म्हणजे बेंचमार्कनुसार चांगला परतावा निर्माण करणे हा आहे. परंतु ही योजना आपले गुंतवणुकीचे उद्दिष्ट साध्य करेल, याची कोणतीही शाश्वती नाही.

Jeevan pramaan online process
Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
rupee falls 4 paise to close at all time low of 84 43 against us dollar
रुपया ८४.४३ च्या गाळात!
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : अर्थव्यवस्थेत वाढ, मग रुपयाची घसरण का?
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
public banks profit increase by 26 percent in first half fy 25
सरकारी बँकांच्या नफ्यात सहामाहीत २६ टक्के वाढ
Union Ministry of Finance announced to start the fourth phase of consolidation of regional rural banks in the country
ग्रामीण बँका ४३ वरून २८ पर्यंत घटणार! अर्थ मंत्रालयाकडून विलीनीकरणाच्या चौथ्या टप्प्याची घोषणा

“ICICI प्रुडेंशियल निफ्टी २०० क्वालिटी ३० ETF ही गुणवत्तेवर आधारित स्मार्ट बिटा ऑफर आहे. ही ऑफर गुंतवणूकदारांना विविध क्षेत्रांमध्ये आणि मजबूत रोख प्रवाह असलेल्या कंपन्यांमध्ये इक्विटी गुंतवणुकीत विविधता आणण्याची संधी देते. निर्देशांकाने ऐतिहासिकदृष्ट्या निफ्टी २०० TRI आणि निफ्टी ५० TRI पेक्षा चांगले लाभांश उत्पन्न दिले आहे,” ICICI प्रुडेन्शियल AMC चे गुंतवणूक धोरण प्रमुख चिंतन हरिया यांनी सांगितले.

हेही वाचाः डी मार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी यांनी ‘हेल्थ अँड ग्लो’चे केले अधिग्रहण; आता नायकासारख्या ब्रँडशी स्पर्धा करणार

एखाद्याने ICICI प्रुडेंशियल निफ्टी २०० क्वालिटी ३० ETF मध्ये गुंतवणूक का करावी?

या ईटीएफअंतर्गत मागील ५ वर्षांमध्ये केलेल्या रिटर्न ऑन इक्विटी (ROE), आर्थिक लाभ (डेट/इक्विटी रेशो) आणि कमाई (EPS) वाढीतील परिवर्तनशीलता यांसारख्या पॅरामीटर्सच्या आधारे कंपन्यांची निवड केली जाते.

हेही वाचाः ओल्ड मॉन्क कशी बनली जगातील आयकॉनिक ‘रम’, मद्य बनवणाऱ्या ब्रिगेडियर कपिल मोहन यांची रंजक कहाणी

कोण गुंतवणूक करू शकतो?

म्युच्युअल फंड हाऊसच्या मते, असे गुंतवणूकदार ज्यांना दीर्घकालीन संपत्ती निर्माण करायची आहे, त्यांच्यासाठी एक चांगला गुंतवणूक पर्याय असू शकतो. एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) चे उद्दिष्ट NIFTY २०० क्वालिटी ३० निर्देशांकाच्या परताव्याच्या अनुषंगाने परतावा व्युत्पन्न करणे आहे. गुंतवणूकदाराला या योजनेबाबत काही शंका असल्यास त्यांनी त्यांच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.