HDFC म्युच्युअल फंडाने १ ऑगस्ट २०२३ रोजी HDFC परिवहन आणि लॉजिस्टिक फंड (HDFC Transportation and Logistics Fund) सुरू करण्याची घोषणा केली आहे. ओपन एंडेड इक्विटी योजना वाहतूक आणि लॉजिस्टिक क्षेत्रात गुंतलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणार आहे. वाहतूक आणि लॉजिस्टिक्स थीम अंतर्गत ऑटोमोटिव्ह, शिपिंग आणि बंदरे, रेल्वे, विमानतळ आणि एअरलाइन्स, ई-कॉमर्स, रोड, रेल्वे, एअर कार्गो, सप्लाय चेन आणि व्हेअरहाऊसिंग या क्षेत्रांतील विविध संधींचा फायदा घेण्याचे फंडाचे उद्दिष्ट आहे, असंही एचडीएफसी म्युच्युअल फंडाने सांगितले. नवीन फंड ऑफर (NFO) २८ जुलै २०२३ रोजी उघडेल आणि ११ ऑगस्ट २०२३ रोजी बंद होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बाजारपेठेतील आघाडीच्या कंपन्यांना प्राधान्य देणार

एचडीएफसी म्युच्युअल फंडाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, पोर्टफोलिओचा मोठा भाग (सुमारे ८० टक्के) वाहतूक आणि लॉजिस्टिक थीमचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शेअर्सवर लक्ष्य केंद्रित करणार आहे. हा फंड त्यांच्या संबंधित क्षेत्रातील आघाडीचे शेअर्स किंवा बाजारपेठेतील आघाडीच्या कंपन्यांना प्राधान्य देईल. तसेच वाहतूक आणि लॉजिस्टिक्समधील विकसित लँडस्केपचा लाभ घेण्याचा प्रयत्न करेल. “फंडाचे उद्दिष्ट बाजारात गुंतवणूक करून वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ तयार करणे आहे. शेअर्स निवडणे, त्यांच्या संबंधित सेगमेंटमध्ये मार्केट लीडर बनण्याची क्षमता असलेल्या कंपन्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. वाहतूक आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील उदयोन्मुख विस्तारणाऱ्या शेअर्सचा फायदा घेण्याची क्षमता असलेल्या कंपन्यांचा शोध घेईल,” असंही HDFC म्युच्युअल फंडाने सांगितले.

हेही वाचाः Money Mantra : प्राप्तिकर रिटर्न वेळेवर भरता आला नाही; किती नुकसान होणार? आता उपाय काय?

गुंतवणुकीतून फायदा मिळवण्याची संधी

एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या मते, हा फंड गुंतवणूकदारांना अशा थीममध्ये गुंतवणूक करण्याची आकर्षक संधी देतो, ज्यामध्ये भारताचे भविष्य उजळवण्याची क्षमता आहे. “जागतिक स्तरावरील देशांतर्गत आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून फंड गुंतवणूकदारांना उत्पादन (ऑटो आणि वाहतूक उपकरणे) आणि सेवा क्षेत्रातील (लॉजिस्टिक्स आणि विमानचालन) इतर कंपन्यांशी संपर्क वाढवून फायदा मिळवून देण्यास हा फंड फायदेशीर ठरणार आहे. एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या मते, ही योजना परिवहन आणि लॉजिस्टिक थीम अंतर्गत प्रामुख्याने कंपन्यांच्या इक्विटीशी संबंधित कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन भांडवलाची शक्यता निर्माण करू पाहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर आहे.

हेही वाचाः देशातील ३ मोठ्या बँकांनी ​​व्याजदर वाढवले, तुमचा EMI महागणार

हा फंड उच्च जोखीमयुक्त फंड

एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी फंड मॅनेजर आणि वरिष्ठ इक्विटी विश्लेषक प्रिया रंजन म्हणाल्या, “भारताची वाहतूक आणि लॉजिस्टिक थीम वाढीसाठी तयार आहे, तरुण लोकसंख्येच्या रूपात अनेक चालक आहेत, वाढते डिस्पोजेबल उत्पन्नही त्यात समाविष्ट आहे.