ITR Deadline : प्राप्तिकर रिटर्न अर्थात इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख काल म्हणजे ३१ जुलै २०२३ होती. या मूल्यांकन वर्ष २०२३-२४ साठी आतापर्यंत ६ कोटींहून अधिक रिटर्न भरले गेले आहेत. मात्र, सरकार रिटर्न भरण्याची तारीख वाढवणार का, असा प्रश्न उपस्थित होत असतानाच तुम्ही अद्याप रिटर्न भरले नाही तर पुढे काय?, असा अनेकांना प्रश्न पडला आहे. तसेच अंतिम मुदत वाढविण्यावर सरकारकडून कोणतीही नवी प्रतिक्रिया आलेली नाही, परंतु काही दिवसांपूर्वी केंद्रीय महसूल सचिव तरुण बजाज यांनी सांगितले होते की, सरकार यंदा आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख वाढवण्याचा विचार करीत नाही. दुसरीकडे जर तुम्ही वेळेत ITR भरला नाही, तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो.

मुदत वाढवून देण्याची मागणी होत आहे

३१ जुलै ही ITR दाखल करण्याची शेवटची तारीख होती. परंतु असेही अनेक करदाते आहेत की ज्यांना वेळेवर रिटर्न भरता आलेले नाही. ट्विटरवरील अनेक वापरकर्ते वेबसाइट नीट काम करत नसल्याची तक्रार करीत आहेत, त्यामुळे मुदत वाढवण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे. मुदत वाढवून देण्यामागे तज्ज्ञ अनेक तर्कवितर्क लावत आहेत. दुसरे म्हणजे नवीन प्राप्तिकर पोर्टल सुरू होऊन दोन वर्षे उलटली तरी अद्यापही त्यात त्रुटी आहेत. आयटीआर फायलिंगच्या शेवटच्या दिवशी अनेक करदात्यांनी ट्विटरवर वेबसाइट हळू चालत असल्याची तक्रार केली. विशेष म्हणजे याआधीही प्राप्तिकर रिटर्न भरण्याची तारीख वाढवण्यात आली आहे. तसेच केरळमधील पूरस्थितीमुळे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) २०१८ मध्ये मुदत वाढवली होती.

ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
mallikarjun kharge criticize pm narendra modi in nagpur
पंतप्रधान देशाचे असतात, पण मोदी मात्र सर्व चांगले प्रकल्प आपल्याच गृहराज्यात…खरगेंची जोरदार टीका
devendra fadnavis assured to farmers if rate is less than guaranteed price government will pay difference
“हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार देणार,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
Konkan has been left behind due to electing the wrong people till date says Raj Thackeray
चुकीची माणसं आजपर्यंत निवडून दिल्याने कोकण मागे पडले – राज ठाकरे
Sharad Pawar, Sudhir Kothari Hinganghat,
वर्धा : अखेर शरद पवार थेट ‘हिंगणघाटच्या शरद पवारां’च्या घरी, म्हणाले…

हेही वाचाः देशातील ३ मोठ्या बँकांनी ​​व्याजदर वाढवले, तुमचा EMI महागणार

५००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार

जर तुम्ही आयटीआर फाइल करण्याची अंतिम मुदत चुकवली असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. ५००० रुपयांपर्यंत लेट फी भरूनही तुम्ही रिटर्न फाइल करून शकता. अंतिम मुदतीनंतर दाखल केलेल्या ITR ला विलंबित ITR म्हणतात. हे आयटी कायदा १९६१ च्या कलम १३९(४) अंतर्गत दाखल केले आहे. ज्या व्यक्तीकडे कोणतेही कर थकीत नाहीत, त्यांना प्रथम दंडाची रक्कम जमा करावी लागणार आहे. दंड जमा केल्यानंतर एखादी व्यक्ती विलंबित ITR दाखल करू शकते. ५ लाखांपर्यंत करपात्र उत्पन्न असलेल्या लहान करदात्यांना १००० रुपयांचा दंड लागू होईल. दुसरीकडे जर तुम्ही वेळेवर कर भरला नाही, तर तुम्हाला प्राप्तिकर विभागाकडून नोटीस मिळू शकते.

हेही वाचाः GST Collection : जुलैमध्ये बंपर जीएसटी संकलन, आकडा १.६५ लाख कोटींच्या पार

…तर दंड भरावा लागणार नाही

प्राप्तिकराशी संबंधित कायद्यांनुसार, प्रत्येकाने अंतिम मुदत संपल्यानंतर आयटीआर भरण्यासाठी विलंब शुल्क भरणे आवश्यक नाही. जर एखाद्या व्यक्तीचे एकूण उत्पन्न मूळ सूट मर्यादेपेक्षा जास्त नसेल, तर त्याला उशिरा ITR भरताना दंड भरावा लागणार नाही. जर एकूण उत्पन्न मूळ सूट मर्यादेपेक्षा जास्त नसेल, तर कलम २३४ एफअंतर्गत ITR वर कोणतेही विलंब शुल्क आकारले जात नाही.