Loan Against Mutual Funds : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे ही चांगली सवय आहे. जर तुम्ही म्युच्युअल फंडात दीर्घकाळ एसआयपी करत असाल तर तुम्ही खूप मोठा निधी जमा करू शकता. बऱ्याचदा लोक म्युच्युअल फंडातून अचानक पैसे काढतात आणि त्यामुळे त्यांना चक्रवाढीचा लाभही मिळत नाही.पण म्युच्युअल फंडातून पैसे काढण्यापेक्षा एक चांगला पर्याय म्हणजे गरज असेल तेव्हा म्युच्युअल फंड तारण ठेवून कर्ज (Loan against Mutual Funds) घेणे आहे. त्यामुळे तुमची गुंतवणूकही सुरक्षित राहते आणि तुमच्या आर्थिक गरजाही पूर्ण होतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

म्युच्युअल फंडांवर कर्ज म्हणजे काय?

म्युच्युअल फंडांवरील कर्जामध्ये तुम्ही तुमचे म्युच्युअल फंड युनिट्स तारण ठेवून कर्ज घेऊ शकता. तुम्ही दीर्घकाळ गुंतवणूक करत राहिल्यास हे तुम्हाला चक्रवाढीचा लाभदेखील देते. तुम्ही कर्जाद्वारेही निधी उभारू शकता.

म्युच्युअल फंडांवर कर्ज कोण घेऊ शकते?

वैयक्तिक गुंतवणूकदार, अनिवासी भारतीय, कंपन्या इत्यादी म्युच्युअल फंडांतर्गत कर्जासाठी अर्ज करू शकतात. खरं तर अल्पवयीन मुलांना म्युच्युअल फंडांतर्गत कर्ज दिले जात नाही. अशा परिस्थितीत जर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली असेल, तर गरज पडल्यास तुम्ही त्यावर सहज कर्ज घेऊ शकता. याचे अनेक फायदे आहेत आणि ते परवडणारेही आहे.

हेही वाचाः अदाणी समूह एनडीटीव्हीनंतर ‘या’ मीडिया हाऊसमधील ५१ टक्के हिस्सा खरेदी करणार, बोर्डाने दिली मंजुरी

दोन्हीमधल्या व्याजातील फरक जाणून घ्या

वैयक्तिक कर्जाच्या तुलनेत म्युच्युअल फंडांवर कर्ज घेणे तुमच्यासाठी खूपच स्वस्त असू शकते. जर आपण त्यांच्या व्याजदराची तुलना केली, तर सध्या SBI च्या वैयक्तिक कर्जावरील व्याजदर ११ टक्क्यांपासून सुरू होतो. एसबीआयच्या म्युच्युअल फंडावरील कर्जाचा व्याजदर ८.५० टक्क्यांपासून सुरू होतो. इतर बँका आणि वित्तीय संस्थांच्या व्याजदरातही अशीच तफावत आहे.

हेही वाचाः सुधा मूर्ती होत्या टाटा मोटर्सच्या पहिल्या महिला अभियंता, थेट जेआरडी टाटांनाच लिहिले संतप्त पत्र अन् घडला ऐतिहासिक बदल

म्युच्युअल फंडांवरील कर्जाचे फायदे

  • म्युच्युअल फंड तारण ठेवून कर्ज घेतल्याने तुमची आर्थिक शिस्त कायम राहते आणि तुमची SIP थांबत नाही.
  • यामुळे तुमचा म्युच्युअल फंड विक्रीवरील कर वाचतो. एक वर्षापूर्वी खरेदी केलेल्या म्युच्युअल फंड युनिट्सच्या विक्रीवर १० टक्के दीर्घकालीन भांडवली नफा कर आणि एका वर्षाच्या आत खरेदी केलेल्या म्युच्युअल फंड युनिट्सवर १५ टक्के अल्पकालीन भांडवली नफा कर लागू होतो.
  • म्युच्युअल फंड तारण ठेवून घेतलेल्या कर्जावर कमी व्याजदर असतो. सहसा या प्रकारच्या कर्जाचा व्याजदर ९ ते ११ टक्के असतो.
  • इक्विटी म्युच्युअल फंडावरील कर्ज हे तुमच्या युनिटच्या मूल्याच्या म्हणजेच तुमच्या एकूण रकमेच्या ५० टक्के असते आणि कर्जामध्ये ते ८० टक्क्यांपर्यंत असू शकते.
  • फिनटेक कंपन्यांच्या आगमनामुळे तुम्ही म्युच्युअल फंडांवर ऑनलाइन कर्ज घेऊ शकता.
मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Money mantra loan against mutual funds at low interest rate you will get full benefit of compounding vrd