जर तुम्ही करदाते असाल आणि तुम्हाला विविध प्रकारच्या सवलतींसह जुनी कर व्यवस्था आवडत असेल तर तुम्हाला यंदा कर भरताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी नवीन कर रचना की किमान सूट कर प्रणालीची निवड करू इच्छितात हे करदात्यांना आता स्पष्ट करावे लागणार आहे. खरे तर वित्त कायदा २०२३ लागू झाल्यानंतर नवीन कर प्रणाली डीफॉल्ट व्यवस्था बनली आहे. याचा अर्थ असा की, तुम्ही कोणतीही कर प्रणाली निवडली नाही, तर तुमची कर गणना नवीन कर प्रणाली अंतर्गत डीफॉल्टनुसार केली जाणार आहे. म्हणूनच जुनी कर प्रणाली काळजीपूर्वक निवडणे आवश्यक आहे.

AKM ग्लोबल या कर अन् सल्लागार कंपनीचे टॅक्स मार्केट्सचे प्रमुख यीशू सेहगल म्हणाले, “नवीन आयटीआर १ फॉर्ममध्ये कर व्यवस्था निवडण्याची अट समाविष्ट करण्यात आली आहे. जर तुम्ही आयटीआर ४ फॉर्म भरला तर तुम्हाला नवीन कर प्रणालीमधून बाहेर पडता येणार नाही, त्यासाठी तुम्हाला फॉर्म १०-IEA भरावा लागेल. ‘तुम्हाला नवीन कर प्रणालीतून बाहेर पडण्यासाठी कलम ११५ BAC(६) अंतर्गत पर्याय वापरायचा आहे का? नवीन आयटीआर फॉर्ममध्ये तुम्ही या प्रश्नाचे उत्तर “नाही” दिल्यास नवीन कर प्रणालीचे दर आणि अटी लागू होतील. प्राप्तिकर विभागाने शुक्रवारी ITR फॉर्म 1 (सहज) आणि ITR 4 (सुगम) जारी केले. नवीन कर प्रणालीशी संबंधित प्रश्न नवीन स्वरूपात बदलण्यात आले आहेत. गेल्या वर्षीपर्यंत करदात्यांना नवीन प्रणालीची निवड करायची आहे की नाही हे फॉर्ममध्ये सूचित करायचे होते.

Income Tax
Income Tax : “वर्षाला ६० लाख रुपयांपेक्षा कमी कमावणारे सर्व गरीब, कारण ७० टक्के पगार तर…” तंत्रज्ञाची पोस्ट व्हायरल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
new Income Tax Bill
सहा दशके जुना प्राप्तिकर कायदा बदलणार? नवीन विधेयकात काय आहे? सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार?
What is the market share in the budget 2025
अर्थसंकल्पात बाजाराचा ‘शेअर’ किती?
finance minister Nirmala Sitharaman
प्रतिशब्द : भरवसूली चोहिकडे!
Budget 2025 News Tax regime slabs
१ हजार रुपये अधिक उत्पन्नामुळे ६० हजारांचा फटका, टॅक्सच्या भितीने नोकरदारांवर पगार कमी करून घेण्याची वेळ
New Tax Slab
१२ लाखांहून कमी उत्पन्न असणाऱ्यांसाठीही टॅक्स स्लॅब, त्याचा नेमका अर्थ काय?
dsp mutual funds
फंडांचा फंडा: डीएसपी मिड कॅप फंड

हेही वाचाः Money Mantra : वर्षाच्या पहिल्याच महिन्यात ‘इतके’ दिवस बँका राहणार बंद, पाहा संपूर्ण यादी

आयटीआर फॉर्म वेळेच्या खूप आधी जारी केले जातात

यावेळी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) आर्थिक वर्ष २०२३-२४ (मूल्यांकन वर्ष २०२४-२५) साठी ITR फॉर्म खूप आधी अधिसूचित केला आहे. हे दोन्ही फॉर्म पगारदार व्यक्ती, व्यवसाय आणि व्यावसायिकांना लागू आहेत. अधिसूचनेनुसार, नवीन फॉर्म १ एप्रिल २०२४ पासून लागू होतील. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी फॉर्म जारी केल्याने करदात्यांना आणि सल्लागारांना आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी ITR फायलिंग विंडो उघडल्यानंतर त्यांना काय आवश्यक आहे हे समजून घेण्यात आणि तयार करण्यात मदत होणार आहे.

हेही वाचाः २०२३ मध्ये लाखो भारतीयांनी गमावल्या नोकऱ्या; २०२४ मध्येही रोजगारात होणार कपात?

“आयटीआर फॉर्म लवकर जारी केल्याने करदात्यांना आर्थिक वर्षाच्या शेवटी रिटर्न त्वरित भरण्यास मदत होऊ शकते,” असे TaxBirable चे संस्थापक चेतन चांडक म्हणाले. ITR १ किंवा ITR ४ फॉर्म वापरणाऱ्या करदात्यांना रिटर्न भरण्याची अंतिम तारीख साधारणपणे ३१ जुलै असते.

टॅक्स कन्सल्टन्सी फर्म अन् टॅक्स कनेक्ट अॅडव्हायझरीचे भागीदार विवेक जालान म्हणाले, “काही वर्षांपूर्वीपर्यंत हे फॉर्म एप्रिल/मेमध्ये जारी केले जात होते आणि उत्पन्नावर फॉर्म भरण्यासाठी (फॉर्म भरण्यास मदत करणारे सॉफ्टवेअर) टॅक्स पोर्टल जूनमध्ये जारी करण्यात आले. कालांतराने काही बदल झाल्यास करदात्यांना शेवटच्या क्षणी धावाधाव करावी लागते.”

Story img Loader