LIC New Policy Plan : प्रत्येकाला विमा सुरक्षा प्रदान करणाऱ्या भारतीय आयुर्विमा महामंडळाने आणखी एक पॉलिसी लाँच केली आहे. जीवन किरण पॉलिसी असे या विमा योजनेचे नाव असून, ही एक नॉन लिंक्ड जीवन विमा पॉलिसी आहे. खरं तर ही टर्म इन्शुरन्स योजना नोकरी करणार्‍या व्यक्तींसाठी सर्वात योग्य आहे, ज्यांच्यावर त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी आहे. पॉलिसीच्या मुदतीदरम्यान विमाधारकाचा अकाली मृत्यू झाल्यास ही योजना कुटुंबाला आर्थिक मदत पुरवते. दुसरीकडे तुम्हाला पॉलिसीच्या मुदतपूर्तीदरम्यान भरलेली एकूण प्रीमियम रक्कम परत केली जाते. भारतीय आयुर्विमा महामंडळाने अधिकृत ट्विटरद्वारे या नवीन विमा योजनेची घोषणा केली आहे.प्लॅनमध्ये धूम्रपान करणारे आणि धूम्रपान न करणाऱ्या या दोघांसाठी वेगवेगळे प्रीमियम दर आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मृत्यू झाल्यास किती रक्कम मिळणार?

पॉलिसी घेतल्यानंतर मुदतपूर्तीच्या नमूद तारखेपूर्वी विमाधारकाचा पॉलिसी मुदतीत मृत्यू झाल्यास मृत्यूवरील विम्याची रक्कम दिली जाणार आहे.
नियमित प्रीमियम पेमेंट पॉलिसी अंतर्गत मृत्यू झाल्यास वार्षिक प्रीमियमच्या ७ पट किंवा मृत्यूच्या तारखेपर्यंत जमा केलेल्या एकूण प्रीमियमच्या १०५ टक्के किंवा मूळ विमा रक्कम दिली जाणार आहे. सिंगल प्रीमियम पेमेंट पॉलिसी अंतर्गत सिंगल प्रीमियमच्या १२५ टक्के मृत्यूनंतर भरले जातील. याशिवाय मूळ विमा रक्कम दिली जाणार आहे.

हेही वाचाः ‘स्टार मार्क’ असलेल्या ५०० रुपयांच्या नोटा खोट्या आहेत का? व्हायरल दाव्यावर आरबीआयचे स्पष्टीकरण

एलआयसी जीवन किरण पॉलिसी

या पॉलिसी अंतर्गत किमान मूळ विमा रक्कम १५,००,००० रुपये आहे आणि कमाल मूळ विमा रकमेवर कोणतीही मर्यादा नाही. ही योजना गृहिणी आणि गर्भवती महिलांसाठी नाही. पॉलिसीची किमान मुदत १० वर्षे आणि कमाल पॉलिसीची मुदत ४० वर्षे आहे. प्रीमियम एकरकमी भरता येतो. तसेच तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिकही प्रीमियम भरू शकता.

परिपक्वता लाभ

पॉलिसी अजूनही लागू असल्यास मॅच्युरिटीवरील विम्याची रक्कम नियमित प्रीमियम किंवा सिंगल प्रीमियम पेमेंट पॉलिसी अंतर्गत “एलआयसीद्वारे प्राप्त झालेल्या एकूण प्रीमियम्स”च्या बरोबरीची असेल. मुदतपूर्तीनंतर जीवन विमा संरक्षण त्वरित रद्द केले जाणार आहे.

हेही वाचाः मुकेश आणि अनिल अंबानींना SAT कडून दिलासा, आता SEBI ला द्यावे लागणार २५ कोटी रुपये

‘या’ पॉलिसी अंतर्गत मृत्यू लाभ

पॉलिसी अंतर्गत जोखीम सुरू झाल्याच्या तारखेनंतर आणि मॅच्युरिटीच्या तारखेपूर्वी पॉलिसी मुदतीच्या आत मृत्यू झाल्यास मृत्यूवरील विम्याची रक्कम दिली जाणार आहे. नियमित प्रीमियम भरणार्‍या पॉलिसींसाठी मृत्यूवरील विम्याची रक्कम वार्षिक प्रीमियमच्या सात पट जास्त आहे. हे मूळ रकमेच्या १०५ टक्के असेल.

ही पॉलिसी सर्व प्रकारचे मृत्यू कव्हर करते

दुसरीकडे सिंगल पेमेंट पॉलिसी अंतर्गत मृत्यूवरील विम्याची रक्कम जास्त मिळते. ते सिंगल प्रीमियमच्या १२५ टक्के असेल. या योजनेत पहिल्या वर्षातील आत्महत्या वगळता अपघाती मृत्यूंसह सर्व प्रकारच्या मृत्यूंचा समावेश आहे.

(टिप- योजनेत आत्महत्या वगळता अपघाती मृत्यूंसह सर्व प्रकारच्या मृत्यूंचा समावेश आहे.)

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Money mantra lic introduces jeevan kiran policy big benefit with insurance vrd